Home मुलाखती अभिनिवेष अभिनिवेष- अभिषेक देशमुख

अभिनिवेष- अभिषेक देशमुख

अभिनिवेष- अभिषेक देशमुख
अभिनिवेष - अभिषेक देशमुख
अभिषेक, तूझा अभिनय पाहता तू खूप आधीपासून या क्षेत्रात काम करतोयंस असं जाणवतं.. तुझ्यावर अभिनयाचे हे संस्कार बालपणीच झाले..? काय सांगशील..? वास्तविक पाहता माझा बालपण जळगावसारख्या निमशहरी भागात गेलं.. पण लहानपणापासूनच मी अभ्यासा-व्यतिरिक्त इतरही गोष्टींमध्ये सक्रीय सहभाग घ्यायचो.. वक्तृत्व स्पर्धा वगैरे.. मी तेव्हा काही बालनाट्यांमधेही काम केलं होतं.. “इथे भुते राहतात”, “दुर्गा झाली गौरी” वगैरे.. मी आत्ता जे करतोय त्यासाठी पूरक गोष्टी लहानपणापासूनच करत आलोय.. आणि त्यासाठीच पोषक वातावरण मला माझ्या घरातूनच मिळत आलंय.. आणि माझ्या आई-बाबांनी ते आजतागायत निक्षून राखलंय.. खरंतर मी पाच वर्षांचा असताना माझ्या आयुष्यातली पहिली नाट्यछटा केली.. तेव्हा मी पहिल्यांदा एकटा काहीतरी करत होतो.. आणि मला माझ्या आयुष्यातला पहिला पाठही तेव्हाच शिकायला मिळाला.. जेव्हा तुम्ही मनापासून काहीतरी सांगायला जाता.. व्यक्त होत असता.. तेव्हा लोकांना ते आवडतं.. हे मला पाच वर्षांचा असताना कळलं.. कॉलेजमध्ये असतानाचं तुझं acting career कसं होतं..? खरंतर मी तेव्हा अभिनयामध्ये जास्त सक्रीय नसायचो.. आमच्या कॉलेजच्या संपूर्ण schedules मधून आम्हाला तितका वेळच मिळायचा नाही.. (By the way मी आर्कीटेक्ट आहे) त्यामुळे पुरुषोत्तम फिरोदिया कधी करायला नाही मिळाला.. आणि ज्याची एक खंत माझ्या मनात आहे.. पण दरम्यानच्या काळातही माझं लिखाण मात्र चालूच होतं.. मी उत्तम सिनेमे पाहायचो.. पुस्तकं वाचायचो.. स्वतःमधल्या कलाकाराला अजून प्रगल्भ करण्याच्या दृष्टीने खाद्य पुरवत राहायचो.. त्यानंतर २०१२-१३ साली आम्ही पुण्यात आलो.. राज्यनाट्य स्पर्धेत भाग घेतला.. नाटकं लिहिली-बसवली.. प्रायोगिक नाटकांच्या वातावरणात मी राहायला लागलो.. एकूणच कि पुण्यात आल्यावर माझ्यातल्या सुप्त कलागुणांना व्यक्त व्हायला एक साधन मिळालं असं म्हणता येईल.. झी-मराठीवाहिनी वरील पसंत आहे मुलगीमालिकेत तू पुनर्वसू पंत सचिव हि भूमिका साकारतोयस.. काय सांगशील, एकूणच अनुभव कसा आहे..? तसं पहायला गेलं तर माझी अन् तुम्हा रसिक प्रेक्षकांची ओळख तशी नवीनच.. पण ती ज्या माध्यमातून झालीये त्यावरून तरी, आता पुढची काही दशकं यशस्वीरित्या टिकवता येईल असं मी खात्रीने म्हणू शकतो; कारण सध्याच्या Daily soaps च्या काळात नेहमीच नवनवीन संहितांवर मालिका करण्यावर भर देणा-या ‘झी-मराठी’ वाहिनीच्या माध्यमातून मला सर्व रसिक प्रेक्षकांशी संवाद साधण्याची संधी मिळतिये.. खरंतर मी अगदी लहाणपणापासून कला क्षेत्रात काम करतोय; बालनाट्य, हौशी रंगभूमी, प्रायोगिक तत्वावरची नाटकं, एकांकिका या वेगवेगळ्या माध्यमातून मी नेहमीच स्वत:ला सिद्ध करत आलोय… परंतु प्रतीक्षा होती ती एका घसघशीत संधीची, जी ‘झी-मराठी’ च्या रुपाने माझ्या आयुष्यात आली. ‘पसंत आहे मुलगी’ या मालिकेसाठीच्या audition ला मी गेलो.. Auditions आणि नंतरच्या screen tests पार करुन मी पुढे गेलो आणि मालिकेतील ‘पुनर्वसु पंत सचिव’ या भूमिकेसाठी माझ्या नावावर शिक्कामोर्तब झाला. खरोखरच स्वप्नवत वाटणारा हा प्रवास.. आणि मी आवर्जून सांगु इच्छितो, की या संपूर्ण प्रवासात माझी आई (वैशाली देशमुख) वडील (सतीश देशमुख) आणि माझी लहान बहीण (अमृता देशमुख) नेहमीच माझ्या बरोबर होते.. झी मराठी चा प्रेक्षकवर्ग मोठा आहे.. तुम्ही रोज घरा-घरात एका ठराविक वेळी जात असता.. आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक प्रसंगांमध्ये त्यांच्या बरोबर वावरत असता.. त्यामुळे तुम्ही त्यांना त्यांच्या घरातलेच वाटता.. हि भावना मला खूप मस्त वाटते.. तुझी सहअभिनेत्री रेशम प्रशांत हिच्या बरोबर काम करतानाचे काही अनुभव.. आणि तुझ्या सेट वरच्या एकूणच वातावरणाबद्दल काय सांगशील..? रेशम आणि मी आम्ही दोघंही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत.. संहिता वाचनापासूनच आम्ही एकमेकांच्या कामाबद्दल खूप particular असतो.. आमच्या दोघांच्याही.. उणीवा आणि जमेच्या बाजू आम्हाला एव्हाना माहित झाल्यात आणि आम्ही त्यांना अगदी योग्य रीतीने वापरतोय.. सेट वरच्या एकूणच वातावरणा बद्दल बोलायचं झालं तर.. अनेक प्रतिथयश अभिनेत्यांचं मार्गदर्शन आम्हाला सेट वर मिळतं.. लोक तिथे आमच्या कामाचं कौतुकहि करतात आणि प्रसंगी कानही खेचतात.. अगदी मैत्रीपूर्ण वातावरण असतं सेट वर.. पुनर्वसु पंत सचिवया भूमिकेसाठी तुला काही खास तयारी करावी लागली होती का..? हो खरंतर.. हा पुनर्वसु अभिजात साहित्याचा आणि भाषेचा वारसा लाभलेल्या कुटुंबातील असल्याने.. आणि त्याच्या शिक्षणाच्या अपेक्षेचा भाग असल्याने मला उत्तम संस्कृत येणं अपेक्षित होतं.. माझं संस्कृत अगदीच कच्च होतं अश्यातला भाग नाही पण भूमिकेला अपेक्षित इतपत चांगलं नव्हतं.. त्यामुळे मला बराच अभ्यास करावा लागला.. संस्कृत वाचनावर भर देऊन वाचिक अभिनय सुधारण्याच्या दृष्टीने मी बरेच कष्ट घेतले.. तुझ्या acting career मध्ये अमृता चा सहभाग कसा असतो.. स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘तुमचं आमचं सेम असतं’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसलेली गौरी प्रधान (अमृता देशमुख) ही माझी लहान बहीण… श्रेयस तळपदेंच्या Affluence सारख्या आघाडीच्या Production house साठी काम करायला मिळणं ही काही साधी-सुधी गोष्ट नाही.. तिने तिच्या कामातून स्वतःला नेहमीच सिध्द केलंय.. माझ्याही कामाबद्दल ती खूप perticular असते.. तटस्थपणे पाहून तिची मतं अगदी परखडपणे मांडते.. जिथं काही बदल सुचवावेसे वाटतात तिथे ती सांगते.. मला वाटतं बहिण आपल्याच क्षेत्रात असण्याचा हा खूप मोठ्ठा फायदा आहे..!! अभिषेक तुझ्या आत्तापर्यंतच्या संपूर्ण प्रवासात नेहमी तुझ्या सोबत असणारी ती व्यक्ती कोण होती..? तुझ्या आत्तापर्यंतच्या यशाचं श्रेय कुणाला देशील..? माझे आई बाबा माझ्या सोबत नेहमीच असतात.. पण माझ्या आजच्या या अभिनिवेशाचं.. या यशाचं श्रेय मी माझ्या आईला देऊ इच्छितो.. तिने तिच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी सोडून माझ्या ईच्छा-अपेक्षांचं ओझं स्वतःच्या खांद्यांवर घेतलं.. आणि मग माझा प्रवास सुखकर झाला.. आम्हाला