सुरेल वाटचाल- हर्षवर्धन वावरे

0
219

हर्ष सुरुवातीला आम्हाला तुझ्या बालपणाबद्दल ऐकायला आवडेल.. तुझं बालपण कसं गेलं.. घरी लहानपणापासून गाण्याचं वातावरण होतं..?

माझं बालपण तसं बऱ्याच अंशी खूप typical पद्धतीने गेलं.. आम्ही भावंडं सुट्टीत एकत्र येऊन खूप धमाल करायचो.. आणि हो, घरात लहानपणापासूनच संगीतमय वातावरण होतं.. माझे आजोबा पी. एस. शिंदे हे त्याकाळचे प्रसिध्द बासरीवादक होते.. तसंच ते त्या काळातल्या एका आघाडीच्या वृत्तपत्रासाठी लिहायचे देखील.. तेव्हा कलाकार स्तंभ येत असे.. त्यात माझे आजोबा कविता लिहित असत.. माझी आजी हीरा शिंदे काकड आरती गायिका होती.. तिच्या काकड आरतीच्या सुरांचा आमच्यावर तेव्हापासून नकळत संस्कार होत गेला.. आणि ते गाण्याचं बीज रुजत गेलं.. आणि त्याला योग्य ते खत-पाणी घालण्याचं काम माझ्या आईने केलं.. माझी आई उषा वावरे देखील व्यावसायिक गायिका आहे.. एकूणच मी अतिशय संगीत-संपन्न अश्या वातावरणात वाढलोय.. सुरांचे संस्कार अगदी पाळण्यात असल्यापासून होत आले आहेत असं म्हणल्यास काहीही वावगं ठरणार नाही असं मला वाटतं..

शाळा कॉलेजमध्ये गाणं कसं सुरु होतं.. शैक्षणिक गोष्टी सांभाळून गाणं करणं कठीण होतं..?

नाही.. जेव्हा तुम्हाला मनापासून एखादी गोष्ट करायची असते तेव्हा इतर कुठल्याही गोष्टी तिथे आड येत नाहीत.. कुठल्याच गोष्टीचा अडसर वाटत नाही, उलट सगळ्या गोष्टींतून आपोआप मार्ग निघतात.. आणि माझ्या बाबतीतही अगदी तसंच झालं.. मी शाळेत असतानाही आणि कॉलेजात.. कधीच माझं गाणं माझ्यापासून दुरावलं नाही.. माझ्या आयुष्यात गाण्याला खूप अनन्यसाधारण महत्व आहे.. आणि मला वाटतं हिच गोष्ट मला जगण्यासाठीचा ध्यास आणि श्वास पुरवते..

हर्ष क्लासमेट्स या फिल्म मधलं “तेरी मेरी यारीयाँ..” हे तुझं पाहिलं गाणं.. या नंतर तू आम्हाला अनेक हिट गाणी दिलीस.. काय सांगशील तुझ्या पहिल्या गाण्याबद्दल.. आणि अमितराज बद्दल..

अमितराज हा माझ्यासाठी माझ्या मोठ्या भावा सारखा आहे.. त्यानेच मला पहिलं गाणं दिलं आणि या सिनेमा जगताशी introduce केलं.. खरंतर.. मी, आदित्य आणि करण आम्ही या गाण्याचं प्रोग्रामिंग करत होतो.. त्यातच या गाण्याच्या काही ओळी मी गायल्या आणि त्या अमितराज आणि क्लासमेट्स च्या सर्व स्टार कास्ट ला आवडल्या.. आणि That’s how, I got through

हर्ष तुझ्या आयुष्यातल्या मैलाच्या दगड ठरलेल्या काही प्रसंगांबद्दल.. व्यक्तींबद्दल ऐकायला आम्हाला आवडेल..

खरंतर असं इतक्या थोडक्यात नाही सांगता येणार.. पण हो, माझ्या आयुष्यात असे बरेच प्रसंग घडले.. बऱ्याच व्यक्ती आल्या कि ज्या मुळे माझं आयुष्य तेव्हा होतं त्यापेक्षा वेगळं होऊन गेलं.. मी वेळेनुरूप.. प्रसंगानुरूप घडत गेलो.. आणखीन समृद्ध होत गेलो.. आणि त्यात सरस्वती मातेचा माझ्यावर नेहमीच वरदहस्त राहिलेला आहे.. त्यामुळे तर मी नेहमीच स्वतःला खूप भाग्यवान समजतो..

तुझ्या आगामी ‘हाफ तिकीट’ या सिनेमाची सध्या सगळीकडेच खूप चर्चा आहे.. यातील चारही गाणी तू गायली आहेस.. काय सांगशील कसा होता अनुभव..?

हो खरंतर.. यातली चारही गाणी मी गायली आहेत.. infact यातलं एक गाणं दोन versions मध्ये आहे.. एक माझ्या आवाजात आणि एक करण वावरे च्या आवाजातही आहे.. या चित्रपटाचे दोन महत्वाचे स्तंभ नानू भाई आणि समित कक्कड या दोनही व्यक्ती माझ्या खूप जवळच्या आहेत.. त्यांना कुठेतरी या प्रोजेक्ट साठी एक monotonous feel हवा होता आणि जो कि त्यांनी माझ्या आवाजात पहिला.. यात चार गाणी असली तरी त्यातलं एकही गाणं दुसऱ्या सारखं अजिबात नाहीये.. तुम्ही जेव्हा हि चारही गाणी ऐकाल तेव्हा तुम्हाला ते जाणवेलच.. मी वैयक्तिकरित्या ही चारही गाणी खूपच enjoy केलीयेत.. एकूणच हा अनुभव एकमेवाद्वितीय असाच होता..

