सतत सावधपणे विवेकबुद्धी जागृत ठेवल्यास आपल्याकडून योग्य, सत्य, कायमस्वरूपी टिकणारे असेच कर्म घडू शकेल. ज्यामुळे चुकांपासून बव्हंशी दूर राहता येईल. नकारात्मकता दूर ठेवून स्वतः ला अधिकाधिक उन्नत करता येईल.
विवेकी वृत्ती ही आयुष्य आनंदाने जगायला शिकवणारी आहे. ती प्रत्येक क्षणी आपल्या सोबत आहे. सातत्याने विवेकशील राहता आले तर स्वतः ला व इतरांना आनंदी ठेवणे शक्य आहे…