सुरेल वाटचाल- धवल चांदवडकर

0
347

वल तुझ्या घरातच गाणं होतं.. तुझे आई-बाबा दोघेही संगीत क्षेत्रात काम करत असल्याने तुला अगदी लहानपणापासूनच गाण्याची बाळकडू देण्यात आलं होतं.. लहानपणापासूनच गायक व्हायचं असं ठरवलं होतंस..? काय सांगशील बालपणाबद्दल..?

नाही खरंतर.. मी लहानपणापासून sports मध्ये जास्त होतो.. कॉलेज मध्ये देखील मी क्रिकेट मध्ये जास्त असायचो.. माझ्या घरातच गाणं असूनही माझा कल कधीच गाण्याकडे नव्हता.. माझी आई उत्तम गायिका आहे.. माझी आजी गायची.. माझे बाबा देखील याच क्षेत्रात कार्यरत आहेत.. सरगम musical night नावाने ते शोज arrange करत असत.. इतकं सारं संगीतमय वातावरण असूनही माझा कधीच गायक होण्याकडे कल नव्हता..

‘सा रे ग म प’.. ‘झी मराठी’ सारखा platform मिळाल्यानंतरचा धवल.. आणि त्या आधीचा धवल.. एक गायक म्हणून काही फरक जाणवला..?

नक्कीच जाणवला तुषार.. अगदी सहज म्हणून दिलेल्या audition पासून ते एक finalist असा हा एकूणच प्रवास माझ्यातल्या गायकाला समृद्ध करणारा होता.. माझा स्वतःवरचा विश्वास बळकट झाला.. stage वर गाणं सादर करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात याची कल्पना आली.. स्पर्धा आणि मार्क्स मुले perfection ची सवय जडली.. आपण कुठेही कमी न पडता आपल्यातलं १००% द्यायला हवं असं positive pressure यायला लागलं..

काही वेळेस आयत्या वेळी गोष्टी change व्हायच्या.. तेव्हा अगदीच काही तासांमध्ये गाणं बसवून ते सादर करण्याची वेळ यायची.. अशी परिस्थिती हाताळण्याची सवय झाली.. आता मी जेव्हा live shows करतो तेव्हा कुठल्याही गाण्याची फर्माइश झाली तरी ते गाणं सहज गाता येतं.. कोणत्याही पूर्वतयारी शिवाय..

धवल तू Reality shows मधून पुढे आलायंस, आणि आज एक प्रस्थापित गायक म्हणून नाव कमावलयंस.. पण आज-काल Reality shows मध्ये भाग घेण्याची एक वेगळीच वृत्ती दिसून येते.. Passion नसतानाही केवळ प्रसिद्धीसाठी पालक त्यांच्या पाल्यांना अश्या shows मध्ये अगदी लहान वयात participate होण्यास भाग पाडताना दिसतात.. तुझं काय म्हणणं आहे या बाबत..?

खरंय तुझं.. २०-२५ वयानंतर घेण्यात येणाऱ्या स्पर्धा तरी ठीक आहेत.. पण अरे वयाच्या ७व्या ८व्या वर्षी असणाऱ्या आवाजाच्या जोरावर तुम्ही एखाद्याला कसंकाय judge करू शकता.. अजून त्याचा-तिचा आवाज फुटलेला नसतो.. तात्पुरत्या स्वरूपातल्या आवाजावर कुणाची पारख नाही ना होऊ शकत.. आणि याच निर्णयाच्या जोरावर पालकही मुलांचं पुढचं आयुष्य ठरवत असतात..

वयाच्या २०-२२ वर्षांनतर खरंतर पुरेशी maturity येते.. त्या वयात गाण्याची पुरेशी समाज येते.. आणि मग रीतसर शिक्षण वगैरे घेऊन अश्या स्पर्धांमध्ये भाग घेतलात तर तुमची दिशाभूलही होणार नाही.. तुम्ही एक उत्तम गायक म्हणून.. तुमच्या passion ला वाव देऊ शकता..

शास्त्रीय शिक्षणाचा base असणं एका गायकाच्या दृष्टीने कितपत महत्वाचं आहे..?