वेळ देता यावा म्हणून.. तिने तिची नोकरी देखील सोडून दिली.. माझ्या आत्तापर्यंतच्या संपूर्ण प्रवासातले ‘फुल और कांटे’ आम्ही दोघांनी एकत्र झेललेत.. नाटक आणि मालिका ही क्षेत्रं सख्ख्या भावंडांसारखी आहेत.. परंतु प्रत्येकाचं एक वेगळं असं अस्तित्व आहे.. तू दोन्ही क्षेत्रात काम केलंयस.. तुला काय वाटतं या बद्दल..? नक्कीच तुषार, ही दोन्ही क्षेत्र आपल्याला एक वेगळं आव्हान देतात.. स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगवेगळे निकष देतात.. आणि आपण त्यातून पार होत सगळ्या कसोट्या पूर्ण करत पुढे जायचं असतं.. मालिका क्षेत्रात तर तुम्हाला काम करताना खूप मजा येते.. तुम्ही तेच काम खूप वेगवेगळ्या पद्धतीने करून पाहू शकता.. improvise करू शकता.. आणि तुम्ही रोज लोकांना भेटत असल्याने तुम्हाला प्रसिद्धीही खूप मिळते.. पण जबाबदारीही वाढते.. आणि नाटकाबद्दल बोलायचं झालं तर.. नाटकाच्या तालमींपासूनच सुरु झालेली ती एक प्रोसेस असते.. जी कि नाटक २५ वगैरे प्रयोगांनंतर स्थिर-स्थावर झाल्यावर संपते.. नाटकात असणारा live audience.. त्यांची मिळणारी दाद.. कामाची मिळालेली पावती.. हे असं सगळं.. अगदी instant असतं.. Feel the content but ask for more ही आमची Tagline.. ज्याप्रमाणे शब्दीप्ता Magazine’ नेहमीच जास्तिची अपेक्षा करतं.. त्याचप्रमाणे तू स्वत:कडून अश्या कोणत्या जास्तिची अपेक्षा करतोस..? या मालिकेमध्ये मी ज्यांच्या सोबत काम करतोय त्या सर्वच व्यक्ति माझ्या पेक्षा जास्त अनुभवी आहेत.. त्यांच्या बरोबरीने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी माझ्या कामात मला अजून प्रगल्भता आणायचीये.. एक कलाकार म्हणून घडायला जे वातावरण लागतं ते इथे मला अगदी भरभरून मिळतंय; त्याच्या मला समृध्द होण्यासाठी माझ्या परीने उपयोग करून घ्यायचाय.. माझ्यातल्या लेखकाला groom करायचंय.. समाजाच्या हितासाठी आणि समाज प्रबोधनासाठी माझ्या लेखणीतून जितपत शक्य आहे तितपत मांडायचंय.. मला एक सर्वगुणसंपन्न कलाकार आणि नैतिकतेची जाण असणारा व्यक्ती व्हायचंय..!! अभिषेकशी मारलेल्या या गप्पांमधून एकुणच एक निष्कर्ष काढता येतो, तो असा.. Career ला ख-या अर्थाने सुरुवात करण्याच्या काळातच ‘झी-मराठी’ सारख्या बॅनरची मालिका; प्रतिभावान आणि सहकार्याची भावना असलेली सभोवतालची माणसं; आणि आई-बाबांची सदैव साथ; या त्रिकुटामुळे.. अभिषेक त्याचं काम करताना १००% समाधानी असल्याचं जाणवतं.. –तुषार पवार
Previous article कर्मयोगी- कर्मवीर भाऊराव पाटील
Next article गगन ठेंगणे- रोहन उपळेकर भाग २
Crammed of Spirituality... Loved to be surrounded by Positive Vibes... पाडगावकर, खांडेकर, दवणे, मतकरी, पुलं, वपु, चंगो; आणि अजून कित्येक... या व्यक्तिंनी जे दर्जेदार लिहिलं.. ते साहित्य वाचून, अनुभवून झपाटून गेला; 'शुभॠष्' या टोपण नावाने लिहीणारा एक स्वैर-लेखक... डॉ. तुषार प्रशांत पवार आणि जेव्हा त्याच्या सोबतीनं, त्याच्याच सारखे साहित्यवेडे जमले तेव्हा प्रत्यक्षात आली 'शब्दीप्ता Magazine' ची संकल्पना...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version