आपल्या वारश्यात आपल्याला लाभलेलं अभिजात शास्त्रीय संगीत शिकणं एका गायकाच्या दृष्टीने कितपत महत्वाचं आहे हर्ष..?

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत स्वतःहूनच एक खूप मोठं भांडार घेऊन आहे.. आणि या गोष्टी आपल्याला वारश्यातच मिळाल्यात.. या सारखं दुसरं सुख नाही तुषार.. आपल्याकडं ते आहे तर आपण त्याचा योग्य तो उपयोग करून घेतला पाहिजे.. शास्त्रीयने तुमच्या आवाजाला योग्य असा व्यायाम मिळतो.. तुमचा आवाज कोणत्याही पट्टीत.. आणि कसाही फिरू शकतो.. कमीत-कमी त्रासात तुम्ही जास्तीत-जास्त चांगलं outcome देऊ शकता.. शास्त्रीय संगीताच्या अभ्यासामुळे तुम्ही एकच गोष्ट खूप वेग-वेगळ्या पद्धतीने मांडू शकता.. स्वतःला explore करू शकता.. मी देखील उस्ताद सर्फराज फैय्याज अली खान यांच्याकडे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले आहेत.. तसेच जागतिक पातळीवरचं संगीत माझ्या कुटुंबातल्या काही व्यक्ती आणि मित्रांकडून शिकलो आहे..

हर्ष तू एक versatile गायक आहेस.. आणि हे तू वेळोवेळी सिध्द देखील करत आलायंस.. परंतू तुझ्या क्षमतांना आव्हान देणाऱ्या गाण्यांची; तुला तुझं अढळ स्थान निर्माण करण्यासाठी गरज आहे असं वाटतं का..?

well, माझी versatility सिध्द व्हावी इतकं काम मी अजून केलंय असं मला तरी वाटत नाही.. पण त्यातूनही तुम्हाला असं वाटत असेल तर तो तुमचा मोठेपणा म्हणावा लागेल.. आणि राहता राहिला प्रश्न अढळ स्थान निर्माण करण्याचा.. तर मला सांगायला आवडेल की ते स्थान मला तुम्हा रसिक श्रोत्यांच्या मनात निर्माण करायला आवडेल.. तुमचं मिळणारं प्रेम नेहमीच मला उत्तरोत्तर समृध्द होण्यासाठी आणि स्वतःला प्रगल्भ करण्यासाठी उपयोगी पडत आलं आहे.. आणि यात खंड न पडावा हीच इच्छा आहे..

आनंदी जोशी म्हणते की, non-filmy गाण्यांमुळे प्रयोगशीलता जिवंत राहते.. आज अश्या non-filmy गाण्यांची मराठी मध्ये गरज आहे असं तुला वाटतं का..?

हो अरे, नक्कीच.. आज non-filmy गाण्यांमधून नवनवीन संकल्पना येताना आपण पाहतो.. आणि अनेकदा त्यातूनच काही एक विशिष्ट ट्रेंड येतो.. एक काळ होता कि पं. भीमसेनजी, कुमारजी, अभिषेकी बुवा, यांनी ज्या पद्धतीने गाणी केली होती ती कमालीची प्रयोगशीलताच होती.. आजही ती गाणी अजरामर आहेत.. एकूणच काय की, मराठी मध्ये असे प्रयोग नेहमीच होत आले आहेत आणि आजही होत आहेत.. येणाऱ्या काही काळात अजून मोठ्या प्रमाणात या पद्धतीची गाणी येतील आणि non-filmy गाण्यांच्या यादीत आणखीन भर पडेल यात शंकाच नाही..

हर्ष “Feel the content but ask for more” ही आमची Tagline.. ज्याप्रमाणेशब्दीप्ता Magazine’ नेहमीच जास्तिची अपेक्षा करतं.. त्याप्रमाणे तू स्वत:कडून अश्या कोणत्या जास्तिची अपेक्षा करतोस..?

आज मी एक गायक म्हणून जनमानसात ओळखला जातोय.. मला आता एक संगीतकार म्हणून स्वतःला सिध्द करायचंय.. आणि त्याच दृष्टीने मी पावलं टाकायला सुरुवातही केली आहे.. मी आणि माझे दोन भाऊ, करण वावरे आणि आदित्य पाटेकर आम्ही तिघे मिळून काही प्रोजेक्ट्स वर कामही करतोय.. तुम्हाला लवकरच त्याबद्दल ऐकायला मिळेल.. FullOn नावाची एक फिल्म आम्ही करतोय.. ही आमची as a music director पहिली फिल्म असेल.. आम्ही त्रीनीती ब्रदर्स या टोपणनावाने काम करतो.. आणि ‘हर्ष_करण_आदित्य’ या नावाने संगीत देतो.. (acronymically HAK)

Previous articleअभिनिवेष- आदिश वैद्य
Next articleकर्मयोगी- डॉ. नरेंद्र दाभोळकर
Crammed of Spirituality... Loved to be surrounded by Positive Vibes... पाडगावकर, खांडेकर, दवणे, मतकरी, पुलं, वपु, चंगो; आणि अजून कित्येक... या व्यक्तिंनी जे दर्जेदार लिहिलं.. ते साहित्य वाचून, अनुभवून झपाटून गेला; 'शुभॠष्' या टोपण नावाने लिहीणारा एक स्वैर-लेखक... डॉ. तुषार प्रशांत पवार आणि जेव्हा त्याच्या सोबतीनं, त्याच्याच सारखे साहित्यवेडे जमले तेव्हा प्रत्यक्षात आली 'शब्दीप्ता Magazine' ची संकल्पना...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here