२०००% मी तर म्हणेन.. कि ज्याने शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलेलं नाही.. तो गायकंच नाही.. कोणत्याही घाटणीचं गाणं सहज गायचं असेल तर त्या गायकाने शास्त्रीयचं शास्त्र-शुद्ध शिक्षण घ्यायला हवं.. त्याने तुम्हाला गाण्यातले बारकावे कळतात.. आणि मग गाणं आणखीनच सोप्प होवून बसतं.. शास्त्रीय मुळे तुम्हाला कोणत्याही पिच मध्ये गाता येतं.. तुमच्या आवाजाला आवश्यक असणारी स्थिरता.. शांतता.. तुम्हाला शास्त्रीय संगीतामुळेच मिळते..

शास्त्रीय शिक्षणाचं अभिजात शिक्षण गुरुकुल शिक्षण पद्धतीमधेच उत्तमरीत्या होऊ शकतं.. यावर तुझं काय मत आहे..?

अगदी बरोबर.. कारण बघ ना आपल्यावर लहानपणापासून जे संस्कार होत असतात ते शाळेत होत असतात.. आणि आपण शाळेत नेहमी त्याच-त्या वातावरणात असल्याने आपण त्या सगळ्या गोष्टी पटकन आत्मसात करतो.. तसंच आहे अरे.. गुरुकुल शिक्षणामध्ये तुम्ही सलग १२-१२ तास गुरूंच्या सानिध्यात आणि त्या तानपुऱ्याच्या भारीत वातावरणात असता.. तुमचं मन कुठेही भरकटत नाही..

आज आपण गायन क्षेत्रातल्या ज्या मोठ्या मोठ्या नावांचा उल्लेख करतो त्या सगळ्यांनी गुरूंकडे राहून आणि त्यांची सेवा करूनच संगीताचं शिक्षण संपादन केल्याचं दिसतं..

असं म्हणतात की.. डमरू, तबला-पेटी या पारंपारिक वाद्यांशिवाय  जोतिबाचं गाणं होऊच शकत नाही.. संगीतकार अॅग्नेल रोमन यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘जोतिबाचा गुलाल’ या अल्बम मध्ये तू गायलायंस.. अगदीच आधुनिक धाटणीची हि गाणी गाताना असं काही जाणवलं..

हा प्रयत्न काही मराठीत पहिल्यांदाच झालाय असं नाही.. या आधी आपण गोंधळ-गीत किंवा गवळण, आरत्या, स्तोत्र; आदि गोष्टी अश्या नव्या ढंगात आणि आधुनिक वाद्यांच्या साजात ऐकल्या आहेत.. स्वप्नील बांदोडकरचं राधा हि बावरी हे गाणं.. हि गवळण आहे.. नवीन जनरेशन ला आकर्षित करण्यासाठी पारंपारिक संगीतामध्ये काळानुरूप काही बदल करावे लागतात.. अॅग्नेलनेही ‘जोतिबाचा गुलाल’ या अल्बम साठी केलेला हा प्रयोग मला आवडला.. त्याने पारंपारिक संगीताच्या गाभ्याला कुठेही धक्का न लावता ही गाणी संगीतबद्ध केलेली आहेत.. थोडेसे Youth flavours add करून त्याने जे काही बदल केले आहेत ते मला आवडले.. आणि त्यामुळेच मी हि गाणी गायला लगेच होकार दिला..

आज जोतिबाचा गुलाल या अल्बम मधून इतक्या वर्षांनी आम्हाला धवलचा आवाज ऐकायला मिळाला.. दरम्यानच्या काळात तू स्वतःला आणखीन समृद्ध करत होतास..?

Basically मी software eng. सोडून जेव्हा संगीत क्षेत्रात पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय घेत होतो तेव्हा मला एक परिपूर्ण आणि सर्वगुणसंपन्न कलाकार होणं खूप गरजेचं होतं.. सारेगमप नंतर मला माझ्यातला गायक गवसला आणि त्या नंतर माझी खरी वाटचाल सुरु झाली.. मी आजही माझे गुरु पं. भावादीप जयपूरवाले यांच्या कडून voice culture चं शिक्षण घेतोय.. western music शिकतोय.. आपल्यापेक्षा इतर ठिकाणी संगीताच्या प्रांतात काय-काय नवीन आहे आणि त्यातलं मला काय-काय घेता येईल.. शिकता येईल.. याकडे माझा काळ जास्त असतो.. so, मी म्हणेन कि.. yes मी अजूनही स्वतःला.. स्वतःतल्या गायकाला समृद्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय..

संगीत आणि अध्यात्म यांचा परस्पर संबंध आहे असं तुला वाटतं का..? या दोन्ही गोष्टींचं एका गायकाच्या जीवनात काय स्थान असायला हवंय..?

