अभिनिवेष- अमृता देशमुख

0
358
अभिनिवेष - अमृता देशमुख

अमृता तुझं बालपण जळगावात गेलं.. जळगाव हे काही तितकसं मोठं शहर नाही.. तुला एक कलाकार म्हणून लहानपणापासून grow व्हायला तिथे कितपत वाव मिळाला?

मी १२वी पर्यंत जळगावात वाढले.. आणि तरी जळगाव छोटं शहर असलं तरी माझी शाळा ब. गो. शानभाग विद्यालय, जळगाव इथे माझ्या कलागुणांना खतपाणी मिळालं.. अभ्यासा-व्यतिरिक्तही इतर activities मधे माझी शाळा खूप supportive होती.. त्यामुळे नाटक, डान्स, वक्तृत्व यांत मी नेहमीच भाग घेत आलेय.. मुळात म्हणजे माझ्या आई-वडिलांनी पण मला नेहमीच माझ्या आवडीच्या गोष्टी करायला प्रोत्साहन दिलंय.. अभ्यास एके अभ्यास असं कधी बिंबवलं नाही.. आणि कदाचित हीच गोष्ट मला लहानपणापासून develop व्हायला कारणीभूत ठरली.. असं मला वाटतं..

कला क्षेत्रात तुझं काही backing नसतानाही पहिलाच project श्रेयस तळपदेंच्या Affluence सोबत.. काय सांगशील..?

खरं सांगू तुषार.. मला कधी-कधी स्वप्नवत वाटतं हे सगळं.. म्हणजे.. एवढी स्पर्धा असलेल्या क्षेत्रात एखादी चांगली संधी आपल्यालाच मिळावी.. आणि तेही.. माझा या क्षेत्रातला Break श्रेयस तळपदेंच्या Affluence सोबत.. त्यामुळे खरंच खूप भाग्यवान असल्यासारखं वाटतं.. आपण ज्या व्यक्तींचं काम पाहत-पाहत मोठे झालेलो असतो.. त्यांच्यासोबत काम करण्याची एक वेगळीच भावना असते.. आणि अश्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात ना.. त्यामुळे अजून उत्साह वाढतो..

अमृता तू कला क्षेत्रात यायचं असं पहिल्यापासूनच ठरवलं होतं का..?

हो खरंतर.. मी अगदी सहावी ला असल्यापासूनच ठरवलं होतं.. पुढे कला क्षेत्रातंच जायचं.. आणि त्यादुष्टीनेच सगळे decisions घेतले.. मग अगदी रंगभूमीवर काम करण्यासाठी पुण्याला येण्याचा घेतलेला निर्णय असो वा आंतर-महाविद्यालयीन स्पर्धांमधे सहभाग घ्यायचा म्हणून स. प. महाविद्यालयात कला शाखेत घेतलेला प्रवेश असो.. माझं आधीपासूनच ठरलं होतं; मला काय करायचंय ते.. आणि त्यामुळेच मी कधी distract झाले नाही.. मनापासून प्रयत्न करत राहिले.. आणि त्याचंच फळ म्हणून आज ‘गौरी’च्या नावाने घराघरात पोहोचलेय..

अमृता तुझा भाऊ देखील झी-मराठी सोबत एका आघाडीच्या मलिकेत काम करतोय.. एक बहिण म्हणून काय वाटतं?

खूप अभिमान वाटतो अरे.. त्याच्या talentला साजेसी अशी आणि एक actor म्हणून develop व्हायला वाव देणारी अशी संधी त्याला मिळाली.. आधी तर मी हे clear करते कि अभिषेक माझा मोठा भाऊ आहे.. तो माझ्यापेक्षा ४ वर्षांनी मोठा आहे.. सगळ्यांना तो माझा लहान भाऊ वाटतो.. काही लोक तर आम्हाला जुळी भावंडं समजतात..

अमृता कला क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संघर्षाचा कालखंड काही चुकत नाही.. तुझ्या आयुष्यातल्या या काळा बद्दल काय सांगशील?

मी नेहमीच struggle ची तयारी ठेवली होती.. सोपं काही असेल असं मनात ठेवलंच नव्हतं.. मी खूप ठिकाणी auditions दिल्या होत्या Ads, Films, TV serials असं सगळं.. English नाटक सुद्धा केलं.. मला माझ्या कामाला कोणत्याही प्रकारची मर्यादा घालायची नव्हती.. असं म्हणतात.. “कलेला भाषेचीही मर्यादा राहत नाही..” मला ते जगायचं-अनुभवायचं होतं.. so सगळ्या प्रकारच्या auditions दिल्या.. आणि मग हळू हळू संधी मिळत गेली..

