कवितांची अखेरची वही,
प्रत्येक कवितेखाली माझी सही;
जी माझ्या असण्याची
सर्जनशील ग्वाही..!!!

-मंगेश पाडगावकर,
(अखेरची वही)

पाडगांवकर…का गेलात आम्हाला सोडून…😢
या जन्मावर..या जगण्यावर..आम्हाला शतदा प्रेम करायला शिकवलंत तुम्ही…आत्ता कुठे जमायला लागलं होतं..पण तुमचं बोट धरुन चालायची सवय जडली होती…आमची पाऊलं योग्य दिशेने पडतायत म्हणल्यावर…किती अलगत सोडवुन घेतलंत बोट…मी आपला चालतंच राहीलो..आविर्भावात..आणि आज जेव्हा ठेचकळलो..तेव्हा जाणवलं मला…माझ्या मुठीतनं बोट सोडवून घेऊन तुम्ही चीरविश्रांती घेत सरणावर निजला होतात.. “पाडगांवकर, परत या” वगैरे म्हणण्याचा पोरकटपणा मी करणार नाही…पण तुमचा वरदहस्त आमच्यावर असाच कायम असुद्या..आबालवृध्दांसाठी जगण्याचं सार दिलंत तुम्ही…आम्ही नाही विसरु शकणार तुम्हाला कधीच..
-Shubhrush

मंगेश पाडगावकर is the “शब्दीप्ता of the issue” for the first issue.. Our Creative head Aparna Patil has done cover story based upon “Feminine perspective of मंगेश पाडगावकर’s Poems”

[embeddoc url=”http://shubdeepta.com/wp-content/uploads/2016/01/6-coverstory.pdf” download=”all”]

NO COMMENTS