महेश दादाचं बालपण..

दादा तुझ्या अगदी लहानपणीचा एक किस्सा आहे.. तू अगदी तीन एक वर्षांचा होतास बघ.. तेव्हा काहीतरी ४-५ हजारांच्या जमावासमोर गायला होतास ना.. ए दादा काय होता रे तो किस्सा.. सांग ना..!!

अरे.. काय झालं होतं कि, गोंदवल्याला माझ्या बाबांची सेवा होती.. आणि त्यानिमित्ताने आम्ही तिथे गेलो होतो.. तेव्हा एका पहाटे ४:३० वाजता बाबांनी मला उठवलं.. आंघोळ घातली.. आणि छान तयार केलं.. आम्ही तिथल्या ‘आईसाहेब मंडप’ मध्ये गेलो.. मी त्या व्यासपीठावर जाऊन बसलो.. माझ्या गळ्यात टाळ आले.. वरून एक माईक खाली आला.. आणि मी महाराजांचाच “देवपूजा माझी देवपूजा..” हा अभंग गायलो.. आणि कसं असतं ना अरे, त्या वयात ना खरंतर आपल्याला काही फरक पडत नाही.. कुठे गात आहात.. किती लोकं आहेत.. या गोष्टींचं भानच नसतं मुळी.. तुम्ही आपले गाता.. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट करताना.. त्यात रमतो.. तेव्हा त्याचा खरा उद्देश काय आहे याच्याशी आपल्याला काही देणं-घेणं नसतंच मुळी.. आपल्याला फक्त आनंद मिळत असतो.. आणि तेव्हा मलाही तो तसा मिळत होता.. मला नंतर काही लोक म्हणाले कि, अरे वा.. काय भारी गायलास.. ५ हजार लोकांसमोर गायलास वगैरे.. तेव्हा मला वाटलं कि, मी काहीतरी भारी केलंय.. पण मला खरंच तेव्हा तिथे जमाव कितीचा होता.. आणि मी किती छान गायलो या पेक्षाही तिथे लोकांनी मला जे लाडू-पेढे दिले.. अकरा रुपये दिले.. माझे गालगुच्चे घेतले गेले.. त्यातच धन्यता वाटली होती..

महेश दादा.. तुझी आई मीनल काळे या गाण्याच्या सच्च्या उपासक.. आणि प्रख्यात गायिका श्रीमती वीणाताई सहस्त्रबुद्धे यांच्या शिष्या.. वयाच्या अवघ्या ५-६ वर्षापासून तू आईकडे गाण्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली होतीस.. शास्त्रीय शिक्षणाची नांदी घरातच झाली असेल ना रे..?

हो जसं तू म्हणालास.. नांदी घरातच झाली.. माझी आई गाण्याचे क्लास घ्यायची.. तेव्हा तिने शिकवलेल्या बंदिशी माझ्याही कानावर अनेकदा पडायच्या.. मी त्या अश्याच बडबडगीतांसारख्या गुणगुणायचो.. एकदा आई तीच्या शिष्यांना एक बंदिश शिकवत होती.. कुकरची शिट्टी झाली म्हणून ती किचन मध्ये कुकर बंद करायला गेली होती.. तेव्हा मी ती बंदिश म्हणत असलेली तिने ऐकली.. तेव्हा तिला वाटलं कि, हा नुसताच म्हणत नाहीये तर ताला-सुराचं देखील अंग याला आहे.. आपण याला रीतसर शिकवायला हवं.. आणि मग तेव्हा पासून गाण्याचं व्याकरण माझ्या आईने माझ्याकडून घोटवून घेतलं..

गुरुकुल पद्धतीतलं शिक्षण..

महेश दादा तुझे गुरु पं. जितेंद्र अभिषेकी बुवा.. अभिषेकी बुवांना घराण्यांची बंधनं कधीच अडवू शकली नाहीत.. त्यांची गायकी एका विशिष्ट घराण्याचं प्रतिनिधित्व करणारी नव्हतीच मुळी; आज तुझ्याही गायकी मध्ये हि गोष्ट पाहायला मिळते.. हे संस्कार बुवांकडून झाले..? काय सांगशील..?
अर्थातच.. कारण त्यांची गायकी त्यांनी वेगवेगळ्या घराण्यांच्या बलस्थानातून निर्माण केलेली होती.. आणि तीच गायकी त्यांनी मला शिकवली.. आणि जशी गायकी शिकवली.. तसंच त्यांनी हे हि शिकवलं कि.. स्वतंत्र विचार करून तुम्ही तुमचे विचार मांडा.. कसं आहे बघ.. आपल्याला जसं आपले वडील एखादी philosophy शिकवतात.. आणि आपण ती आपल्या आयुष्यात कशी लागू होईल याचा विचार करून ती तशी अंमलात आणत असतो.. तसंच अभिषेकी बुवांनी मला जी गाण्याची philosophy शिकवली ती मी माझ्या गाण्यावरती कसं apply करता येईल असा विचार करून गातो..

दादा पंडितजींनंतर आज शौनकजींचं मार्गदर्शन तुला लाभत आहे.. शौनक दादा बरोबरच तुलाही गायनाचे धडे मिळाले आहेत.. म्हणजे तुम्ही एका बैठकीत ते धडे घेतले आहेत.. आज तू शौनक दादाला तुझ्या गुरुस्थानी पाहू शकतोस का..?

of course.. अरे.. मुळात तो गाण्यामध्ये फार सिनियर आहे मला.. आणि मी जेव्हा अभिषेकी बुवांकडे शिकत होतो.. तेव्हाही मी त्याच्या कडे खूप शिकलोय.. आणि अरे त्याच्याचकडे काय तर मी बुवांकडे येणाऱ्या प्रत्येक शिष्याकडून शिकायचो.. मी बुवांचा सर्वात लहान शिष्य होतो.. यामुळे मला अगदी राजा भाऊंपासून ते पेंडसे काकांपर्यंत सगळ्यांकडून शिकायला मिळालं.. मी त्यांच्या समोर बसून रियाज करायचो.. माझ्या चुका त्यांनी वेळोवेळी मला दाखवून दिल्या आहेत आणि मी त्यात आवश्यक त्या सुधारणा करायचो.. आणि पुन्हा त्यांना ऐकवायचो.. बुवांना ऐकवायचो.. त्यामुळे अर्थातच मी या सगळ्यांना आणि शौनक दादालाही गुरुस्थानी पाहू शकतो..

कट्यार आणि दादा..
दादा.. आज “कट्यार काळजात घुसली” या संगीत नाटकाला तुम्ही पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या स्तरावर.. व्यावसायिक रंगभूमीवर आणलंत.. हा शास्त्रीयचा ठेवा पुढच्या पिढीकडे सोपवण्याचा प्रयत्न होता..? आणि तो आज कितपत यशस्वी झाल्याचं जाणवतं..
?

खूप यशस्वी झाला.. कारण बघ ना.. अनेक mainstream प्रसारमाध्यमांनी याची दखल घेतली.. झी मराठी सारख्या वाहिनीवर ते एकदा नाही तर अनेकदा दाखवलं गेलं.. आणि जेव्हा अश्या एखाद्या प्रसारमाध्यमावरून ते प्रसारित होतं तेव्हा त्याचा unleash खूप मोठ्या पद्धतीने होतो.. कारण आम्ही १०० प्रयोग केले.. सगळे हाऊसफुल झाले तरी आम्ही सरासरी एक लाखभर लोकांपर्यंत पोहोचलो.. पण जेव्हा ते TV वर दाखवलं गेलं.. तेव्हा ते लाखो करोडो लोकांच्यापर्यंत जाऊन पोहोचलं.. त्यांच्या घरात जाऊन वाजलं ते.. आणि त्यातनं आता आम्हाला.. परिणामी मला जे प्रेम मिळतंय.. fan following मिळतंय.. त्या आकड्यावरून लक्षात येतं कि किती यशस्वी झालंय ते.. अगदी अश्यातच ऑगस्टमध्ये कल्याणला माझा एक कार्यक्रम होता.. तिथे एक मुलगी मला भेटायला आली होती.. तिचा जन्म साउथ आफ्रिकेचा.. पण तिचे बाबा मराठी आहेत.. त्यांनी तिला कट्यार ची DVD दिली होती.. ती पाहून.. त्यातलं अरुणी-किरणी तिला आवडल्याचं ती सांगत होती.. आणि म्हणून खास भेटायला आली होती.. म्हणजे बघ कुठे कुठे पोहोचलंय कट्यार..

 

आंतरराष्ट्रीय ओळख..

दादा तू किती ताकदीचा आणि अभिजात शास्त्रीय गायक आहेस हे आम्हाला माहित आहेच.. पण तू तितक्याच ताकदीने western songs हि गातोस.. तू nobal आहेसच.. आणि तुझ्यातला हा nobalness च तुला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यात कारणीभूत ठरला आहे.. काय सांगशील..?

सगळ्यात महत्वाचं म्हणजे.. मी किती ताकदीचा किंवा अभिजात गायक आहे किंवा nobal आहे यातल्या कुठल्याच गोष्टीला माझं स्वतःचं असं काहीच क्रेडीट नाहीये ना.. ताकद जी दिलीये, ती परमेश्वराने मला जन्माला घालतानाच दिलीये ना.. आणि त्यानंतर त्याची जी मशागत करायची होती ती माझ्या आई-वडिलांनी त्यांच्या संस्कारांतून आणि मग नंतर अभिषेकी बुवांनी संगीताच्या संस्कारांतून केली.. माझ्या गाण्यात तुला जी ताकद दिसत असेल ती त्यामुळे आहे.. आणि तू म्हणालास ना.. कि शास्त्रीय आणि western मी equal ताकदीने गातो.. तर मी दोन्हीमध्ये equally रमतो.. कारण तू मला खेळ खेळताना जरी बघितलंस ना.. तरी तो मी तितक्याच तन्मयतेने खेळतो.. मुळातच मला असं वाटतं कि एकच आयुष्य आहे आपलं.. तर त्या आयुष्यामध्ये तेवढ्याच गोष्टी कराव्यात ज्या आपल्याला खूप आवडतात.. आणि मला खूपच गोष्टी अश्या खूप आवडण्यासारख्या आहेत.. मला travel करायला खूप आवडतं.. मला स्पोर्ट्स खूप आवडतात.. मला nature मध्ये राहायला आवडतं.. hiking करायला आवडतं.. मला जगभरातलं संगीत ऐकायला खुप आवडतं.. वेगवेगळ्या museums मध्ये जायला आवडतं.. आता हे आवडतं मला.. त्यामुळे मी त्यात रमतो.. आणि एकदा का तुम्ही त्यात रमलात.. कि तुम्हाला त्यात आनंद मिळायला लागतो.. आणि तुम्हाला येत असलेला आनंद लोकांनाही आनंद देऊन जातो.. इतकं सोप्पं आहे ते..!!

दादा तू classical प्रमाणेच fusion concert हि केल्या आहेस.. तुझं काय मत आहे.. शास्त्रीय आणि western यांचं fusion करण्याबाबत..

मला असं वाटतं.. कि fusion हा ट्रेंड कुणी कितीही नाकारला तरी तो न टाळता येण्यासारखा आहे.. म्हणजे जसं चायनीज प्रोडक्ट्स भारतात येऊ नयेत असं कुणीही कितीही म्हंटलं तरी ते येत राहतात.. तसं आहे ते.. कारण जग आज छोटं झालंय.. आणि मुळात ना fusion चा खरा अर्थ काय आहे हे आपण लक्षात घ्यायला हवंय.. दोन वेगवेगळे संगीत प्रवाह त्यातील दोन व्यक्ती एकत्र येऊन एक vocabulary तयार करतात.. आणि ती दोघांच्या संमिश्र भावनांमधून तयार झालेली असते.. तसं बघायला गेलात तर मग तबला.. आणि सुरांची भाषा वेगवेगळी आहे.. तबल्याची भाषा धा-धीन्-धीन्-धा आहे आणि सुरांची भाषा सा-रे-ग-म-प-ध-नी आहे तरीही ते सुद्धा एकत्र नांदतातच ना.. तर अशी एखादी vocabulary आपण शोधली कि, ज्याच्यातनं एकत्र नैसर्गिकरीत्या नांदता येईल.. आणि मग तेव्हा त्याला अशी बंधनं नसावीत कि हे शास्त्रीय संगीत आहे.. हे western आहे आणि त्यामुळे याचं fusion आपण करू नये.. हे कुणी ठरवावं.. हे खूप subjective आहे नाही का.. मला कुठली भाजी आवडते.. आवडत नाही हे मी ठरवणार ना.. आणि आत्ता ना आपलं आयुष्य ज्या ठिकाणी येऊन पोहोचलंय.. त्या ठिकाणावर येऊन तर असा विचार करणं अजिबात योग्य नाहीये.. आत्ता आपण मंगळावर जाण्याच्या तयारीत आहोत.. आणि जर का तिकडच्या जीवसृष्टीतल्या संगीतासोबत आपलं संगीत एकत्र केलं तर ते fusion असेल.. कारण आपलं आणि तिकडचं communication च साधन वेगळं आहे.. आणि पृथ्वीवरती जी सगळी लोकं राहतात.. त्यांच्या भावना तर सारख्याच असतात ना.. मग ती indian असोत वा western.. आनंद झाला तर सगळे हसतातच.. दुखः झालं तर रडतातच.. मग भेदभाव कशाला बघायचे आपण.. जे आपले emotions आहेत.. त्या emotions करता एकत्र मिळणारे धागे शोधावेत आपण.. आणि त्या धाग्यांमधून काही चांगलं आलं तर काय हरकत आहे.. जरूर करायला हवंय.. फक्त ते कुणीतरी fusionची concert ठेवलीये म्हणून जाऊन.. पैश्यासाठी गाण्यात काय अर्थ आहे.. त्यामुळे त्याचा मूळ उद्देश लक्षात घेऊन नि:खळ आनंदासाठी गायला काहीच हरकत नाही.. नाहीतर मग शास्त्रीयची मैफल पण तितकीच वाईट होईल जितकी fusion concert..!!

अगदी अश्यातच तुझ्या “मल्हार” या कार्यक्रमात तू कर्नाटकी धाटणीचा अमृतवर्षिनी राग गायला होतास.. वास्तविक पाहता तू हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गाणारा गायक आहेस मग तरीही कर्नाटकी धाटणीचा राग..? म्हणजे अशी काही बंधनं असतात.. नसतात..

अरे आपण कर्नाटकी डोसा खातोच ना.. मग कशाला ठेवायची बंधनं..? इडली-डोसा खातो आपण.. पनीर टिक्का खातो.. खातो कि नाही.. मग पंजाबी भांगडा किंवा गीद्दा हे संगीत का गाऊ नये..? त्यातूनही आनंदच मिळतो ना.. गाणाऱ्याला आणि ऐकणाऱ्यालाही.. आणि हे बघ एखादी गोष्ट आवडती.. तर तिची जात, पात, धर्म, वर्ण हे सगळं बघून आवडत नसते ना.. आतमध्ये काहीतरी वाटतं ना.. म्हणून आवडते.. आणि तसं जेव्हा-जेव्हा मला आतून वाटतं तेव्हा-तेव्हा मी ते गातो.. हे बघ.. हेच गावं.. किंवा हे गाऊ नये हा ‘कूप मंडूक न्याय’ आहे आणि मला तो मान्य नाही.. आता आहे मी असा.. काय करायचं..

 

सुगम आणि दादा..

दादा ज्याप्रमाणे शास्त्रीय संगीताचं शास्त्रशुध्द शिक्षण दिलं जातं.. त्याचप्रमाणे सुगमचेही classes घेतले जातात.. या दोनही गोष्टी एकमेकाला पूरक आहेत..?

हो.. काही प्रमाणात.. पण म्हणजे तुम्ही शास्त्रीय शिकलात कि तुम्हाला सुगम गाता येतंच असं नाहीये बरं का ते.. म्हणजे बघ.. जसं science म्हंटलं तरी त्यात physics – biology – chemistry असे वेगवेगळे विषय असतात.. तसंच संगीतामधले हे वेगवेगळे विषय आहेत.. आणि सुगम चं शिक्षण घेतलेल्याला एखाद्याला एखादी बंदिश खुलवताना.. त्यातली साहित्याची बाजू समजून घेतल्याने फायदाच होतो.. त्यातले भाव अगदी चपखल पणे पकडता येतात.. आणि जर कोणी मोठा व्यक्ती हे सुगमचं शिक्षण देत असेल, तर ते जरूर घ्यावं..

दादा आम्हाला, तुला सुगम संगीत गाताना ऐकायचंय.. तू तसा फक्त सुगम संगीताचा कार्यक्रम कधी करणारेस का..?

का नाही करणार.. आवडेल मलाही.. पण फक्त सुगम संगीताचाच कार्यक्रम करावा असा का हट्ट आहे.. मला जर स्फुरलं तर मी नक्की करीन.. नेहा.. मी माझ्या आयुष्यात जे माझ्या आतनं वाटतं.. जे मला स्फुरतं त्याला मी respond करतो.. मी असं फार काही ठरवून वगैरे.. किंवा हा program चांगला चालेल या पद्धतीने काहीहि करत नाही.. आतून स्फुरेल तेव्हा करीन.. मला आवडतातच ना कारण हि गाणी.. मला लतादीदींची.. आशाताईंची.. सुधीर फडकेंची.. हृदयनाथ मंगेशकरांची.. माणिक वर्मांची.. या सगळ्यांची गाणी प्रचंड आवडतात.. मी सतत गुणगुणत असतोच.. निज माझ्या नंदलाला.. जिवलगा.. या चिमण्यांनो.. संथ वाहते कृष्णामाई.. त्यामुळे मला आवडेल नक्कीच.. फक्त काय आहे ना माझ्या तालमीमुळे.. माझे विचार आणि मेहनत हि शास्त्रीय – उपशास्त्रीय – नाट्यसंगीत आणि अभंग याच्यावरती जास्त झाली आहे.. पण मला आवडेल.. मला संधी मिळाली तर मला जरूर करायला आवडेल..

 

Online couching..
दादा तू audio किंवा video blog कधी सुरु करणार आहेस..?

वेळ मिळाला कि.. मला आवडेल खरंतर करायला.. आणि काय होईल मी एकदा तो ब्लॉग तयार केला कि परत परत लोकांना ऐकता येईल.. कादंबरी किंवा सिनेमा सारखं आहे ते.. सारखं सारखं वाचता पाहता येतं.. पण शास्त्रीय संगीत हे क्रिकेट च्या मॅच सारखं असतं.. एकदा खेळली कि झाली.. परत खेळताना पुन्हा नव्याने पॅड बांधून मैदानात उतरावं लागतं.. तर मला आवडेल या माध्यमातून शिकवायला.. फक्त त्याचा audience कसा असेल.. मी ते कोणाला मध्यवर्ती ठेऊन करणार याची clarity आली कि मी नक्की सुरु करेन.. आणि याबाबतीत तुम्हाला जर का मला काही suggestions द्यायच्या असतील.. तर जरूर द्या.. आपण विचार करूयात त्यावर..!!

 

पथ्यपाणी आणि गाणं..

एका गायकाने अमुक एक गोष्ट खाऊ नये.. किंवा या गोष्टींचं पथ्य पाळावं असं काही सांगता येतं का..? आणि या गोष्टी कितपत महत्वाच्या ठरतात..?

मला असं वाटतं कि.. प्रत्येकाच्या बाबतीत या गोष्टी वेगवेगळ्या असतात.. मला काय पथ्य पाळावं लागतं हे मला माहितीये.. असं काही नाहीये कि गार खाल्याने सगळ्यांचाच घसा बसतो.. त्यामुळे प्रत्येकाने आपली प्रकृती ओळखावी.. उगाच दुसरा काहीतरी म्हणतोय म्हणून ते पाळण्यात काय अर्थ आहे.. प्रत्येक व्यक्तीच्या कपड्यांच्या साईज देखील वेगवेगळ्या असतात.. माझा t-shirt कुणा ७ फुटी माणसाला बसेल का..? तसंच प्रत्येकाचा गळा वेगळा असतो.. आपल्या गळ्याची मशागत कशी करायची.. हे प्रत्येकाने स्वतः आत्मकेंद्री होऊन पडताळण्याची गरज आहे..

 

MKSM..

महेश काळे स्कूल ऑफ म्युझिक (MKSM) ची स्थापना करण्यामागचा उद्देश काय होता..? आणि आज तो सफल होताना दिसतो का..? आणि San Francisco येथे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे देणारा शिकवणी वर्ग सुरु करावा असं का वाटलं..?

माझी स्वप्न खूप मोठी आहेत.. त्यामुळे अजून तो सफल झालाय असं मला वाटत नाही.. पण काम नक्की सुरु झालंय.. या दहा वर्षात इकडे अमेरिकेत एक पाच-सात हजार लोक आत्तापर्यंत येऊन माझ्याकडून शिकून गेलीयेत.. आजही माझ्याकडे २५०-३५० active students आहेत.. मला असं वाटतं कि शिकवण्याची कला मला आता चांगली गवसली आहे.. आणि त्यातून जो आनंद मला मिळतोय.. तो इतरांबरोबर शेअर करावा.. इतका साधा उद्देश होता त्यामागे.. आणि दुसरं म्हणजे सामाजिक बांधिलकी म्हणून देखील.. म्हणजे बघ आपल्याकडे पिढीजात जे देव असतात.. ते पुढच्या पिढीकडे आपण देत राहतो.. तसंच आहे हे पण.. आपलं जे परंपरागत आणि अभिजात.. पिढीजात संगीत आहे ते.. पिढ्यान-पिढ्या हस्तांतरित व्हावं.. आणि त्यात माझा हातभार लाभावा.. हा देखील उद्देश होता त्यामागे.. स्वर आपलं गायकांचं दैवत आहे.. तर त्याची पूजा कशी करायची हे देखील आपणच शिकवायला हवंय मुलांना.. आणि ती माझी जबाबदारी आहे असं मला वाटतं.. आणि रमतात मुलं माझ्याकडे.. माझ्या concerts ला workshops ला लहान मुलंच जास्त असतात.. आणि त्यांना आनंद मिळतो यात.. नंतर देखील त्यावर बरंच काही बोलणं घडत असतं.. मुलं मला त्यांच्या शंका विचारतात.. whatsapp चे groups आहेत अनेक.. त्यावर नेहमी चर्चा घडत असतात.. याचं स्वरूप देखील आता हळू-हळू विस्तारत चाललंय.. मला काय वाटतं सांगू का ____.. ज्याप्रमाणे अरजित च्या concerts ला गर्दी होती तशीच ती आपल्या अभिजात संगीताच्या concerts ला देखील व्हावी.. असे काही प्रांजळ हेतू मनात घेऊन मी त्यासाठी काम करतोय..

 

राष्ट्रीय पुरस्कार आणि दादा..

तुला २०१५ चा ६३वा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.. त्यानंतर शास्त्रीय संगीताचा नवीन पिढीतला आवाज या जबाबदारीने तुझ्याकडे पाहिलं जातं.. तुला आज गाताना या गोष्टीचं दडपण येतं..?

आजीबात नाही.. दडपण कशाला. आनंद आहे.. हे बघ मी राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याच्या आदल्या दिवशी जसा गात होतो तसाच त्यानंतर हि गातोय.. आणि जसा गात होतो त्यावरच तर मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ना.. J आता हेच बघ.. ऑगस्ट मध्ये माझा नेस गरवारेला कार्यक्रम होता.. तिथे प्रचंड गर्दी झाली होती.. तेव्हा मी सांगितलं कि तरुण मंडळींनी उभं राहावं.. आणि प्रौढांना बसायला जागा द्यावी.. आणि काही वेळाने तर त्या मुलांना मी stage वरच बसायला बोलावलं.. भारतीय बैठकीत.. ८ ते १५ वयोगटातली हि सगळी मुलं होती.. मी तेव्हाही एक तासाभराचा ख्याल गायला.. आणि मी त्या मुलांना विचारत होतो आधे-मध्ये.. बोर तर नाही होत ना.. तर ती रमली होतीत मस्त.. आणि अगदी छान डोलत होती.. माझं गाणं ऐकून ती छान डोलतायत.. मला आनंद आहे.. आणि हे बघ जबाबदारीची मला जाण आहे.. मला कळतंय माझ्याकडे जबाबदारी आहे.. पण त्याचं दडपण नाहीये.. चांगलं काम करायचं कसलं आलंय दडपण.. म्हणजे जो एक adrenaline rush असतो.. perform करायच्या आधीची जी एक anxiety असते.. ती आहे मला.. पण त्याचं दडपण म्हणजे ओझं नाहीये मला.. हां.. pressure आहे..  म्हणजे खालच्या बाजूने pressure लावलं कि तुम्ही उडता वरती आणि स्वार होता.. तसं आहे ते.. खाली दाबणारं pressure नाहीये ते.. आणि ते गाण्याच्या बाबतीत कधीच येणार नाही मला.. आपण जसं म्हणतो knowledge liberates.. तसंच मला असं वाटतं कि.. music also liberates.. तुम्हाला एकदम हवा झाल्यासारखं वाटतं.. तुम्ही तरंगायला लागता..

 

Dada.. Asking for More..

महेश दादा
“Feel the content but ask for more” ही आमची Tagline.. ज्याप्रमाणेशब्दीप्ता Magazine’ नेहमीच जास्तिची अपेक्षा करतं.. त्याप्रमाणे कट्यार चा राष्ट्रीय पुरस्कार विजेता गायक महेश काळे स्वत:कडून अश्या कोणत्या जास्तिची अपेक्षा करतो..?

मला ना जसं कट्यार नाटकासाठी.. चित्रपटासाठी.. जसे दर्जेदार partners मिळाले तसेच ते या पुढेही मिळत राहावोत.. अशी खूप लोकं आहेत.. ज्यांच्याबरोबर मला काम करायला आवडेल.. आणि ज्या लोकांना आपण दैवतं मानतो त्यांच्या समोर कला मांडायला मला खूप आवडेल.. मला लता दिदींसमोर गायला प्रचंड आवडेल.. मला माहित नाही त्यांनी माझं गाणं ऐकलंय कि नाही पण मला त्यांच्या कडून मार्गदर्शन घ्यायला आवडेल.. at the same time.. मला A. R. Rehman अजय-अतूल यांच्या सोबत काम करायला आवडेल.. कारण त्यांचं संगीत मला खूप आवडतं.. आणि हि अपेक्षा नाहीये.. हि इच्छा आहे.. कारण आता मला पुरस्कार मिळालाय.. म्हणजे मला काही शिंगं वगैरे फुटलीयेत असं नाही ना.. फक्त आता उपलब्धी बऱ्यापैकी असेल.. म्हणजे.. आता कोण महेश काळे हे सांगणं जरा सोपं होईल.. आणि मला असं वाटतं कि हा एक launch board असू शकतो.. लांब उडी मारण्यासाठी.. उंच झेप घेण्यासाठी.. गगनभरारी घेऊन मला ती प्रतिभेची उंची गाठायचीये.. मी compositions हि करतो.. त्यामध्ये मला ती creativity ची उंची गाठायचीये.. आणि तो एक फार वेगळा अनुभव आहे.. कारण कसं होतं.. दुसऱ्याची चाल ऐकून तिचं आकलन होऊन आपण एखादं गाणं गात असतो.. पण एखादी चाल निर्माण करून ती मनाच्या आत जायला लागते ना.. तो फार वेगळा अनुभव आहे.. तो अनुभव घ्यायला मला आवडेल.. मला लहान मुलांना.. किंवा young, professional तसंच प्रौढांनाही शिकवायला आवडेल.. संगीताचे धडे द्यायला आवडतील.. ते काम तर फार मोठं काम आहे.. आणि ते मला अविरतपणे करायला आवडेल मला..!!

NO COMMENTS

LEAVE A REPLY