Home मुलाखती अभिनिवेष अभिनिवेष- प्रथमेश परब

अभिनिवेष- प्रथमेश परब

अभिनिवेष- प्रथमेश परब
प्रथमेश सुरुवातीला आपण तुझ्या बालपणाबद्दल बोलूयात.. अगदी लहानपणापासून अभिनय क्षेत्राची आवड होती..? शाळेत असताना तू बालनाट्यांमध्ये वगैरे भाग घ्यायचास..? अगदीच शाळेत असताना अशी आवड नव्हती.. पण जेव्हा पासून कळायला लागलं.. मी TV मध्ये काही कॉमेडी shows वगैरे पाहायचो.. आणि ते पाहून मला असं नेहमी वाटायचं.. कि आपल्याला पण असं कुणालातरी हसवता यायला हवं.. पण तेव्हा असं वाटलं नव्हतं कि मी कधी नाटक – सिनेमात काम करेन.. मी नववी मध्ये असताना पर्यावरण विषयक एका नाटकात काम केलं होतं.. फार वाईट केलं होतं तसं ते.. आणि १०वी ला असताना मी आणि माझ्या सरांनी मिळून एक नाटक लिहिलं होतं.. त्या नाटकाचं शाळेने काहीच केलं नाही.. पण त्यातून मला हे कळलं कि नाटक कसं लिहायचं नसतं.. त्यामुळे तेव्हा जास्त कधी नाटकात वगैरे भाग घायला मिळाला नाही.. पण त्या काळात मी बऱ्याच उत्तमोत्तम कलाकृती पाहायचो.. सिरियल्स पाहायचो.. कॉमेडी shows पाहायचो.. आणि त्यातून मला प्रचंड शिकायला देखील मिळायचं.. तू चित्रपट सृष्टीत कसा आलास..? तुला कितपत struggle करावा लागला होता.. मी अकरावीत असताना एक एकांकिका केली होती.. त्याच्या सगळ्याच प्रोसेस मध्ये मी होतो.. म्हणजे मी on stage हि होतो.. आणि backstage साठी हि होतो.. दुर्दैवाने काही कारणाने त्या एकांकिकेचा प्रयोग होऊ शकला नाही.. पण त्या संपूर्ण प्रोसेस मध्ये मला अनेक गोष्टी नव्याने करता आल्या.. स्वतःच्या क्षमतांना आव्हान देऊन स्वतःला पारखून पाहता आलं.. आणि या सगळ्याचाच परिपाक हा आमच्या डहाणूकर कॉलेजच्या त्यानंतरच्या एकांकिकेत पाहायला मिळाला.. आम्ही ‘बिपी’ नावाची एकांकिका केली होती.. त्यात मी विशू ची भूमिका केली होती.. आणि ज्या एकांकिकेचा नंतर सिनेमाही झाला ‘बालक-पालक’ आणि त्यातही मलाच ती भूमिका करता आली.. ते माझं पाहिलं काम होतं.. आणि त्यात नाविन्य आणि निरलसता कुठेतरी लोकांना दिसली.. आणि माझं ते काम लोकांची पावती मिळवून गेलं.. त्यामुळे लौकिकार्थाने ‘बिपी’ मुळे (बालक-पालक) माझ्या करियर ला कलाटणी मिळाली असं म्हणल्यास काही वावगं ठरणार नाही.. प्रथमेश TP सारख्या superhit आणि trend setter सिनेमातून तू मराठी चित्रपट सृष्टीमध्ये as a lead पदार्पण केलंस.. काय सांगशील एकूणच अनुभवाबद्दल..? खरंतर TP हा रिलीजच्या आधीच हिट झाला होता.. त्याच्या ट्रेलरलाच इतके हिट्स होते.. कि हा सिनेमा superhit आणि trend setter ठरणार आहे याची प्रचीती तेव्हाच आली होती.. आणि अजाणत्या वयात झालेलं प्रेम.. पाहिलं प्रेम याबद्दल लोकांना पाहायला ऐकायला आवडंतच ना.. आणि जसं आत्ताचा सैराट हा सिनेमा कितीतरी अमराठी लोकांनीही चित्रपटगृहांमध्ये