10494644_321244004709086_5516788620256758300_n

तार्कीकाच्या हातात सहजासहजी गवसत नाही म्हणूनच तर कवितेचे अवगुंठन अधिक अनवट असते, अलवार असते आणि ते हळुवार जपले की इवल्या बीजाएवढे शब्द.. विस्तीर्ण पसरलेल्या वटवृक्षाएवढे संदर्भ उधळून देतात. ज्याला जी हवी, ती पारंबी धरावी आणि स्वैर झुलावे.. कवीचे संदर्भ तर सरळ सरळ त्या इवल्या बीजातच दडलेले असतात, मन आणि जगाचा सततचा अंतर्बाह्य संघर्षच त्याच्या आयुष्याच्या संदर्भांची कालपरत्वे उगवण करीत असतो..

“कवि ग्रेस यांच्या कविता मला काळोख्या निद्रिस्त आकाशात मंदपिवळ्या, आळसावलेल्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यासारख्या वाटतात..” सांगतोय.. शब्दीप्ता Magazineचा नवोदित सहसंपादक नितीन कळंबे..

संकष्टी चैत्र, २०१६ या अंकाचे ‘शब्दीप्ता of the issue’ असतील.. ‘कवि ग्रेस’..

लवकरंच घेऊन येत आहोत नाविन्याचा साज ल्यालेला..

नेहमीच्या सदरांसोबतच काही नवीन सदरांचा समावेश असलेला..

शब्दीप्ता Magazine चा तिसरा अंक..

[Best_Wordpress_Gallery id=”10″ gal_title=”s_issue_apr”]

Like our FB page for more..

NO COMMENTS

LEAVE A REPLY