F for Fashion..!! (summer special)

0
71

मंडळी.. मुंबईसह राज्याचा पारा ४५ अंशावर गेला आहे.. सर्वत्र उन्हाचा कडाका आहे.. तसा जरा जरा पाऊस पडतोय.. पण या अश्या जरा-जरा पडणाऱ्या पावसाने उन्हाचा तडाखा मात्र अजून काही कमी झालेला नाही.. या परिस्थिती मध्ये घराबाहेर पडताना कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत कि ज्या मुळे घराबाहेर आपले उन्हापासुन उत्तम संरक्षण होईल असा प्रश्न तुम्हालाहि पडला आहे का..? चला तर मग जाणून घेउयात.. अश्याच काही outfits बद्दल..होऊ घातलेला एक पत्रकार.. शब्दीप्ताच्या लेखन दिंडीतला एक नवीन, उमदा वारकरी.. रामेश्वर जगदाळे याच्या कडून..

“आई माझं कॉटनच शर्ट कुठं आहे गं..? आणि आज जीन्स नको शॉर्टस च बरी आहे..” असे संवाद सध्या घराघरात ऐकायला मिळत आहेत.. उन्हापासून विसावा मिळावा म्हणून आपण काय काय नाही करत.. शीतपेय, आईस्क्रिम, नारळपाणी, नाक्यावरचा बर्फाचा गोळा अगदी चवीने खातो.. परंतु आपल्या आयुष्यातील मूलभूत गरज मात्र विसरतो.. वाढत्या तापमानाचा अंदाज घेता आपल्या कपड्या बाबतच्या सवयीं मध्ये बदल करणे गरजेचे आहे.. सध्या बाजारामध्ये उन्हाळ्यासाठी खास असे काही कपडे आले आहेत.. घराबाहेर पडताना कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत या बाबतीत घेतलेला हा थोडक्यात आढावा..

1) खादी शर्ट व सदरा..
तरुण मुला मुलीपासून ते वयोवृद्ध देखील या वस्त्राचे कपडे घालू शकतात.. दिसण्यास आकर्षक आणि उन्हाच्या तड्याखापासुन वाचण्यासाठी या कपड्याचा वापर होतो.. बाजारामध्ये या शर्ट वा सदऱ्याची किंमत ४०० ते ८०० रु. पर्यंत आहे..

2)कॉटन कुर्ता
या कुर्त्या मुळे हवा खेळती राहते.. त्याचप्रमाणे हा कुर्ता तुम्ही सण समारंभ किंवा इतर ठिकाणीही घालू शकता.. मुली stylish दिसण्यासाठी या कुर्त्याचा वापर करतात.. या मध्ये प्रिंटेड आणि प्लेन सुद्धा उपलब्ध आहेत.. याची किंमत ५०० ते १००० रु. पर्यंत आहे..

3)Gunjee and chinos for boys
उन्हाळ्यात बाहेर फिरण्याचे प्लॅन होत असतात त्या वेळी याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो.. तुमच्या आवडी प्रमाणे या मध्ये तुम्ही बदल हि करू शकता.. कॉटन पासून याची निर्मिती होत असल्याने उन्हापासून तुमचे संरक्षण होउ शकते.. याची किंमत ५०० ते ७०० रु. पर्यंत आहे..

4)instead of salwar kameez for girls
टॉप व धोती याचं हे combination आहे.. बाजारामध्ये विविध रंग आणि प्रकारांत उपलब्ध आहेत.. याची किंमत ६०० ते १२०० रु. पर्यंत आहे..

5)Flare pants and linen shirt for girls
बेल बॉटम असा याचा पायजमा आहे.. काळानुसार लुप्त झालेला हा प्रकार नव्याने बाजारात आला आहे.. दिसण्यास आकर्षक आणि मॉडर्न टच देउन त्याची निर्मिती करण्यात आली आहे.. बाजारात याची किंमत ५०० ते ७०० रु. आहे.

6) 3/4 with strappy chappals for boys
उन्हाळ्यात सुद्धा तुम्हाला कूल आणि फॅशनेबल दिसायचे असेल आणि त्याचबरोबर उन्हापासून संरक्षण व्हावे असं वाटत असेल तर यासाठी हा प्रकार उपलब्ध आहे.. कॉटन टि-शर्ट आणि शॉर्टस घातल्यास उन्हा मुळे होणारा घामाचा त्रास देखील होणार नाही.. आणि त्या सोबत अजूनच कूल दिसण्यासाठी चप्पल तर आहेच.. बाजारात याची किंमत ३०० ते ७०० रु. पर्यंत आहे.

7)स्वेट पॅड.
उन्हाळ्यात कॉटनच्या कपड्यावर पडलेले घामाचे डाग तुमच्या कामाच्या ठिकाणी, कॉलेजच्या वर्गामध्ये तुमचे महत्व कमी करत आहेत का..? या उन्हाळ्यात काळजी करू नका बाजारात कपडे घालण्या पूर्वी वापरावयाचे स्वेट पॅड आले आहेत सर्व औषध विक्रेत्याकडे १०० ते १५० च्या किंमतीत उपलब्ध आहेत..

From Stylist’s desk:- उन्हापासून संरक्षण व्हावे व आपल्या त्वचेला कोणतेही कपड्यामुळे इजा होउ नये यांसाठी फिकट व शांत रंगाचे कपडे घालावेत.. आपल्या दररोजच्या वापरामध्ये कॉटन, खादी आणि सुती अशा कपड्याचा वापर करावा अशी माहिती fashion Stylist सायली बाबर यांनी दिली..

हे सर्व कुठे मिळेल..
सर्व प्रकारचे शर्ट, टि-शर्ट, कुर्ता, टोपी, आणि इतर साहित्य तुम्हाला मुंबई मध्ये दादर, लालबाग, लिंकिंग रोड, कुलाबा, फॅशन स्ट्रीट या ठिकाणी तर.. पुण्यात लक्ष्मी रोड, फर्ग्युसन रोड, फॅशन स्ट्रीट इथे स्वस्त आणि मस्त मिळतील..

NO COMMENTS

LEAVE A REPLY