Home मराठी सुरेल वाटचाल- मंगेश बोरगावकर

सुरेल वाटचाल- मंगेश बोरगावकर

सुरेल वाटचाल- मंगेश बोरगावकर
मंगेश तुझ्या बालपणाबद्दल काय सांगशील..? तू अगदी लहानपणापासूनच ठरवलं होतंस की पुढे गायन क्षेत्रातच पूर्णवेळ काम करायचं..? हे तर by default होतं असं मी म्हणेल.. कारण मला चार पिढ्यांचा संगीतमय वारसा लाभलेला आहे.. मी लहानपणापासून त्याच वातावरणामध्ये वाढलेलो.. घडलेलो.. आहे, पेटी अन् तानपुऱ्याचे स्वर कानावर पडतच मी मोठा झालोय.. वयाच्या ३-४ वर्षापासून मी गाणं शिकतोय.. गातोय.. माझ्या घरी गाण्याची हि इतकी उदंड परंपरा होती ना.. त्यामुळे मला कधी दुसरं काही करावसंच वाटलं नाही.. माझ्यात ते उपजतच होतं.. आणि जेव्हा आपल्या आतून आलेलं असतं ना.. तेव्हा ते खरंच उतुंगतेकडे नेणारं असतं.. आणि मला तर या गोष्टीचा अगदी पदोपदी प्रत्यय येतो.. तुझे गाण्यातील गुरु कोण..? मी लहानपणापासून माझे काका सुरमणी पं. बाबुराव बोरगावकर आणि माझे वडील तालमणी डॉ. राम बोरगावकर यांच्याकडे गायनाचे धडे गिरवले आहेत.. गाण्यातलं गमभन मला यांनीच शिकवलं.. गाण्याच्या प्रांतात मला बोटाला धरून स्वैर फिरवून आणलं आणि पडता-पडता.. चालता-चालता.. मी धावायला कधी लागलो कळालंच नाही.. याच संपूर्ण प्रवासात मला संगीताच्या प्रगाढ अभ्यासिका.. गानसरस्वती किशोरीताई आमोणकर याचं देखील मार्गदर्शन लाभलं.. एका सुगम गायकाच्या दृष्टीने शास्त्रीय संगीताचा अभ्यास कितपत महत्वाचा आहे..? खूप छान प्रश्न विचारलास तुषार.. मला खरंच उत्तर द्यायला आवडेल या प्रश्नाचं.. दोन्ही गायनप्रकार हे त्यांच्या-त्यांच्या ठिकाणी वेग-वेगळे आहेत.. त्यांना सिध्द करण्यासाठी लागणारी मेहनत हि वेग-वेगळी आहे.. त्यामुळे सुगम संगीतासाठी शास्त्रीय चा अभ्यास हवा असं म्हणणं कितपत योग्य होईल नाही सांगता येणार.. पण हां.. जेव्हा आपण mastery चा अभ्यास केलेला असतो तेव्हा degree चा अभ्यास आपल्याला सोपाच वाटतो ना.. तसंच आहे हे.. पण खरं सांगायचं झालं तर.. दोन्ही माध्यमांमध्ये गायला वेगळी अशी पूर्वतयारी लागते आणि त्याची यथोचित साधना देखील तितकीच महत्वाची असते.. एखादा शास्त्रीय चा base असलेला.. ताकदीचा शास्त्रीय गायक जेव्हा कसल्याही पूर्वतयारी शिवाय सुगम गायला लागतो तेव्हा त्या गाण्याचा feel तितकाच येईल हे सांगता येत नाही.. आणि अगदी तसंच सुगम गायकाबद्दलही.. शास्त्रीय संगीताचं शास्त्र-शुद्ध शिक्षण गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्येच योग्य प्रकारे मिळू शकतं.. परंतु काळानुसार त्यात काही बदल होणं क्रमप्राप्तच आहे.. तू कसा पाहतोस या बदलाकडे..? प्रत्येक काळाची काही समीकरणं असतात.. काळ बदलला कि ती सामिकरणंही बदलू पाहतात आणि पुन्हा नव्या काळाची नवी समीकरणं बनतात.. आणि माणूस त्यांच्या दृष्टीने अनुकुलीत होत त्या बदलाचं स्वागत करतो आणि जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो.. शास्त्रीय संगीत हे अभिजात संगीत आहे आणि त्याचा अभ्यास, rather साधना ही पूर्वीच्या काळी गुरुघरी राहून केली जात असे.. कारण त्याच वातावरणात आपण सदा राहतो आणि आपल्या हरएक सांगीतिक जडणघडणीत आपल्या गुरूंची छाप पडल्यावाचून राहत नाही.. परंतू जस-जसा काळ बदलला.. तसतसं हे प्रमाण महिन्यातून आठवडाभर गुरुघरी राहणं.. त्यानंतर आठवड्यातून दोन दिवस राहून शिकणं.. आणि आता आजकाल आठवड्यातून दोनदा येवून दोन-चार तास शिकण्या पर्यंत आलं आहे.. हा कालानुरूप झालेला बदल आहे.. आणि आपण तो स्वीकारायलाही हवाय खरंतर.. आपण किती वेळ शिकतोय या पेक्षा किती शिकतोय हे खूप महत्वाचं ठरतं असं मला वाटतं.. मंगेश तू महाराष्ट्रातला एक आघाडीचा आणि प्रस्थापित गायक आहेस.. अजून १० वर्षांनी तू स्वतःला कुठे पाहतोस..? मी वयाच्या १६व्या वर्षी झी मराठी च्या सा रे ग म प या गाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता.. आणि उपमहागायका पर्यंत मजल मारली होती.. मला रसिक प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं.. मी stage shows करत गेलो.. त्यानंतर काही albums केले.. चित्रपटांसाठी गाणी गायलो.. मला वाटलंही नव्हतं की इतक्या अल्पावधीमध्ये मला सगळं इतकं भरभरून मिळेल.. पण आपणा सर्वांचे आशीर्वाद आणि घरच्यांची अविरत साथ या गोष्टींच्या बळावर मला हे प्राप्त झालं.. येणाऱ्या १० वर्षात मला तुम्ही दाखवलेल्या या विश्वासाला सर्वार्थाने सार्थ करून दाखवायचंय.. मी आत्ता जितकं देतोय त्या पेक्षा अजून कितीतरी पटीने देण्याची क्षमता निर्माण करून त्यासाठी प्रयत्न करायचेत.. आणि तुमच्या अपेक्षांना खरं उतरायचंय..!! तुझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासात नेहमी तुझ्यासोबत असणारी एखादी व्यक्ती..? लहानपणापासून माझ्या सर्व निर्णयांमध्ये मला मार्गदर्शन करणारे माझे गुरु.. आणि माझ्या सांगीतिक पदार्पणापासूनच माझ्यावर निखळ प्रेम करणारे आपण, माझे चाहते.. तुमच्या मुळेच मी स्वतःला अजून प्रगल्भ करण्याच्या दृष्टीने नेहमी प्रयत्नशील असतो.. आणि त्यात मला तुमची साथ तर असतेच.. मंगेश “Feel the content but ask for more” ही आमची Tagline.. ज्याप्रमाणेशब्दीप्ता Magazine’ नेहमीच जास्तिची अपेक्षा करतं.. त्याप्रमाणे तू स्वत:कडून अश्या कोणत्या जास्तिची अपेक्षा करतोस..? मी आत्ता जितकं देतोय त्यात perfection यावं.. आणि जे डोक्यात येतं ते तितक्याच सहजतेने गळ्यातूनही यावं.. मी माझ्या प्रत्येक गाण्यानंतर स्वतःला analize करतो.. या गाण्यात, इथे मला अजून काय वेगळं देता आलं असतं.. अजून काय करता आलं असतं.. असा माझा विचार होतो.. मी गायलेलं गाणं समोरच्याच्या आत्म्याला भिडावं असं मला वाटतं.. माझे सूर ऐकणाऱ्याच्या मनापर्यंत पोहोचावेत.. आणि साठून राहावेत असं मला वाटतं.. मंगेश तू मराठी मध्ये जितक्या सहजतेने गातोस तितक्याच सहजतेने तू हिंदी मधेही रमतोस.. सांगितला भाषेचं बंधन नसतं असं म्हणतात; तुझं काय म्हणणं आहे याबद्दल..? खरंय तुझं.. सांगिताला कुठलीही भाषा नसते.. पण प्रत्येक भाषेचं असं एक वेगळं संगीत असतं.. आणि ते आपल्याला कळालं ना.. की मग कुठलीच बंधनं राहत नाहीत.. भाषा हे एक माध्यम असतं.. स्वरांच्या माध्यमातून भावना व्यक्त करण्याचं आणि जर का माध्यमावर प्रभुत्व मिळवता आलं ना.. कि मग आणखी काय हवंय.. गाताना उच्चारांवर देखील विशेष भर द्यावा लागतो.. मी तेलुगू भाषेत जेव्हा गाणं गायलं तेव्हा मला जाणवलेली एक गोष्ट म्हणजे मी जेव्हा एखादा शब्द योग्य रीतीने pronounce करायचो तेव्हा त्याचा फील यायचा.. अगदी अश्यातच साऱ्या जगाने जागतिक संगीत दिवस साजरा केला.. जागतिक पातळीवरचं संगीत ऐकताना त्यांच्या nobal असण्याची कल्पना येते.. आपल्या रेहमान साहेबांची गाणी देखील अशीच जागतिक पातळीवर ऐकली जातात.. आणि ती तितकीच पॉप्युलरही आहेत.. इथे भाषेचं बंधन येतच नाही मुळी.. तुझे पुढचे काही आगामी प्रोजेक्ट्स..? मी मुळचा लातूरचा.. लातूरला दुष्काळरूपी सापाने विळखा घातला आहे.. या वर्षीही तो विळखा अजूनच घट्ट होत चालला आहे.. हाच पीळ थोडासा सैल करण्यासाठी मी लातूरला काही stage shows करण्याचा प्लान करतोय.. या कार्यक्रमांतून येणारी एक घसघशीत रक्कम दुष्काळ ग्रस्तांसाठी खर्च करण्यात येणार आहे.. या बरोबरंच आगामी ३-४ चित्रपटांमध्ये माझी गाणी आहेत.. २-३ albums करतोय.. आणि stage shows तर असतातंच.. -तुषार पवार
Previous article गगण ठेंगणे- आशिष तांबे
Next article कर्मयोगी- निळू फुले
Crammed of Spirituality... Loved to be surrounded by Positive Vibes... पाडगावकर, खांडेकर, दवणे, मतकरी, पुलं, वपु, चंगो; आणि अजून कित्येक... या व्यक्तिंनी जे दर्जेदार लिहिलं.. ते साहित्य वाचून, अनुभवून झपाटून गेला; 'शुभॠष्' या टोपण नावाने लिहीणारा एक स्वैर-लेखक... डॉ. तुषार प्रशांत पवार आणि जेव्हा त्याच्या सोबतीनं, त्याच्याच सारखे साहित्यवेडे जमले तेव्हा प्रत्यक्षात आली 'शब्दीप्ता Magazine' ची संकल्पना...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version