उलटा चष्मा- सुजय डहाके

“Feel the content but ask for more” ही आमची Tagline.. ज्याप्रमाणे ‘शब्दीप्ता eMagazine’ नेहमीच जास्तिची अपेक्षा करतं.. त्याप्रमाणे तू स्वत:कडून अश्या कोणत्या जास्तिची अपेक्षा करतोस..?

मी आजपर्यंत जे काम केलंय त्याहून अजून प्रगल्भ काम माझ्या हातून नेहमीच घडत राहो.. मी एखाद्या गोष्टीतले बारकावे खूप चांगल्या पद्धतीने हेरु शकतो.. मला असं वाटतं त्याच कारणी माझ्या संवेदना अजून जास्त जागृत व्हाव्यात.. आणि मला ती हर एक गोष्ट माझ्या कामातून उतरवता यावी.. मी बऱ्याचदा त्या गोष्टी माझ्या चित्रांतून देखील चितारत असतो..
मला असं वाटतं, मला एक माणूस म्हणून सिनेमा जगता यावा.. म्हणजे माझं आयुष्यच सिनेमामय व्हावं.. आणि तश्याच त्या वातावरणात अगदी वयाच्या नव्वदीतही माझी सर्व इंद्रिय शाबूत असावीत.. आणि मला तेव्हा देखील सिनेमा जगता यावा असं मला वाटतं..

आज पासून सुरु होतंय एक नवीन पाक्षिक सदर.. शब्दीप्ता eMagazineचा संपादक डॉ. तुषार पवार याने घेतलेल्या मुलाखती.. ज्यांच्या चष्म्यातून आपण सिनेमा नाटक मालिका पाहतो.. त्यांना त्यांचाच चष्मा उलटा घालायला लावून त्यांच्या दिग्दर्शनाच्या शैलीबाबत.. आणि त्यांच्या कलाकृतींबाबत बोलतं करण्याचा केला गेलेला हा प्रयत्न..

 “उलटा चष्मा” नक्की वाचा.. दर महिन्याच्या ९ आणि २३ तारखेला..
वाचा संपूर्ण मुलाखत इथे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *