मी गावात होतो. काय झालंय न काय नाही विचार करत मी घराकडे वळालो घरापुढं लावलेल्या गाडीकडं माझं ध्यान गेलं.. काल आणलेल्या गाडीचं सुख जणू गायपच झालं होतं बग आणि ती गाडी घेण्यासाठी दादांनी पैकं कुठून आणलं.. कसं आणलं याची चिंता व्हायला लागली.. मी पाणी पिलो कळत नकळत खिश्यात असलेला 12 हजाराचा मोबाईल काढून टाइम बघितला 1 वाजून 30 मिनिट झाली होती..
Category: प्रिय, गण्या
प्रिय, गण्या- देश माझा
प्रिय,
गण्या
सकाळची वेळ होती मस्त आईच्या हातचा चहा पिऊन मी वेशिकडे निघालो होतो..
वाटत असणाऱ्या घरात जेथे महादेव भय्या राहायचे सहज त्यांच्या घराकडे वळलो.. त्यांच्या चिमुरडीची गाठ घ्यायला.. चींकी वयाने लहान आणि विचाराने मोठी गोड.. सुंदर, मनमिळाऊ, तिची ओढ गल्लीतील प्रत्येकाला होती.. घरात एक आई आज्जी आणि ती चिमुरडी राहायची.. महादेव भय्या तर सरहद्दीवर देश सांभाळत असायचे.. जम्मू काश्मीर मध्ये तर फोन ही लावायला यायचा नाही.. रेंज नसायची आणि तिथे टॉवर ही नव्हता जवळपास.. त्यामुळे त्यांचा हाल-हवाला ते चिठ्ठी मधून कळवत असत…………..
आज पासून सुरु होतंय एक नवीन पाक्षिक सदर.. गणेश मगर याच्या लेखणीतून साकारलेली.. गण्याला लिहिलेली पत्र..
“प्रिय, गण्या” नक्की वाचा.. दर महिन्याच्या ८ आणि २२ तारखेला..