Television, मालिकांचे पुनरागमन आणि मुसाफिर_अभि

नमस्कार, राम राम मंडळी…
मनोरंजन म्हणजे मनुष्याच्या जीवनातला एक अविभाज्य घटक..
माणसांमधल्या नात्यांच्या, भावविश्वात घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी, एका मागोमग सलग, सतत पहायला इथेच मिळतात..
कधी भाऊजींच्या प्रेमळ हाकेनी वहिनींच्या चेहऱ्यावर हास्य येतं.. तर कधी ते बबड्याच्या आळशीपणा मुळे, आपल्या आईच्या चेहऱ्यावर आपल्याच बद्दल राग दिसतो.. जणू काय तो बबड्या आपणच.. कधी शनायाच्या कमबॅकने तरुणांच्या मनाला शांती मिळते तर “आई कुठे काय करते?” म्हणत संपूर्ण कुटुंब आईच्या टोमण्याना घाबरतं..
कधी छत्रपतींचे शौर्य पाहून आपण प्रसंगांना निर्भीडपणे सामोरे जातो.. तर कधी हास्य जत्रेच्या विनोदांनी रात्रभर मैफिल सजते.. आहो तुम्ही सुद्धा जगलात कि पुन्हा या भावना !! आताच..!

गेले चार महिने या सगळ्या भावना एकाच ठिकाणी येऊन थांबलेल्या.. लोक एकाच प्रकारची भावना जगत होते “भयावह” त्यात सुद्धा TELEVISION न्युज चॅनेल नेच साथ दिली.. सतत चा धडाम धुडूम आणि लाल रंगाचे ग्रॉफीक्स.. काय सांगशील___? (रिकामी जागा तुम्ही भरलीच असेल).. कावीळ झाली कि डोळे पिवळे होतात असं ऐकलं होतं… गेल्या चार महिन्यात ते अक्षरशः लाल झाले होते..
आपल्या महाराष्ट्रात लोक मालिका पाहत नाहीत तर लोक मालिका जगतात.. सकाळी उठल्यावर गाणी, ऑफिसला निघताना बातम्या, दुपारी मेजवानी, संध्याकाळच्या चहा सोबत अमुक, रात्रीच्या जेणासोबत तमुक, घरातली कामं आवरताना ही , झोपतानाची शेवटची ती मालिका आणि सगळे झोपले, कि आपल्या चुकलेल्या आवडत्या मालिकेचा रिपीट हे प्रत्येकाचं आपल आपलं ठरलेलं असतं..

पण गेले कित्येक दिवस वेळा चुकल्या.. पात्र हरवली.. भावना बदलत नव्हत्या.. काहींना यातून मिळणारे मार्ग संपलेले.. खरंतर हीच ताकद आहे.. आपल्या TELEVISION आणि त्यात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकार आणि तंत्रज्ञानकडे; हवी ती भावना सादर करण्याची ताकद आहे.. लोक पर्याय म्हणून OTT प्लॅटफॉर्म्स पाहायचे पण मालिकांना मात्र मिस करायचे.. (An over-the-top (OTT) media service is a streaming media service offered directly to viewers via the Internet. OTT bypasses cable, broadcast, and satellite television platforms,) काहींना वाटलं चला आता TV पेक्षा OTT बरं काहीही आणि कधीही पहा.. पण काहींनाच..
कारण Television वरचं कन्टेन्ट कुटूंबाला एकत्रीत आणतं तर OTT वरचं फारसा कन्टेन्ट आपण कुटुंबासोबत नाही पाहू शकत.. कदाचित OTT म्हणजे कुटुंबापासून दुरावा.. जे कदाचित महाराष्ट्रातल्या बऱ्याच कुटुंबांना पटणार नाही..
काळ पुढे सरकला आणि वेळ बदलली..

पुनःश्च हरिओम झाला आणि थांबलेल्या भावनांना पुन्हा मार्ग मिळाला, १३ जुलैपासून आपल्या लाडक्या मालिकांचे पुनरागमन झाले आहे..
नवऱ्याला मिळाली नवरी, पुन्हा लटकला गॅरी आणि लॉली ची बायटिंग सॉरी Batting पुन्हा सुरु झाली.. बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं..
पुन्हा वेळा जुळू लागल्या आहेत, पुन्हा पात्र सापडली आहेत, भावनांचा पूर पुन्हा ओसंडून वाहतोय आणि पुन्हा मार्ग मिळू लागलाय.. हळू हळू हे मानवी जीवन सुद्धा सामान्य होईल.. TV ला कोणत्याच प्लॅटफॉर्म सोबत comparision नाही.. माझ्यासाठी Television अमर आहे..! कारण महाराष्ट्रात Television पाहत नाहीत तो जगतात..

मुसाफिर_अभि

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *