एक हरहुन्नरी कलाकार.. Sumeet Patil याने केला होता एक संकल्प.. कलात्मक हातांना काम देण्याचा.. काय होता त्याचा मानस.. बातचीत केलीये.. शब्दीप्ता च्या टीमने..
पहा काय म्हणाला Sumeet
“गेल्या वर्षी म्हणजे २०१५ साली मी आणि माझ्या तीन अंध मित्र-मैत्रिणींनी मिळून केलेल्या गणपतीच्या सजावटीचे खूप कौतुक झाले.. ज्यांनी केवळ काळा हा रंग पहिला आहे.. त्यांना या सजावटीच्या निमित्ताने मी इतर अनेक रंग दाखवण्याचा प्रयत्न केला..”
“अनेक लोक हि सजावट पाहायला आले होते.. तेव्हा एक मुलगा माझ्या जवळ आला.. आणि मला हातवारे करीत काहीतरी सांगू लागला.. नंतर माझ्या लक्षात आलं कि तो कर्णबधीर होता.. आणि त्याला ते सर्व गणपती आवडलेत असं तो त्याच्या हातवाऱ्यांमधून सांगण्याचा प्रयत्न करत होता.. तेव्हा या गोष्टीची तीव्रतेने जाणीव झाली कि, या उपक्रमाद्वारे या माझ्या तीन अंध मित्रांची कला.. त्यांच्या भावना.. जगासमोर आणल्या खऱ्या; पण यांच्या सारखे असे किती जन असतील कि ज्यांना त्यांच्या भावनांमधून त्यांचा बाप्पा साकारायचा आहे.. त्यावेळी अशी कल्पना समोर आली कि.. जी माणसं.. ज्या कला समाजापासून इतकी वर्ष उपेक्षित राहिले आहेत.. किंवा आत्ता काळाच्या आड गेल्या आहेत.. त्यांना एकत्र आणायचं.. आणि त्यांच्या कडून गणपती तयार करून घ्यायचा..”
“समाजापासून लांब गेलेल्या माणसांचा.. कलाकारांचा.. कलांचा.. अभ्यास करताना लक्षात आलं कि.. हि सर्व इतकी जास्त माणसं आहेत कि यांची कला सदर करण्यासाठी आपण इतका मोठा कॅनव्हास उपलब्ध करून देऊ शकतो का..? मग याचाच विस्तृतपणे विचार करताना १०८ गणपती तयार करण्याचा विचार मनात आला.. १०८ गणपती तयार करणे हि खरंच एक मोठी उडी होती आणि एक मोठी जबाबदारी देखील.. पण मनात या गोष्टींचं समाधान होतं.. कि आपण इतक्या साऱ्या कलाकारांना एक माध्यम उपलब्ध करून देत आहोत.. बाप्पाकडे इतकीच प्रार्थना करतो कि या कलाकारांवर आणि यांसारख्या अनेकांवर तुझं लक्ष असू दे..”
(त्याच्या या उपक्रमाची नोंद Limca Book of Records ने देखील घेतली आहे..)
त्याच्या याच उपक्रमातल्या बाप्पाची लोभसवाणी रूपं..

This slideshow requires JavaScript.

NO COMMENTS

LEAVE A REPLY