शब्दीप्ता July’2016

संपादकीय..!!!

Feel The Content… But Ask For More..!!! हे ब्रीद वाक्य घेऊन, अनेक आघाडीच्या दैनिक, पाक्षिक, तसेच मासिकांच्या स्पर्धेत… आम्ही आपल्या सेवेत हजर झालो आहोत; शब्दीप्ता Magazine च्या माध्यमातून… शब्दीप्ता म्हणजेच… शब्दांना दीप्त करणे.. स्वत:च्या लेखणीने शब्दांना दीप्त करुन साहित्य निर्मिती करणा-या अवलियांचा सन्मान करणे; हा आमचा प्रमुख उद्देश, आणि याच उद्देशास सफल करण्यात आमची साथ देत आहेत.. महाराष्ट्रातील तरुण लेखक-लेखिका..

शब्दीप्ता हे एक eMagazine आहे… यात मराठी आणि English अश्या द्विभाषी साहित्याचा समावेश असेल… दर महिन्यातील संकष्टी चतुर्थी च्या दिवशी नवीन अंक प्रकाशित केला जाईल… ज्यात असेल, तुमच्या विचारांना प्रगल्भ करण्याच्या दृष्टिने उपयोगी खाद्य, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती, आणि विविध विषयांवरील चिंतनात्मक लेखन, तरुण लेखक-लेखिकांच्या नजरेतून..

पदार्पणातंच आम्ही आपल्या इच्छा, अपेक्षांची पुर्ती करण्याचं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून आहोत.. या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये आम्ही सरासरी २५०० हून अधिक लोकांच्या पसंतीस उतरलो आहोत.. मी याचं श्रेय; मला वेळोवेळी मदत करणाऱ्या आणि माझ्यावर विश्वास दाखवलेल्या आपणा सर्व वाचकांना देऊ इच्छितो..

असंख्य दिग्गज लेखक-कवींनी मराठी भाषा आणि आपणा रसिकांच्या दरम्यान सेतू बांधण्याचं मोलाचं काम केलं आहे आणि याच कार्यात आम्हीही अगदी खारीचा वाटा उचलण्याचं व्रत घेऊन आहोत.. प्रतिभावान लेखक-कवीचं साहित्य वाचून, अनुभवून आमच्या शब्दांना उजळवून आपणासमोर सादर करीत आहोत..

या magazine कडे आज युवकांचा सहभाग असणारं.. दर्जेदार साहित्याचा नजराणा असणारं.. आणि वाजवी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारं एक महत्वपूर्ण magazine म्हणून पाहिलं जातं.. आणि ज्याचा मला अभिमान वाटतो..

प्रत्येक अंकागणिक आम्ही काही सदरांचा अंतर्भाव नव्याने करीत असतो.. या अंकात देखील अमृता पाटील या माझ्या गुणी मैत्रिणीचं एक नवं कोरं सदर “खाण्यासाठी जन्म आपूला..” सुरु करीत आहोत.. आणि त्याच बरोबर सुरुवात होत आहे एका नव्या अध्यायाला.. अश्यातच नव्याने अंतर्भूत केलेलं “चार पावसाळे अधिक..” हे सदर आपल्या पसंतीस उतरल्याचं आपण कळवत आहात..  शब्दीप्ताच्या टीम मध्ये संपादकापासून ते स्तंभ लेखकांपर्यंत आणि वेबसाईट डीझाईनर पासून ते संकालकापर्यंत सर्वजण २२ ते ३२ या वयोगटातलेच आहेत.. तेव्हा आपल्यापेक्षा चार पावसाळे अधिक पाहिलेल्या काही लेखक-लेखिकांना या लेखन प्रक्रियेत समाविष्ट करूयात असा विचार आला आणि तो प्रत्यक्षात साकारही झाला.. आम्हा युवा लेखक-लेखिकांच्या बरोबरीनेच अधिक अनुभवी लेखकांना मागल्या २ अंकांपासून शब्दीप्ताच्या लेखक चमू मध्ये समाविष्ट करून घेण्यात आलं आहे..

