शब्दीप्ता April’2016

संपादकीय..!!!

Feel The Content… But Ask For More..!!! हे ब्रीद वाक्य घेऊन, अनेक आघाडीच्या दैनिक, पाक्षिक, तसेच मासिकांच्या स्पर्धेत… आम्ही आपल्या सेवेत हजर झालो आहोत; शब्दीप्ता Magazine च्या माध्यमातून… शब्दीप्ता म्हणजेच… शब्दांना दीप्त करणे.. स्वत:च्या लेखणीने शब्दांना दीप्त करुन साहित्य निर्मिती करणा-या अवलियांचा सन्मान करणे; हा आमचा प्रमुख उद्देश, आणि याच उद्देशास सफल करण्यात आमची साथ देत आहेत… महाराष्ट्रातील तरुण लेखक-लेखिका…

शब्दीप्ता हे एक eMagazine आहे… यात मराठी आणि English अश्या द्विभाषी साहित्याचा समावेश असेल… दर महिन्यातील संकष्टी चतुर्थी च्या दिवशी नवीन अंक प्रकाशित केला जाईल… ज्यात असेल, तुमच्या विचारांना प्रगल्भ करण्याच्या दृष्टिने उपयोगी खाद्य, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती, आणि विविध विषयांवरील चिंतनात्मक लेखन, तरुण लेखक-लेखिकांच्या नजरेतून…

      पदार्पणातंच आम्ही आपल्या इच्छा, अपेक्षांची पुर्ती करण्याचं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून आहोत.. पदार्पणातल्या पहिल्या आठवड्यातंच आम्ही तब्बल ७५० हून अधिक लोकांच्या पसंतीस उतरलो आहोत.. मी याचं श्रेय; मला वेळोवेळी मदत करणाऱ्या आणि माझ्यावर विश्वास दाखवलेल्या आपणा सर्व वाचकांना देऊ इच्छितो..

असंख्य दिग्गज लेखक-कवींनी मराठी भाषा आणि आपणा रसिकांच्या दरम्यान सेतू बांधण्याचं मोलाचं काम केलं आहे आणि याच कार्यात आम्हीही अगदी खारीचा वाटा उचलण्याचं व्रत घेऊन आहोत.. प्रतिभावान लेखक-कवीचं साहित्य वाचून, अनुभवून आमच्या शब्दांना उजळवून आपणासमोर सादर करीत आहोत..

या magazine कडे आज युवकांचा सहभाग असणारं.. दर्जेदार साहित्याचा नजराणा असणारं.. आणि वाजवी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारं एक महत्वपूर्ण magazine म्हणून पाहिलं जातं.. आणि ज्याचा मला अभिमान वाटतो..

अगदी अश्यातच (२४ एप्रिलला) सचिन तेंडूलकरचा ४३वा वाढदिवस झाला.. या अंकात त्याचा die heart FAN असलेल्या अभिषेक साटम बद्दल आणि त्याच्या सचिन वेडाबद्दल लिहिण्यात आलंय.. त्याचबरोबर संतसाहित्याचा अविरत आभ्यास करणाऱ्या रोहानजी उपळेकरांची नितीन कळंबेने घेतलेली खास मुलाखत.. आणि त्याच बरोबर सुरु झालेलं एक नवीन सदर “गगन ठेंगणे” याचाही अंतर्भाव करीत आहोत..

राष्ट्रीय पुरस्कार विजेता गायक महेश काळे याच्या भेटीला गेलेली त्याची शिष्यमंडळी जेव्हा भरभरून प्रेम घेऊन परततात तेव्हा त्यांच्या मनातल्या भावनांना त्यांनी शब्दिप्ता च्या माध्यमातून वाट मोकळी करून दिलीये..

तार्कीकाच्या हातात सहजासहजी गवसत नाही म्हणूनच तर कवितेचे अवगुंठन अधिक अनवट असते.. अलवार असते.. आणि ते हळुवार जपले की इवल्या बीजाएवढे शब्द विस्तीर्ण पसरलेल्या वटवृक्षाएवढे संदर्भ उधळून देतात.. ह्या भावना मनात असताना केलं गेलेलं लेखन.. आणि ग्रेसांच्या काव्य सरीतेत घेतलेली मुक्त डुबकी.. यांचा अनोखा संगम या अंकातील शब्दिप्ता of the issue या सदरात वाचायला मिळेल..

द्विभाशी असणाऱ्या या मासिकामध्ये या अंकापासून  english भाषेतूनहि content टाकला जाईल.. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अजून समृध्द होण्यासाठी मदत करीत आहेत.. तेव्हा मुक्त हस्ताने आम्हाला प्रतिक्रिया लिहून पाठवत जा..!!

shubdeepta.comया website वर टाकण्यात आलेला प्रत्येक लेख तुम्हाला इथे एका Pdf fileच्या स्वरुपात देखिल उपलब्ध करुन देण्यात येईल… तुम्हाला फक्त इथे sign up करावं लागेल; चला तर मग, shubdeepta.com वर नि:शुल्क आपलं खातं काढा, आणि साहित्याच्या या नि:पक्षपाती झऱ्याचं अमृत प्राशन करुन तृप्ततेचा अनुभव घेण्यास तयार व्हा…!!!

२७ मार्च.. संकष्टी फाल्गुन, २०१६ रोजी प्रकाशित केलेला शब्दीप्ता Magazineचा दुसरा अंक त्यातल्या काही खास सदरांमुळे विशेष गाजला.. याही अंकामधे काही नवीन मासिक सदरं समाविष्ट करीत आहोत.. या अंकामध्ये आपण दुसरा अंक वाचून दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांचा देखील समावेश करीत आहोत..

२५ एप्रिल.. संकष्टी चैत्र, २०१६ रोजी प्रकाशित होणारा शब्दीप्ता Magazine चा हा तिसरा अंक.. श्री जोतीबा चरणी समर्पित करीत आहोत..