शब्दीप्ता June’2016

संपादकीय..!!!

Feel The Content… But Ask For More..!!! हे ब्रीद वाक्य घेऊन, अनेक आघाडीच्या दैनिक, पाक्षिक, तसेच मासिकांच्या स्पर्धेत… आम्ही आपल्या सेवेत हजर झालो आहोत; शब्दीप्ता Magazine च्या माध्यमातून… शब्दीप्ता म्हणजेच… शब्दांना दीप्त करणे.. स्वत:च्या लेखणीने शब्दांना दीप्त करुन साहित्य निर्मिती करणा-या अवलियांचा सन्मान करणे; हा आमचा प्रमुख उद्देश, आणि याच उद्देशास सफल करण्यात आमची साथ देत आहेत… महाराष्ट्रातील तरुण लेखक-लेखिका…

शब्दीप्ता हे एक eMagazine आहे… यात मराठी आणि English अश्या द्विभाषी साहित्याचा समावेश असेल… दर महिन्यातील संकष्टी चतुर्थी च्या दिवशी नवीन अंक प्रकाशित केला जाईल… ज्यात असेल, तुमच्या विचारांना प्रगल्भ करण्याच्या दृष्टिने उपयोगी खाद्य, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती, आणि विविध विषयांवरील चिंतनात्मक लेखन, तरुण लेखक-लेखिकांच्या नजरेतून…

पदार्पणातंच आम्ही आपल्या इच्छा, अपेक्षांची पुर्ती करण्याचं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून आहोत.. पदार्पणातल्या पहिल्या आठवड्यातंच आम्ही तब्बल ७५० हून अधिक लोकांच्या पसंतीस उतरलो आहोत.. मी याचं श्रेय; मला वेळोवेळी मदत करणाऱ्या आणि माझ्यावर विश्वास दाखवलेल्या आपणा सर्व वाचकांना देऊ इच्छितो..

असंख्य दिग्गज लेखक-कवींनी मराठी भाषा आणि आपणा रसिकांच्या दरम्यान सेतू बांधण्याचं मोलाचं काम केलं आहे आणि याच कार्यात आम्हीही अगदी खारीचा वाटा उचलण्याचं व्रत घेऊन आहोत.. प्रतिभावान लेखक-कवीचं साहित्य वाचून, अनुभवून आमच्या शब्दांना उजळवून आपणासमोर सादर करीत आहोत..

या magazine कडे आज युवकांचा सहभाग असणारं.. दर्जेदार साहित्याचा नजराणा असणारं.. आणि वाजवी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारं एक महत्वपूर्ण magazine म्हणून पाहिलं जातं.. आणि ज्याचा मला अभिमान वाटतो..

प्रत्येक अंकागणिक आम्ही काही सदरांचा अंतर्भाव नव्याने करीत असतो.. परंतू या अंकात जुन्याच काही सदरांच्या दर्जाबद्दल खबरदारी घेऊन नव्याने विचार करण्यात आला.. मागच्या अंकात नव्याने अंतर्भूत केलेलं सदर.. “चार पावसाळे अधिक..” आपल्या पसंतीस उतरल्याचं दिसतं.. शब्दीप्ताच्या टीम मध्ये संपादकापासून ते स्तंभ लेखकांपर्यंत आणि वेबसाईट डीझाईनर पासून ते संकालकापर्यंत सर्वजण २२ ते ३२ या वयोगटातलेच आहेत.. तेव्हा आपल्यापेक्षा चार पावसाळे अधिक पाहिलेल्या काही लेखक-लेखिकांना या लेखन प्रक्रियेत समाविष्ट करूयात असा विचार आला आणि तो प्रत्यक्षात साकारही झाला.. आम्हा युवा लेखक-लेखिकांच्या बरोबरीनेच अधिक अनुभवी लेखकांना मागल्या अंकापासून शब्दीप्ताच्या लेखक चमू मध्ये समाविष्ट करून घेण्यात आलं..

