Mother’s day / मातृत्व दिन..!!

0
33

मंडळी मे महिन्यातला दुसरा रविवार संपूर्ण जगभर Mother’s day म्हणून साजरा केला जातो.. आपल्याकडे त्याला काही लोक मातृत्व दिन असंही म्हणतात.. तसं पहायला गेलं तर हा दिवस पाश्चिमात्य संस्कृतीच्या संस्कारांची आठवण करून देणारा ठरतो.. कारण मुळात एखाद्या नात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशिष्ट एखादा असाच दिवस कसा पुरावा हा आपल्याकडच्या लोकांचा युक्तिवाद..!! अरे पण मग आपण इतर दिवशी ; नेहमीच्या रहाटगाडग्यात आपल्या आईला – वडिलांना – शिक्षकांना – गुरूंना कृतज्ञतेची झालर असलेल्या काही शब्दांची भेट देऊन त्यांच्या कार्याला, नात्याला, प्रेमाला, शिकवणुकीला सलाम केलाय का..? पाहावे आपणासी आपण..

मंडळी त्यामुळे Mother’s day, Father’s day हे पाश्चात्यांचे खूळ आहे.. आमच्या आई-वडिलांचे आभार मानायला असले कोणते दिवस आम्हाला नको आहेत.. आमच्या संस्कृतीत ते बसत नाही.. अशी फुकाची टिमकी वाजवण्यापेक्षा उद्या आपल्या आईला समोर बसवून तिला सांगूयात..

“आई, तुझ्या आजपर्यंतच्या संस्कारांमुळे माझी जडण-घडण झाली आहे.. आणि त्यामुळेच मी आज इथपर्यंत यशस्वीरीत्या येऊ शकलोय.. आज मी जो कोणी आहे; तो फक्त तू आणि पप्पा.. तुमच्या दोघांमुळेच.. तुमची साथ मला तुमच्या-माझ्या शेवटापर्यंत अशीच हवी आहे.. मी कधीच तुम्हाला अंतर देणार नाही..” बघा ती माऊली धन्य धन्य होईल..!!

written by डॉ. तुषार प्र. पवार as शुभऋष् for शब्दीप्ता eMagazine

image courtesy, colourbox

NO COMMENTS

LEAVE A REPLY