जाऊन बघितला.. तर त्याची सुरुवात हि TP पासून झाली होती.. त्यामुळे TP ने तो एक trend set केलाच होता.. आणि मुळात trend setter सिनेमात काम करणं हे एका अभिनेत्याच्या दृष्टीने आव्हानात्मकही असतं.. कारण एकदा का तुम्ही त्या भूमिकेशी जोडले गेलात कि मग पुढे तुम्हाला तश्याच प्रकारच्या भूमिका मिळायला लागतात.. आणि मग लोक म्हणतात.. कि याला तर फक्त हेच येतं.. actually लोक बरंच काही म्हणत असतात.. पण आपण त्यांच्या कडे लक्ष न देता उत्तमोत्तम काम कसं करू शकू यावर माझा भर असतो.. TP आधीचा प्रथमेश आणि दगडू शांताराम परब म्हणून जगभरातल्या मराठी-अमराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला प्रथमेश यांत तुला स्वतःहून काय फरक जाणवतो..? दगडूचं आणि माझं आडनाव जरी एकंच असलं तरी फरक नक्कीच जाणवतो.. कारण दगडू करायच्या आधीचा प्रथमेश तितकासा बिनधास्त नव्हता.. पण मग स्वतःचे गोल सेट केलेला असा मध्यंतरानंतरच्या दगडू सारखाही नव्हता.. आणि काय असतं ना तुमच्या आयुष्यात आलेली एखादी भूमिका तुम्हाला बरंच काही शिकवून जाते.. तसंच TP आणि TP2 मधला हा दगडू मला बिनधास्तपणा.. ध्येयवादीपणा.. आणि चिकाटीने करत राहायचे प्रयत्न अश्या गोष्टींची पुंजी देऊन गेला.. एक कलाकार म्हणून जनमानसात वावरणारा प्रथमेश आणि मित्रमंडळी मधला प्रथमेश यांच्यातलं नातं कसं आहे..? एक कलाकार म्हणून असणारा प्रथमेश हा बराचसा जबाबदार आणि विचारी आहे.. म्हणजे एखाद्या गोष्टीला react होताना माझ्यातला कलाकार कुठेतरी मला बंधनं घालत असतो.. किंवा मी असं जे मनात येईल ते बोलून मोकळा नाही होऊ शकत याची सतत जाणीव करून देत असतो.. पण मित्रमंडळी मधला प्रथमेश हा तितकाच बेधडक आणि मुक्त आहे.. म्हणजे मी कुठलाही विचार न करता मित्रांशी मैत्री वाढवणाऱ्या फुल्या फुल्यातल्या शब्दांमध्ये बोलू शकतो.. कुठलीच बंधनं न वागवता वावरू शकतो.. आणि राहता राहिला प्रश्न या दोघांतल्या नात्याचा.. तर हे नातं अगदी बेसिक तत्वावर जोडलं गेलं आहे.. एक व्यक्ती म्हणून असणारं माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य.. प्रथमेश तू तुझ्या कामाबाबत खूपच dedicated आहेस; प्रत्येक scene उत्तमरीत्या कसा करता येईल याकडे तुझं पुरेपूर लक्ष असतं.. हा वसा कुठून मिळाला..? जे लोक मला माझ्या कामाच्या निमित्ताने भेटत गेलेत त्यांच्याकडून तर मी नेहमीच शिकत आलोय.. मग ते माझे सह-अभिनेते असतील.. माझे दिग्दर्शक असतील.. किंवा एकूणच माझ्या चित्रपटांची संपूर्ण टीम.. कायेना जर आपलं शिकणं थांबलं तर आपण पुढे जाऊच शकणार नाही हे माझं ठाम मत आहे आणि त्यामुळेच मी नेहमीच शिकत राहतो.. मला अजूनही खूप शिकायचंय.. प्रचंड भांडार आहे कलाक्षेत्रात कि ज्यातला कण-कण मला टिपून घ्यायचाय.. आणि त्यासाठी मी आयुष्यभर शिकत