Television, मालिकांचे पुनरागमन आणि मुसाफिर_अभि

नमस्कार, राम राम मंडळी… मनोरंजन म्हणजे मनुष्याच्या जीवनातला एक अविभाज्य घटक.. माणसांमधल्या नात्यांच्या, भावविश्वात घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी, एका मागोमग सलग, सतत पहायला इथेच मिळतात.. कधी भाऊजींच्या प्रेमळ हाकेनी वहिनींच्या चेहऱ्यावर हास्य येतं.. तर कधी ते बबड्याच्या आळशीपणा मुळे,…

प्रिय गण्या, जीवाची बाजी

मी गावात होतो. काय झालंय न काय नाही विचार करत मी घराकडे वळालो घरापुढं लावलेल्या गाडीकडं माझं ध्यान गेलं.. काल आणलेल्या गाडीचं सुख जणू गायपच झालं होतं बग आणि ती गाडी घेण्यासाठी दादांनी पैकं कुठून आणलं.. कसं आणलं याची चिंता व्हायला लागली.. मी पाणी पिलो कळत नकळत खिश्यात असलेला 12 हजाराचा मोबाईल काढून टाइम बघितला 1 वाजून 30 मिनिट झाली होती..

शाश्वत-अटळ, – उंबरठा

जन्म, त्या दाराचं पहिलं पाऊल जिथे आपण त्या अटळ सत्याच्या दिशेने पुढे सरकतो. हा जन्म त्या वाटेवरचा वाटसरू, जिथे अनेक स्वप्नांशी, परिस्थितीशी, भिन्न गोष्टींशी तो सोबत करून, हातात-हात घालून त्या दिशेने चालतो. हा जन्म चालता-चालता आपली शारीरिक अन मानसिक अवस्था बदलतो “वेळेप्रमाणे”.. जसं ते बालपण! त्या अटळ सत्याच्या दारापर्यंत त्याला सोबत करतं. ती अवस्था त्याला रांगत, पळत, पडत का होईना त्या दारापर्यंत घेऊन जातं..

चार पावसाळे अधिक- B+ve विचारगट

मला आयुष्य चांगल्या प्रकारे जगायचंय.. माझ्या गरजा मी माझ्या मिळकतीत पूर्ण करू शकत नाही.. म्हणून मी कर्ज घेतो ‘B+_विचारगट’ म्हणेल मी कर्ज स्वखुशीने घेतेले आहे.. माझ्या गरजांसाठी घेतले आहे.. मी ते फेडू शकतो इतक्याच प्रमाणात घेतले आहे.. ज्या कामासाठी घेतलंय ते; म्हणजे धंद्याला भांडवल, राहायला घर, मुलांचे उच्चशिक्षण, शेतीत सुधारणा, मुलीचे लग्न, आईवडिलांचे आजारपण या विधायक कामांसाठीच खर्च केले जाईल.. याउलट मी इतके कर्ज घेतले आहे आता ते कसे फेडू, याचं सुरुवातीलाच टेंशन घेणे.. घेतलेलं कर्ज दुसऱ्याच कुठल्या विघातक कार्यासाठी खर्च करणे.. मनमानी खर्च करणे.. त्या पैशांचा वापर उत्पन्न मिळवण्यात न केल्या कारणाने कर्ज फेडू शकत नाही.. आणि मग काय.. पुन्हा कर्ज.!!

क्षणामृत- जीवन संजीवनी

राधा आज फार समाधानाच्या हावभावांनी निजली होती.. अजिंक्यला उगाच आपण कुठेतरी चुकतोय असे वाटुन गेले.. सोळा वर्षांचा हा सुखी संसार रेटतांना राधेच्या या गुणांकडे मी का बघीतले नाही.. तीला मी मॅच्युअर्ड म्हणून गृहीत धरले अन् ती त्यात खरी उतरत गेली. आता त्याला आठवु लागलं. गेली कित्येक वर्षं आम्ही दोघांनी करिअर.. बँकबॅलन्स..

चार पावसाळे अधिक- माझी माय, ‘भातसाई..!!’

