सुरेल वाटचाल- डॉ. नेहा राजपाल

वैद्यकीय व्यावसायिक शिक्षण घेऊनही इतर क्षेत्रात पूर्णवेळ काम करणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत.. डॉ. नेहा राजपाल ह्या त्यांपैकीच एक.. वैद्यकीय शाखेचं (M.B.B.S.) शास्त्रशुध्द शिक्षण घेतलेल्या डॉ. नेहा सध्या संगीत क्षेत्रात पूर्णवेळ कार्यरत आहेत.. त्यांनी आत्तापर्यंत हिंदी-मराठी मधे बरीच गाणी गायली आहेत.. २००४ साली झालेल्या हिंदी सारेगामा स्पर्धेच्या विजेतेपदापासून सुरु झालेल्या त्यांच्या सांगीतिक प्रवासाची भरारी आज “नेहा राजपाल प्रॉडक्शनस्” पर्यंत उंचावलेली पहायला मिळते.. डॉ. नेहा ते गायिका नेहा राजपाल या दरम्यानच्या प्रवासाबद्दल शब्दीप्ता Magazineच्या टिम ने त्यांच्याशी केलेली खास बातचीत..

अभिनिवेष- डॉ. निलेश साबळे

सासवड (पुणे) चा राहणारा एक मुलगा गडहिंग्लज कॉलेज मधे B.A.M.S. ला प्रवेश काय घेतो.. अभ्यासाबरोबरच स्वतःतील कलागुणांना खतपाणी काय घालतो.. झी मराठी वाहिनीवरील अभिनयाच्या स्पर्धेत भाग काय घेतो.. ती जिंकतो आणि हास्य जगतात विक्रम घडवून आणणाऱ्या फू-बाई-फू मालिकेचा निवेदक म्हणून सर्वांच्या मनात घर काय करतो.. त्यानंतर त्याला व्यक्त होण्यासाठी एक भक्कम असा कार्यक्रम मिळतो.. आणि मग स्पर्धेतल्या बाकी सगळ्यांना ‘चला हवा येऊ द्या’ म्हणत त्याची गाडी सुसाट सुटते..
वरवर जरी सगळं सहज-सोपं वाटंत असलं.. तरी त्यामागचे प्रयत्न.. अडथळ्यांवर केलेली मात.. आणि स्वप्नपूर्तीसाठीचं झगडणं.. याबद्दल आजचे आघाडीचे निवेदक डॉ. निलेश साबळे यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केलाय शब्दीप्ता Magazineच्या टिम ने..

कर्मयोगी- डॉ. नितू मांडके

सामान्य माणसाला देव आणि डॉक्टर्स फक्त अडचणीच्या वेळीच आठवतात.. परंतु काही डॉक्टर्स समाजात असं काही उत्तुंग करून जातात की लोक नेहमी त्यांना देवस्वरूप मानून.. नेहमीसाठी ‘हृदयस्थ’ करतात.. या देवदूतांना ईश्वराने कुठल्यातरी शापाच्या उःशापा-खातर पृथ्वीवर पाठवलेलं असतं.. त्यांचं कार्य झालं की ते विधात्याने त्यांच्यासाठी पाठवलेल्या पुष्पकामधे विराजमान होतात.. आणि जनमानसात नेहमीसाठीच एक पोकळी सोडून जातात.. त्यांपैकीच एक “सुहृदयी सर्जनशील व्यक्तिमत्व” म्हणजे जगद्विख्यात हृदयशल्यविशारद कै. डॉ. नित्यानंद ऊर्फ नितू मांडके..

शब्दीप्ता of the issue- श्री. प्रवीण दवणे

कितीही खस्ता खाल्या तरी त्यातून उभारी घेण्याचं बळ पंखांमध्ये फुंकून सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला गगन भरारी घेण्याचं स्वप्न पहायला लावणारे.. सामान्याहून सामान्य होत प्रसंगी घरातल्या कर्त्या पुरुषाची जागा घेत अस्तित्वाची लढाई लढण्याचं बळ देणारे.. प्रवीण दवणे.. आपल्या सहज, सोप्या अन् ओघवत्या शैलीतल्या लिखाणामुळे विशेष ठरतात..
ज्याच्या अंगातले त्राणच संपले आहेत अश्या व्यक्तीलाही मदतीचा हात देऊन.. कोणत्याही परिस्थितीतून बाहेर काढण्याचा मानस ठेवत.. ‘सावर रे..’ म्हणत.. श्री. दवणे आपल्यासमोर येतात..