संतसाहित्याचा अविरत आभ्यास करणाऱ्या रोहन उपळेकर याने संगीत आणि योग याचा घेतलेला संमिश्र आढावा या अंकात देत आहोत.. त्याबरोबरच आशिष तांबे या माझ्या चित्रकार मित्राने अक्षर गणेशाच्या माध्यमातून त्याच्या कलेचा शेतकरी बांधवांसाठी केलेला उपयोग.. Whale wishers studios च्या सोबत सुरु केलेला त्याचा एक स्वागतार्ह उपक्रम.. आशिषच्या अक्षर गणेश एक पाऊल, कलेतून जाणिवेकडे या उपक्रमामध्ये सहभाग घेऊन आपल्या नावात वसलेले बाप्पा अनुभवण्यासाठी.. आपल्या शेतकरी बांधवांना सुखाचा घास भरवण्यासाठी.. आणि महाराष्ट्रातला भीषण दुष्काळ भरून काढण्यासाठी, आपली एक ओंजळ टाकण्याकरिता तुम्ही त्याला संपर्क करू शकता.. आशिष तांबे ९८२१८५३५७२ या क्रमांकावर..

अत्यंत भावस्पर्शी वर्णन.. लेखणीच्या सहाय्याने गुंतवून ठेवणारी शैली.. आणि तरल तरंगी लिखाण या मुळे लक्षात राहणारे.. गवत्या, एकम्, समुद्र, शाळा, यांसारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून मानवी मनाच्या गाभ्याला हात घालणारे एक प्रभावी व्यक्तिमत्व; लेखक-कवि मिलिंद बोकील यांच्या बद्दल या अंकात; शब्दिप्ता of the issue या सदरात वाचायला मिळेल..

तसंच आपली नेहमीची सदरं आहेतच.. सुरेल वाटचाल या सदरामध्ये गायक मंगेश बोरगावकरची घेतलेली खास मुलाखत आहे.. त्याच बरोबर अभी आमकर या अभिनेत्याची घेतलेली exclusive मुलाखत अभिनिवेश या सदरामध्ये.. या सोबतच वाटेकर्स, कागदजादे, हि सदरं आहेतच..

या अंकाच्या coverpage साठी प्रसिद्ध छायाचित्रकार योगेश गोलांडे यांनी काम पाहिलं.. यथार्थ या त्यांच्या गोंडस मुलाच्या त्यांनी टिपलेल्या छबिने या अंकाला मिडास टच मिळाला आहे असं मी म्हणेल..

वाचकहो.. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अजून समृध्द होण्यासाठी मदत करीत आहेत.. तेव्हा मुक्त हस्ताने आम्हाला प्रतिक्रिया लिहून पाठवत जा..!!

shubdeepta.comया website वर टाकण्यात आलेला प्रत्येक लेख तुम्हाला इथे एका Pdf fileच्या स्वरुपात देखिल उपलब्ध करुन देण्यात येईल… तुम्हाला फक्त इथे sign up करावं लागेल; चला तर मग, shubdeepta.com वर नि:शुल्क आपलं खातं काढा, आणि साहित्याच्या या नि:पक्षपाती झऱ्याचं अमृत प्राशन करुन तृप्ततेचा अनुभव घेण्यास तयार व्हा…!!!

२५ मे.. संकष्टी वैशाख, २०१६ रोजी प्रकाशित केलेला शब्दीप्ता Magazineचा चौथा अंक त्यातल्या काही खास सदरांमुळे विशेष गाजला.. या अंकामध्ये अभिनेता अभिषेक देशमुख ने अंक वाचून दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेचा देखील समावेश करीत आहोत..

२३ जून.. संकष्टी ज्येष्ठ, २०१६ रोजी प्रकाशित होणारा शब्दीप्ता Magazine चा हा पाचवा अंक.. बाप्पा चरणी समर्पित करीत आहोत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *