भारतीय तत्त्वादर्शांचा प्रमाणग्रंथ म्हणून, विमनस्क होऊन स्वकर्तव्य विसरलेल्या अर्जुनाला बोध करण्याच्या निमित्ताने, भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या भगवद् गीतेची गणना होते. या ग्रंथात कर्म, ज्ञान, भक्ती, सद्गुण, दैवी-असुरी संपत्ती, आत्मस्वरूप झालेल्या महानुभवांची लक्षणे, योग अशा असंख्य बाबींचा सुरेख ऊहापोह केलेला दिसून येतो. यातील अठरा अध्यायांना ‘ योग ‘ याच नावाने संबोधले जाते. श्रीगीतेचे माहात्म्यच असे आहे की, इथे अर्जुनाचा स्वजनांशी लढावे लागणार म्हणून बळावलेला विषाद ही ‘ योग ‘ या संज्ञेला पात्र ठरलेला आहे. ही आमच्या भारतीय विचारदर्शनाची प्रगल्भता आहे..

रोहन विजय उपळेकर याच्या लेखणीतुन साकारलेलं हे लेखन पुष्प.. हा लेख आपल्याला वाचायला मिळेल शब्दीप्ताच्या संकष्टी ज्येष्ठ २०१६ या अंकात.. संपूर्ण अंकासाठी येथे click करा..

NO COMMENTS

LEAVE A REPLY