हाती टाळ – मृदुंग – चिपळ्या घेत विठूच्या नावाचा गजर करीत मैलन् मैल चालणाऱ्या वारकऱ्यांचं दर्शन आपणा सगळ्यांनाच झालं असेल.. संगीत, नृत्य, गायन, वादन यांचा ‘भक्ती’ शी घातला गेलेला मेळ आगळी – वेगळी अनुभूती देणाराच..!! विठुनामाचा जयघोष करत पंढरी गाठणाऱ्या या माउलींच्या ओठी असणारे अभंग आपल्या सर्वांनाच वेड लावतात.. संतांनी कैक वर्षांपूर्वी केलेल्या रचना.. त्यातून समाजाचे प्रबोधन.. साध्या – सोप्या रसाळ वाणीत केलेले निरुपण यामुळे आजही ताजे वाटणारे असे हे अभंग.. टाळ – मृदुंगाच्या सहाय्याने वारकरी हे अभंग गाऊ लागले कि त्या तालावर आपण नकळतपणे डोलायला लागतो.. हीच आपल्या संतांनी लिहिलेल्या शब्दांतील खरी ताकद म्हणायला हवी..

ज्ञानेश्वर तुकोबांचे शब्द त्याला टाळ मृदुंगाची साथ.. आणि सोबत गिटार, ड्रम्स, तबला, इतकंच नाही तर जॅम्बे, कोहोन यासारखी परदेशी वाद्य.. हे वाचून कदाचित थोडं विचित्र वाटण्याची शक्यता आहे.. कदाचित आम्ही तुमची मस्करी करतो आहोत किंवा फिरकी घेत आहोत अशी शंकेची पाल मनात चुकचुकण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.. पण हे सगळं अगदी खरं आहे आणि हि भन्नाट कल्पना आपल्या समोर येते ती ‘ अभंग Repost ’ या रॉक बॅंडच्या स्वरुपात..
या बद्दल तुम्हाला वाचायला मिळेल शब्दीप्ताच्या येणाऱ्या अंकात..

NO COMMENTS

LEAVE A REPLY