डॉक्टरांची समाजाभिमुखता

प्रसिध्द फिजिशियन व प. बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केला जाणारा आजचा हा दिवस.. डॉक्टर्स डे..!! रॉय यांच्या जीवनातील वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल हा दिवस साजरा केला जाऊ लागला.. त्यांच्याबाबतची विशेष बाब अशी कि १ जुलै १८८२ हा त्यांचा जन्मदिवस तर.. १९६२ चा जुलै १ हा त्यांचा मृत्यू दिवस….

सध्या कोविड १९ च्या साथीमध्ये स्वतः च्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर्स योद्धा होऊन लढत आहेत. यांमध्ये काही डॉक्टरांना मृत्यूदेखील आला, त्यांच्या कार्याला सलाम व भावपूर्ण आदरांजली. रुग्णांना आजारातून बरे करण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या सर्व डॉक्टरांच्या या आरोग्यसेवेचा आदरपूर्वक सन्मान करूया. डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा !!

शब्दीप्ता of the issue- डॉ. सुमति क्षेत्रमाडे

स्वातंत्र्य पूर्वीच्या काळात ७ मार्च १९१३ या दिवशी सुमतिताईंचा जन्म झाला.. एका सर्वसामान्य कुटुंबात ज्या प्रमाणे एका मुलीला वाढवलं जातं त्याच प्रमाणे त्यांना वाढवलं गेलं.. त्यांच्या घरी कधीच मुलगा-मुलगी असा भेदभाव केला गेला नाही आणि त्यामुळेच कदाचित अतिशय चुणचुणीत अशी…

शब्दीप्ता of the issue- गुलजार साहेब

अतिशय प्रतिभासंपन्न लेखणी.. ‘पेना’ला असणारी ‘शीला’ची जोड.. आणि खर्जात लागणारा आवाज या स्वर्गानुभूतीच्या ईश्वरीय देणग्या लाभलेला एक कविमनाचा माणूस ज्याच्या अवकाशात.. रेहमान त्याच्या अवीट गोडीच्या चाली गुणगुणत असतो.. लता दीदी – आशा ताई एकमेकींना सवाल जबाब करत असतात.. कुठल्या तरी कर्मठ पीठाचे शंकराचार्य धर्माच्या गोष्टी करत असतात.. चर्चमधले फादर आणि मशिदीतले मौलाना एकत्र बसून बुद्धीबळ खेळत असतात.. आणि त्यांचा चिमुरडा नातू समय या सगळ्यांना बरोबर घेऊन नवा व्यापारचा डाव मांडून बसलेला असतो..

शब्दीप्ता of the issue- सुधा मूर्ती

अत्यंत भावस्पर्शी लेखन.. वाचकाच्या मनाचा अलगत ठाव घेणारी लेखनशैली.. आणि भाषेच्या बंधनापल्याड डोकाऊ पाहणारी वर्णनं.. या मुळे लक्षात राहतात त्या लेखिका सुधा मूर्ती; ‘डॉलर बहू’.. ‘महाश्वेता’.. यांसारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून भारतीय समाजचित्रण करणारं एक मनस्वी व्यक्तिमत्व.. infosys foundationच्या माध्यमातून Philanthropy करणाऱ्या सुधाताईंनी तर भारतीय स्त्री मधील कर्तुत्वसंपन्नतेची साऱ्या जगाला ओळख करून दिली..

शब्दीप्ता of the issue- मिलिंद बोकिल

अत्यंत भावस्पर्शी वर्णन.. लेखणीच्या सहाय्याने गुंतवून ठेवणारी शैली.. आणि तरल तरंगी लिखाण या मुळे लक्षात राहतात ते लेखक-कवि मिलिंद बोकील; गवत्या.. एकम्.. समुद्र.. शाळा.. यांसारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून मानवी मनाच्या गाभ्याला हात घालणारे एक प्रभावी व्यक्तिमत्व; शाळा या सिनेमाच्या प्रदर्शनातून तर त्यांचा साहित्यप्रवाह सर्वसामान्यांपर्यंत जाऊन पोहोचला.. आणि मिलिंद बोकील हे नाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले.. त्यांची शाळा ही कादंबरी वाचताना जाणवतं कि त्यांनी space realization च्या माध्यमातून ही कथा गुंफली आहे..