राहीन.. आणि अजून dedicatedly काम करत राहीन.. TP नंतर हरवलेला प्रथमेश “उर्फी” सारख्या ताकदीच्या सिनेमामुळे आम्हाला परत मिळाला.. तुझा येऊ घातलेला सिनेमा “३५% काठावर पास” आम्हाला तुझ्या त्या प्रतिभेची जाणीव करून देण्यात कितपत यशस्वी होईल असं तुला वाटतं..? TP नंतर मुळात मी mostly असे काही सिनेमे केलेच नाहीत.. म्हणजे TP2 आणि दृश्यम यातलंही माझं काम लोकांना आवडलंच होतं.. पण मुळात कसं होतं ना.. तुम्हाला १० सिनेमे ऑफर होत असतात.. त्यातले कोणते स्वीकारायचे हे तुम्हालाच ठरवावं लागतं.. आणि मुळात म्हणजे निर्मात्यांचाही विचार अभिनेत्याकडून व्हायला हवा.. आणि जर ते तुमच्या कुठल्याश्या established प्रतिमेवर पैसे लावणार असतील तर तो विचार होणं क्रमप्राप्तच आहे असं मला वाटतं.. आणि मी भूमिका स्वीकारताना ती अशीच स्वीकारतो.. आता माझा हा हि सिनेमा.. ३५% काठावर पास असाच वेगळा आहे.. यातलं माझं साईराज हे character भाषेच्या बाबतीत फार वेगळं आहे.. तो बऱ्याच अंशी उद्धट आहे.. त्याला १०वी ला ३५% मिळालेत.. आणि तेही त्याने ठरवून मिळवलेत असं तो म्हणत असतो.. आपल्या प्रवेश प्रक्रियेतल्या कारभाराने त्याला एका प्रतिष्ठित कॉलेज मध्ये अॅडमिशन तर मिळतं.. पण ते त्याला carry करता येत नाही.. वावरता येत नाहीये.. आणि मग एका ठराविक पॉईंट नंतर त्याचं sporty होणं.. असं एकूण हे कथानक आहे.. या सिनेमातनंहि मुळात एक सोशल मेसेज देण्याचा प्रयत्न केला गेलाय.. तसाच तो TP मधेही होता.. आणि उर्फीतही.. आणि एक actor म्हणून माझं ते कर्तव्यच आहे असं मला वाटतं.. तुझ्या आत्तापर्यंतच्या कामावरून जाणवतं कि, तू चित्रपटांमध्ये जास्त रमतोस.. नाटकासारखं प्रतिभासंपन्न माध्यम तुला कधी खुणावत नाही..? कसं होतं ना लोक तुम्हाला एका विशिष्ट category मध्ये नेऊन बसवतात.. म्हणजे हा सिनेमातला actor.. हा नाटकातला.. हा सिरीयलचा.. कसं असतं जोपर्यंत तुम्हाला त्या माध्यमातून चांगलं काम ऑफर होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यात काम नाही करत ना.. म्हणजे जर मी ‘झोपाळा’ ‘लौट आओ गौरी’ ‘बिनधास्त पहा’ अशी नाटकं जर करू शकतो तर मला यापुढेही नक्कीच नाट्य रंगभूमीची सेवा करायला आवडेल.. प्रथमेश  TP मधल्या तुझ्या भूमिकेनंतर तुला सगळ्या त्याच पठडीतल्या भूमिका मिळत गेल्या..  ( तू त्या निवडताना अगदी विचारपूर्वकच निवडल्या no डाउट ) कथानक जरी काही अंशी वेगळं असलं तरी एकाच मुशीतून काढल्या सारख्या भूमिका तुझ्या वाट्याला आल्या असं तुला वाटतं का.. काय सांगशील..? जसं मी मगाशी म्हणालो.. कि निर्मात्यांच्या गरजा ओळखूनही आपल्याला चालावं लागतं.. म्हणजे मी एक अभिनेता म्हणून मला नक्कीच आवडतील वेगवेगळ्या भूमिका करायला.. पण जेव्हा एक व्यावसायिक अभिनेता म्हणून लोक तुमच्याकडे aproach