Home मराठी सुरेल वाटचाल- डॉ. नेहा राजपाल

सुरेल वाटचाल- डॉ. नेहा राजपाल

सुरेल वाटचाल- डॉ. नेहा राजपाल

तुम्हाला अतिशय गोड आणि स्वर्गीय गळ्याची ईश्वरी देणगी लाभलेली असताना तुम्ही वैद्यकीय क्षेत्राकडे कश्या वळलात..?

खरंतर मी लहानपणापासूनच गुरु विभावरी बांधवकर यांच्या कडे किराणा घराण्याचे शास्त्र-शुध्द शिक्षण घेत होते.. पण माझी आई डॉक्टर आहे; त्यामुळे असेल कदाचित.. मला सुरुवातीपासूनच डॉक्टर व्हायचं होतं.. आईमुळे मला वैद्यकीय क्षेत्राची माहिती होती.. मला intensivist व्हायचं होतं.. म्हणून त्यासाठी मेहनत घेऊन मार्क्स मिळवले.. आणि MGM Medical College, New Mumbai मध्ये ओपन मेरीट सीट मिळवली.. आणि डॉक्टर झाले..

वैद्यकीय शिक्षण घेताना देखील पुढे संगीत क्षेत्रातच पूर्णवेळ काम करायचं.. असं ठरवलेलं होतं..?

गाण्याचं क्षेत्र.. आणि एकूणच कला क्षेत्र तसं पहायला गेलं तर बरंचसं अनिश्चित आहे.. म्हणून गाणं पूर्णवेळ होईल की नाही.. याची खात्री तेव्हा नव्हती.. पण मला माझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास होता.. आणि माझ्या सोबत माझी आपली माणसं तर नेहमीच होती.. कदाचित ह्यामुळेच मला कधीच माझ्या भविष्याची काळजी नाही वाटली..

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संघर्षाचा काळ असतो.. तुमच्या आयुष्यातल्या त्या काळाबद्दल काय सांगाल..

संघर्ष हा प्रत्त्येक ठिकाणी असतोच.. जेव्हा तुम्ही एखाद्या ध्येयाकडे वाटचाल करता.. तेव्हा त्यासाठी तुम्हाला करावे लागणारे प्रयत्न आणि कष्ट.. हे सुद्धा त्या संघर्षाचाच भाग असतात.. ते ध्येय साध्य झालं की तुम्ही दुसऱ्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरु करता.. आणि त्याच्या प्राप्तीसाठी अस्सल प्रयत्न सुरु करता.. मी तर म्हणते.. “याला जीवन ऐसे नाव..” आणि म्हणूनच हा असा संघर्ष स्वतःला improve करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतो.. जो की कधी न संपणारा असावा आणि माझ्यासाठी तो तसाच आहे.. अखंड..!!

तुमच्या आजपर्यंतच्या सांगीतिक वाटचाली बद्दल काय सांगाल..

संगीत माझं श्वास आणि जगण्याचा ध्यास आहे तुषार.. माझ्या आजपर्यंतच्या सांगीतिक वाटचालीत माझ्या गुरु विभावरी ताई.. आणि अनिल मोहिले सर यांचं खूप मोठं योगदान आहे.. आणि त्यांच्याच आशीर्वादाने मी आजपर्यंत मराठी, हिंदी, बंगाली, सिंधी, तेलगु, गुजराती आदी वेगवेगळ्या भाषेत आणि अनेक वेगवेगळ्या संगीत क्षेत्रासाठी सुमारे ३००० गाणी रेकॉर्ड केली आहेत.. अनिल मोहिलेंच्या ‘माणूस’ ह्या सिनेमासाठी गायलेलं.. ‘दिन दिन दिवाळी’ हे माझं पाहिलं पार्श्वगायन.. तेव्हापासून आजतागायत अनेक पुरस्कार मिळाले.. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीसाठी अंताक्षरीचं निवेदन  करण्याची संधी मला मिळाली.. तेव्हा प्रशांत दामले सरांकडूनही खूप काही शिकता आलं.. २०१४ सालच्या फेब्रुवारी महिन्यात “नेहा राजपाल प्रोडक्शन्स” या निर्मिती संस्थेची स्थापना केली.. त्याद्वारे काही संगीत रचना केल्या.. एकूणच.. माझ्या आत्तापर्यंतच्या सांगीतिक क्षेत्रातील योगदानाने मी १००% समाधानी आहे..

मागील वर्षीच्या काकण या सिनेमासाठी तुम्ही शंकर महादेवन यांच्या सोबत एक गाणं गायलं होतं.. तो अनुभव कसा होता..

शंकर महादेवन यांच्याच संगीत दिग्दर्शनाखाली माझ्या हिंदी प्लेबॅक करीयरची सुरुवात झालीये.. “नयी पडोसन” फिल्मचं शीर्षक-गीत मी गायलं होतं.. आणि आता जवळ-जवळ १० वर्षांनंतर त्यांच्या बरोबर मराठी duet गायले.. काकण चित्रपटाचं शीर्षक-गीत मला गायला दिल्याबद्दल कम्पोझर मिको आणि डिरेक्टर क्रांती रेडकरची मी आभारी आहे.. अगदी अप्रतिम असणारं संगीत.. ओंकार मंगेश दत्त चे प्रतिभावान शब्द आणि सोबत The Shankar Mahadevan.. या त्रिकुटामुळे मी आत्तापर्यंत गायलेल्या माझ्या all time favorite गाण्यांच्या यादीत काकण आहे..