संगीताची अध्यात्माशी जोड असली कि तुमचं गाणं pure होतं.. एका सध्या स्वरातुनहि वातावरण-निर्मितीची शक्ती तुमच्या आवाजात येते.. शांत.. भारीत.. अश्या स्वरानुभूतीत न्हाहून निघाल्याचं समाधान मिळतं.. अध्यात्माशिवाय एका ठराविक level पर्यंत तुम्ही एक कलाकार म्हणून survive होऊ शकता.. पण त्या नंतर तुम्हाला अध्यात्माची जोड हि लागतेच.. एका कलाकाराच्या आयुष्यात लागणारं स्थर्य तुम्हाला अध्यात्म देतं.. माझं तर स्पष्ट मत आहे, कि ज्या व्यक्तीचा.. कलाकाराचा.. अध्यात्मावर विश्वास नाही तो व्यक्ती एक उत्तम कलाकार होऊच शकत नाही..!!

संगीत आत्म्याशी संवाद साधतं असं म्हणतात.. तुला कधी असा काही अनुभव आलाय..?

हो बऱ्याचदा अरे.. एखादं गाणं मला खूप आवडलं कि माझ्या डोळ्यातून आपसूकच पाणी येतं.. ते गाणं.. ते स्वर माझ्या आत्म्याला भिडलेले असतात.. आणि माझ्या शरीराच्या माध्यमातून एका reflex action च्या माध्यमातून हि अशी इतकी निःखळ प्रतिक्रिया दिलेली असते.. बऱ्याचदा Healing साठी Music therapy चा वापर केला जातो.. त्याचं कार्यहि असंच चालतं..

तुझ्या आत्तापर्यंतच्या संपूर्ण प्रवासात तुझ्या सोबत असणारी एखादी व्यक्ती..?

माझे आई-बाबा माझी आजी या सर्वांचा पाठींबा तर मला नेहमीच राहिलेला आहे.. पण माझा एक मित्र आहे मुकुंद फणसळकर नावाचा.. त्याने मला खरा push दिला.. माझ्यातल्या गायकाला चालना देण्याचं काम त्याने केलं असं मी म्हणेन.. मुकुंद मला तेव्हा एका कार्यक्रमाला घेऊन गेला होता.. आणि जो कि माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.. मुकुंद सध्या अमेरिकेत असतो.. तो देखील एक उत्तम गायक आहे..

धवल “Feel The Content… But Ask For More..” ही आमची शब्दीप्ता Magazine ची tagline आहे.. right from SaReGaMaPa, तू एक उत्तम गायक आहेस हे वेळोवेळी सिद्ध केलंयस.. गायक धवल स्वतः कडून कुठल्या जास्तीची अपेक्षा करतोय..?

सारेगमप ने आम्हा गायकांना एक शिक्का दिलाय.. त्या नंतर आमची खरी process सुरु झाली.. आणि मग तो शिक्का सार्थ करण्याच्या दृष्टीने असेल वा टिकवण्याच्या.. एक धडपड सुरु झाली.. त्यातून एक समृद्ध गायक होण्यासाठी लागणाऱ्या आणि हातून सुटलेल्या सगळ्या गोष्टी परत मिळवण्याच्या दृष्टीने मी आता पावलं टाकत आहे.. नवनवीन पद्धतीचं संगीत आजमावून पाहत आहे.. एका पार्श्वगायकाला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी मला माझ्यात आणायच्या आहेत.. आणि त्या दृष्टीने माझे प्रयत्नही सुरु आहेत..

– तुषार पवार

 

 

Previous articleगगन ठेंगणे- रोहन उपळेकर भाग २
Next articleकर्मयोगी- साने गुरुजी
Crammed of Spirituality... Loved to be surrounded by Positive Vibes... पाडगावकर, खांडेकर, दवणे, मतकरी, पुलं, वपु, चंगो; आणि अजून कित्येक... या व्यक्तिंनी जे दर्जेदार लिहिलं.. ते साहित्य वाचून, अनुभवून झपाटून गेला; 'शुभॠष्' या टोपण नावाने लिहीणारा एक स्वैर-लेखक... डॉ. तुषार प्रशांत पवार आणि जेव्हा त्याच्या सोबतीनं, त्याच्याच सारखे साहित्यवेडे जमले तेव्हा प्रत्यक्षात आली 'शब्दीप्ता Magazine' ची संकल्पना...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here