होतात.. तेव्हा ते त्या established प्रतिमेवरच पैसे लावणार असतात आणि तुम्हालाही तो विचार करावा लागतो.. पण मी त्यातनंही ती भूमिका मला कशी वेगळी करता येईल याकडे लक्ष देतो.. म्हणजे मी उर्फी केला होता त्यातल्या देखील देवा या भूमिकेत मी बरेच नवीन प्रयोग केले होते.. आणि ते यशस्वी हि झाले होतेच.. आणि मुळात म्हणजे TP सारखा trend setter सिनेमा केल्याने.. माझ्या प्रत्येक भूमिकेची त्याच्याशी तुलना होणार.. आणि हा प्रश्न देखील मला नेहमीच विचारला जाणार याचीहि कल्पना मला असतेच.. पण मी त्या प्रत्येक भूमिकेत काय वेगळं केलंय हे मला माहित असल्याने, मला कधीच दडपण वगैरे येत नाही.. लहान वयात मिळालेल्या गोष्टींची किंमत राहत नाही असं म्हणतात.. पण तू अगदी लहान वयात विचारी पद्धतीने निर्णय घेऊन सर्व गोष्टी बरोबर manage करतोस.. हा संस्कार कुठून झाला..? काय सांगशील.. मी manage करतो असं जरी दिसत असलं तरी त्यात माझं असं काहीच नाही.. हे आई कडून आलेले संस्कार असतील कदाचित.. कारण माझी आई नेहमीच सगळ्या गोष्टी उत्तम manage करते आणि तिच्या कडून मी हि कळत-नकळत हे सगळं शिकलोय.. पण तरीही पूर्णपणे नाही शिकलोय.. म्हणजे मी स्वतःला चुकायची पुरेपूर संधी देतो.. आणि मग जेव्हा चुका होतात तेव्हा त्या दुरुस्त करायचे मार्गही त्यातनं शोधून काढतो.. प्रसिद्धी आणि यशासोबतच एक असुरक्षिततेचं वलय भोवतीनं येतंच.. आज जे काम हाती आहे त्यानंतर उद्या काय असा प्रश्न कधी पडतो का..? हो पडतो.. एक अभिनेता म्हणून तुम्हाला तो पडायलाच पाहिजे आणि.. कारण TP नंतर मला कोणताही सिनेमा स्वीकारताना त्या उंचीचा तो आहे का याची पडताळणी करावी लागते.. आणि तसा सिनेमा आला तर तो स्वीकारून त्यामधल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी काय-काय आवश्यक आहे त्या गोष्टींचा अंगीकार करावा लागतो.. मला तर TP नंतर तश्याच कथानकाचे साधारण पन्नास एक सिनेमे ऑफर झाले होते.. त्यामुळे फक्त काम मिळायला हवं.. या पेक्षा चांगलं काम मिळायला हवं या वर माझा भर असतो.. काही महिन्यांपूर्वी तुझा अपघात झाल्याच्या पोस्ट्स सोशल नेट्वर्किंग साईट्स वरून फिरत होत्या.. त्यात तथ्य ते काहीच नव्हतं.. पण त्याचा तुला आणि तुझ्या चाहत्यांनाही त्रास झाला.. तुझ्या मनात काय भावना होत्या तेव्हा..? actually मी जेव्हा पहिल्यांदा तो मेसेज वाचला तेव्हा माझ्याच डोळ्यात पाणी आलं.. आणि सोशल नेट्वर्किंग हे इतकं प्रभावी माध्यम आहे ना.. कि चांगली किंवा वाईट कोणतीही गोष्ट.. किंवा मेसेज अगदी क्षणार्धात कुठला कुठे पोहोचतो.. म्हणजे हाच मेसेज मला माझ्या मोबाईलवर येण्या आधी पुण्यात माझ्या मावशीला कुठल्याश्या खेड्यात जाऊन पोहोचला.. कोल्हापुरातल्या खेड्यांत गेला.. एक तर माझ्या मॅडम आहेत पाटील मॅडम म्हणून