तुझ्या career च्या निर्णयामध्ये आई-बाबांचा कितपत पाठींबा होता? त्यांची भूमिका काय होती..?

या क्षेत्रात नेहमी positive राहणं.. patience ठेऊन प्रयत्न करत राहणं हे खूप गरजेचं असतं.. आणि त्यासाठी घरच्यांची साथ असणं महत्वाचं ठरतं.. मलाही आई-बाबांचा अगदी सुरुवातीपासूनच पूर्ण पाठींबा होता.. मला जे आवडतंय.. ज्या गोष्टीमध्ये मला मनापासून आनंद मिळतोय.. ती गोष्ट career म्हणून निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मला होतं.. आणि या बाबतीत मी स्वतःला खूप भाग्यवान समजते खरंतर..!!

नाटक, सिनेमा, जाहिरात आणि सिरिअल्स ही सगळीच अभिनयाची क्षेत्रं आहेत.. यात अभिनय करताना काय साम्य-फरक जाणवतात..?

नाटकातल्या actual acting पेक्षा पण तालमीची process मी खूप enjoy करते.. आणि performance ची पण एक वेगळीच मजा असते.. live audience समोर काम करताना खूप मस्त वाटतं.. आपण केलेल्या कामाची पावती लगेच मिळते.. जाहिरात, सिनेमा आणि सिरिअल्स म्हणजे परिणामी कॅमेरा समोर काम करताना तर प्रत्येक गोष्टीतले बारकावे पाहून.. अगदी balenced असा अभिनय करावा लागतो.. विशेष म्हणजे सिनेमा, सिरिअल्स चा reach खूप जास्त आहे..

तुझ्या आत्तापर्यंतच्या जडणघडणीत एक कलाकार म्हणून समृध्द होण्यासाठी कोण-कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या..?

माझ्या लहानपणी माझी शाळा मला कला क्षेत्रात काहीतरी करायला नेहमीच प्रोत्साहन द्यायची.. माझ्या जळगावाने देखील मला एक कलाकार म्हणून प्रगल्भ होण्यात मोलाचा वाटा उचललाय.. आणि मी जिथे पुढचं शिक्षण घेतलं.. ते माझं स. प. महाविद्यालय.. स.प. मधे मला म्हणावी तशी संधी नाही मिळाली.. पण बऱ्याच नवीन लोकांशी ओळखी झाल्या.. त्या वाढल्या.. आणि मला एक समृध्द कलाकार म्हणून तुम्हा रसिकांसमोर येण्यासाठी या सगळ्याच गोष्टींचा खूप उपयोग झाला..

श्रेयस तळपदेंच्या Affluence सोबत काम करण्याचा अनुभव कसा होता..?

सगळ्यात आधी मला श्रेयस तळपदेंचे खूप-खूप आभार मानायचेत.. कारण जेव्हा तुम्हाला या industry मधे यायचं असतं.. आणि introduce करताना एक इतकं मोठं banner तुमच्या पाठीशी असतं.. तेव्हा तुमचं future खूप bright असतं.. मला श्रेयस तळपदेंकडून खूप काही शिकायला मिळालं.. श्रेयस दादा आम्हाला प्रत्येक गोष्ट निट समजून सांगायचा त्यामुळे कधीही दडपण आलं नाही.. तो एक अभिनेता म्हणून जितका मोठा आहे तितकाच अस्सल माणूसही आहे..

अमृता मराठी फिल्म industry कडून तुझ्या काय अपेक्षा आहेत..?

मराठीत आजकाल खूप आव्हानात्मक प्रयोग होताना दिसतायत.. एका नवीन पर्वाच्या दिशेने चाललेली ही वाटचाल खरोखरंच कौतुकास्पद आहे..आणि त्यामुळेच नेहमीच प्रयोगशील राहणाऱ्या मराठी फिल्म industryने मला लवकरात लवकर तिच्यात सामावून घ्यावं असं मला वाटतं..

तुषार पवार

Previous articleकर्मयोगी- डॉ. बाबा आमटे
Next articleगगन ठेंगणे- रोहन उपळेकर भाग १
Crammed of Spirituality... Loved to be surrounded by Positive Vibes... पाडगावकर, खांडेकर, दवणे, मतकरी, पुलं, वपु, चंगो; आणि अजून कित्येक... या व्यक्तिंनी जे दर्जेदार लिहिलं.. ते साहित्य वाचून, अनुभवून झपाटून गेला; 'शुभॠष्' या टोपण नावाने लिहीणारा एक स्वैर-लेखक... डॉ. तुषार प्रशांत पवार आणि जेव्हा त्याच्या सोबतीनं, त्याच्याच सारखे साहित्यवेडे जमले तेव्हा प्रत्यक्षात आली 'शब्दीप्ता Magazine' ची संकल्पना...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here