तुम्ही social networking media वरती बऱ्याचश्या प्रमाणात सक्रीय असता.. तुमच्या चाहत्यांची आपुलकीने दाखल घेता.. तुम्ही आज मराठीतल्या आघाडीच्या गायिका आहात.. तुम्ही शिष्ठ असायला हवं.. तुम्ही इतक्या सध्या कश्या..

मुळात माझं स्वभाव मनमोकळा आहे.. (अर्थात  तुझ्या लक्षात आलंच असेल ते..) मला लोकांशी, मित्रांशी, फॅन्सशी, कनेक्ट व्हायला आवडतं.. आपल्या कामाची जर कुणी आवर्जून दखल घेत असेल.. तर आपणही त्याचा विचार करणं क्रमप्राप्तच आहे.. असं मला वाटतं.. आणि म्हणूनच social media वरती मी सक्रीय असते.. आणि राहता राहिला प्रश्न शिष्ठपणाचा.. तर शिष्ठ मी आहे.. पण जर समोरचा शिष्ठ्पणे वागला तर..!!

गायिका नेहा राजपाल.. आणि डॉक्टर नेहा राजपाल यांच्यातलं नातं कसं आहे..

खरंतर गायिका नेहा राजपाल आणि डॉक्टर नेहा राजपाल एकच आहेत, त्यांना वेगवेगळं नाही करता येणार..

तुम्ही गायिका म्हणून ‘नेहा राजपाल’ असंच नाव लावता.. ‘डॉ. नेहा राजपाल’ असं नाव न लावण्याचं काही खास कारण..?

हो खरंतर.. मी जर गाण्यात PhD केली असती तर नक्कीच डॉ. नेहा राजपाल असं नाव लावलं असतं.. मी डॉक्टर आहे ती वैद्यकीय क्षेत्रातली.. आणि पदवी त्या त्या क्षेत्राप्रमाणेच वापरावी हे माझं ठाम मत आहे.. त्यामुळे नेहा राजपाल..!!

भविष्यात कधी वैद्यकीय व्यवसायात उतरण्याचा मानस आहे का..?

हो, माझी इच्छा आहे खरंतर.. मला भाविष्यात एक चॅरीटेबल हॉस्पिटल उघडायचंय.. समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रासारखी संधी इतर कुठेही नाही.. बघूया कधी करता येयील.. पण माझे त्यादृष्टीने प्रयत्न नेहमीच चालू असतात..

“नेहा राजपाल प्रोडक्शन्स” च्या आगामी प्रोजेक्ट्स बद्दल ऐकायला आम्हाला आवडेल..

“नेहा राजपाल प्रोडक्शन्स”चा पहिला मराठी चित्रपट अश्यात येतोय.. ‘फोटोकॉपी/Photocopy’ याची कथा लिहिलीये ‘डॉ. आकाश राजपाल’ आणि ‘ओंकार मंगेश दत्त’ या जोडगोळीने.. पटकथा आणि संवाद आहेत ‘विजय मौर्या’ (ज्यांना ‘चिल्लर पार्टी’ फिल्म साठी नॅशनल अवॉर्ड मिळालाय) आणि ‘योगेश जोशी’ (ज्यांनी ‘मुंबई मेरी जान’ फिल्म लिहिलीये) यांचे.. आणि दिग्दर्शक आहेत स्वतः ‘विजय मौर्या’ जे कि अॅडव्हरटायझिंग क्षेत्रातलं एक मोठं नाव.. कास्टिंग आहे ‘रोहन मापुस्कर’ यांचं.. 3idots, Munnabhai duo, PK यांसारख्या यशस्वी चित्रपटांनंतर ‘फोटोकॉपी/Photocopy’ सारखा  पहिला मराठी महात्वाकांशी प्रोजेक्ट..

So.. या वर्षाच्या अखेरीस येतोय आपल्या सर्वांच्या भेटीला ‘NRP’ निर्मित.. विजय मौर्या दिग्दर्शीत identical twins च्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा… ‘फोटोकॉपी/Photocopy’ 

-तुषार पवार

Previous article अभिनिवेष- डॉ. निलेश साबळे
Next article शब्दीप्ता of the issue- कवी ग्रेस
Crammed of Spirituality... Loved to be surrounded by Positive Vibes... पाडगावकर, खांडेकर, दवणे, मतकरी, पुलं, वपु, चंगो; आणि अजून कित्येक... या व्यक्तिंनी जे दर्जेदार लिहिलं.. ते साहित्य वाचून, अनुभवून झपाटून गेला; 'शुभॠष्' या टोपण नावाने लिहीणारा एक स्वैर-लेखक... डॉ. तुषार प्रशांत पवार आणि जेव्हा त्याच्या सोबतीनं, त्याच्याच सारखे साहित्यवेडे जमले तेव्हा प्रत्यक्षात आली 'शब्दीप्ता Magazine' ची संकल्पना...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here