त्यांचा मला फोन आला.. आणि त्या तर रडायलाच लागल्या.. म्हणजे त्यांचं तर असं झालेलं कि, मी आता कोणाला फोन करू.. म्हणजे या सगळ्यांच्या भावना.. माझ्या भावना यांच्याशी खेळण्याचा असा कुणाला अधिकार नाही ना.. आणि ज्याने कुणी हि अफवा पसरवली होती, त्या व्यक्तीला त्या प्रवृत्तीला माझं एकंच सांगणं आहे कि बाबा रे, “परत कधी कुणाबद्दल अश्या अफवा पसरवण्या आधी, आपल्या मरणाच्या बातमीवर आपल्यालाच उत्तर देऊन आपण जिवंत असल्याचं सांगावं लागतं तेव्हा काय वाटत असेल याचा विचार करावास..” Make in Maharashtra द्वारे महाराष्ट्राच्या जडण-घडणीत एक कलाकार.. एक अभिनेता म्हणून खारीचा वाटा उचलून तू तुझं योगदान कश्या पद्धतीने देऊ इच्छितोस..? एका कलाकाराकडे सामान्य माणूस नेहमीच स्वतःचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणून पाहत असतो.. म्हणजे TP मधल्या दगडू-प्राजक्ता ला स्क्रीन वर पाहताना लोक स्वतःला तुमच्या ठिकाणी ठेऊन पाहत असतात.. आणि ती जबाबदारीची कावड आता माझ्याही खांद्यावर आहेच.. So.. माझ्या वागण्या-बोलण्यातून कधीच कुणा व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी मी घेईन.. आणि एक कलाकार म्हणून माझ्या महाराष्ट्रासाठी जे जे करता येईल ते नेहमीच करत राहील.. Feel the content.. But ask for more..!! is our Tagline.. ज्या प्रमाणे शब्दीप्ता Magazine स्वतःकडून नेहमीच जास्तीची अपेक्षा करतं.. त्या प्रमाणे अभिनेता प्रथमेश परब स्वतःकडून अश्या कुठल्या जास्तीची अपेक्षा करतो..? माझ्या खरंच खूप जास्त अपेक्षा आहेत स्वतः कडून.. म्हणजे अगदीच अवाजवी नाही म्हणता येणार.. basically मी एक टार्गेट ठरवतो.. आणि त्या दृष्टीने करावे लागणारे प्रयत्न.. कष्ट.. अगदी मनापासून करतो.. पण ते मिळालं तरी किंवा नाही मिळालं तरी मला फारसं असं काही वाटतंच नाही.. म्हणजे मला खूप मनापासून वाटायचं.. मला Best Actor मिळावं असं.. पण जेव्हा मिळालं तेव्हा पुढचे २-४ दिवसंच त्याचं काही असं वाटलं.. परत गेलं.. मला असं वाटतं कि हीच माझी maturity कडे घेऊन जाणाऱ्या प्रवासाची सुरुवात आहे.. -तुषार पवार
Previous article कर्मयोगी- प्रा. के. एस. अय्यर
Next article सुरेल वाटचाल- सावनी रवींद्र
Crammed of Spirituality... Loved to be surrounded by Positive Vibes... पाडगावकर, खांडेकर, दवणे, मतकरी, पुलं, वपु, चंगो; आणि अजून कित्येक... या व्यक्तिंनी जे दर्जेदार लिहिलं.. ते साहित्य वाचून, अनुभवून झपाटून गेला; 'शुभॠष्' या टोपण नावाने लिहीणारा एक स्वैर-लेखक... डॉ. तुषार प्रशांत पवार आणि जेव्हा त्याच्या सोबतीनं, त्याच्याच सारखे साहित्यवेडे जमले तेव्हा प्रत्यक्षात आली 'शब्दीप्ता Magazine' ची संकल्पना...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version