जन्म, त्या दाराचं पहिलं पाऊल जिथे आपण त्या अटळ सत्याच्या दिशेने पुढे सरकतो. हा जन्म त्या वाटेवरचा वाटसरू, जिथे अनेक स्वप्नांशी, परिस्थितीशी, भिन्न गोष्टींशी तो सोबत करून, हातात-हात घालून त्या दिशेने चालतो. हा जन्म चालता-चालता आपली शारीरिक अन मानसिक अवस्था बदलतो “वेळेप्रमाणे”.. जसं ते बालपण! त्या अटळ सत्याच्या दारापर्यंत त्याला सोबत करतं. ती अवस्था त्याला रांगत, पळत, पडत का होईना त्या दारापर्यंत घेऊन जातं..