संतसाहित्याचा अविरत अभ्यास करणाऱ्या रोहन उपळेकर याने स्मरण या सदरासाठी केलेलं चिंतनात्मक लेखन या अंकात देत आहोत.. त्याबरोबरच अभिषेक साटम आणि त्याच्या काही मित्रांनी ‘Eco Buddies’या नावाने एक नवीन ग्रुप बनवून निसर्गाचं जतन करण्याचा.. वृक्ष लागवडीचा.. आणि संवर्धनाचा.. वसा उचलला आहे.. त्याच बद्दल शब्दीप्ता च्या टीम ने त्यांच्याशी केलेली बातचीत.. आणि या Buddies बरोबर त्यांच्या कार्यात समाविष्ट होण्यासाठी त्यांचे संपर्क क्रमांक ही देत आहोत..

स्वतःच्या मातृभाषेत लिखाण करता-करता त्यांना एक धागा गवसला.. आणि त्याचाच मागोवा घेत-घेत त्या खोलवर बुडून गेल्या साहित्याच्या भवसागरात..  “अत्यंत भावस्पर्शी लेखन.. वाचकाच्या मनाचा अलगत ठाव घेणारी लेखनशैली.. आणि भाषेच्या बंधनापल्याड डोकाऊ पाहणारी वर्णनं.. यांचा सुरेख संगम ज्यांच्या साहित्यात पाहायला मिळतो त्या सुधा मूर्ती.. यांच्याबद्दल या अंकात; शब्दिप्ता of the issue या सदरात वाचायला मिळेल..

तसंच आपली नेहमीची सदरं आहेतच.. सुरेल वाटचाल या सदरामध्ये गायक हर्षवर्धन वावरे याची घेतलेली मुलाखत आहे.. “हाफ तिकीट” या आगामी सिनेमातल्या त्याच्या गाण्यांमुळे तो सद्ध्या भलताच चर्चेत आहे.. त्याच बरोबर “रात्रीस खेळ चाले” या मालिकेतील आदिश वैद्य या अभिनेत्याची घेतलेली खास मुलाखत अभिनिवेश या सदरामध्ये.. वाटेकर्स या सदरामध्ये वाशाहीर या गाण्याच्या शब्दांमागच्या भावना मांडण्यात आल्या आहेत..

या अंकाच्या coverpage साठी छायाचित्रकार आणि माझा मित्र हृषीकेश मेरगळ याने काम पाहिलं आहे.. वारीच्या पार्श्वभूमीवर आधारित असणाऱ्या या अंकाचं coverpageहि तसंच असावं या हट्टापायी साकारलेलं हे छायाचित्र खूप काही सांगून जातं.. संपूर्ण वारी भर ही तुळस अखंड ऑक्सिजन पसरवत जाते आणि वारकऱ्यांची मनं उत्फुल्लित करीत जाते..

shubdeepta.com या website वर टाकण्यात आलेला प्रत्येक लेख तुम्हाला इथे एका Pdf fileच्या स्वरुपात देखिल उपलब्ध करुन देण्यात येईल… तुम्हाला फक्त इथे sign up करावं लागेल; चला तर मग, shubdeepta.com वर नि:शुल्क आपलं खातं काढा, आणि साहित्याच्या या नि:पक्षपाती झऱ्याचं अमृत प्राशन करुन तृप्ततेचा अनुभव घेण्यास तयार व्हा…!!

२३ जून.. संकष्टी ज्येष्ठ, २०१६ रोजी प्रकाशित केलेला शब्दीप्ता Magazineचा पाचवा अंक त्यातल्या काही खास सदरांमुळे विशेष गाजला.. या अंकामध्ये अभिनेत्री अमृता देशमुख ने अंक वाचून दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेचा देखील समावेश करीत आहोत..

२३ जुलै.. संकष्टी आषाढ, २०१६ रोजी प्रकाशित होणारा शब्दीप्ता Magazineचा हा सहावा अंक.. विठू माऊली चरणी समर्पित करीत आहोत..