आम्ही गाडीतून उतरलो.. कमानीवर लावलेल्या फलकांनी आमचं स्वागत केलंच होतं.. गेटमधून आत जाताना अनेक ओळखीचे चेहरे समोरून येऊ-जाऊ लागले.. आम्ही नावं नोंदवली तेव्हा एक गुलाब-पुष्प, प्रमाणपत्र आणि श्यामची आई हे पुस्तक देऊन आमचं स्वागत झालं.. आणि मग गतस्मृतींना उजाळा देऊन माणसं आठवून त्यांच्याशी बोलून आठवणींना उजाळा देणं सुरु झालं.. काहींचे चेहरे आठवत.. पण नावं आठवत नव्हती.. तरी सगळ्यांना माझी ओळख सांगत.. त्यांची ओळख पटवत भेटी घेत गेले..

मुसाफिर अभि- चिंता – काळजी

लॉकडाउन, मास्क-सॅनिटायझर, नियम-अटी, वर्क फ्रॉम होम या सगळ्या धाग्यांनी आपण आपल्याला बांधून ठेवलंय अक्षरशः अहो धागेच आहेत फक्त.. आयुष्य ह्याहून फार मोठं आहे.. या सगळ्यात मुळात आपण जगणंच सोडलंय असं नाही वाटत.. हां पण या काळात चिंता आणि काळजी मधला फरक मात्र मला चांगलाच उमगलाय..

हे दोन्ही शब्द जरी समानार्थी वाटत असले तरी काळजीशी, आपुलकीची सकारात्मकता जोडली आहे आणि चिंतेशी, भीतीची नकारात्मकता जोडली आहे.

आज पासून सुरु होतंय एक नवीन पाक्षिक सदर..
अभिषेक करंगुटकर याच्या लेखणीतून साकारलेलं मुसाफिर अभि शी केलेलं हितगुज..
मुसाफिर अभि नक्की वाचा.. दर महिन्याच्या १० आणि २४ तारखेला..

प्रिय, गण्या- देश माझा

प्रिय,
गण्या

सकाळची वेळ होती मस्त आईच्या हातचा चहा पिऊन मी वेशिकडे निघालो होतो..

वाटत असणाऱ्या घरात जेथे महादेव भय्या राहायचे सहज त्यांच्या घराकडे  वळलो.. त्यांच्या चिमुरडीची गाठ घ्यायला.. चींकी वयाने लहान आणि विचाराने मोठी गोड.. सुंदर, मनमिळाऊ, तिची ओढ गल्लीतील प्रत्येकाला होती.. घरात एक आई आज्जी आणि ती चिमुरडी राहायची.. महादेव भय्या तर सरहद्दीवर देश सांभाळत असायचे.. जम्मू काश्मीर मध्ये तर फोन ही लावायला यायचा नाही.. रेंज नसायची आणि तिथे टॉवर ही नव्हता जवळपास.. त्यामुळे त्यांचा हाल-हवाला ते चिठ्ठी मधून कळवत असत…………..

आज पासून सुरु होतंय एक नवीन पाक्षिक सदर.. गणेश मगर याच्या लेखणीतून साकारलेली.. गण्याला लिहिलेली पत्र..

 “प्रिय, गण्या” नक्की वाचा.. दर महिन्याच्या ८ आणि २२ तारखेला..

शाश्वत-अटळ, – जन्म

बालपणात कसलाच स्वार्थ नसतो; असतो तो आनंद छोट्या-छोट्या गोष्टींत लपलेला. तो पाहिलेला चंद्र मनात घर करतो पण निस्वार्थ.! हे बालपण त्याला पकडण्यात कधीच मग्न नसतं, ते तर केवळ निर्मोह हसत राहतं त्या चंद्राला बघून.. हे बालपण बघतं त्या क्षितिजाकडे, त्या सूर्याकडे, ती किरणं अंगावर घेतं अन् डोळे मिचकावतं निःसंदेह.. त्याला नसते उद्याची फिकीर.. हे बालपण त्या घडणाऱ्या मनाची अवस्था असतं, अहंकारविरहीत आस्था असतं. हे बालपण पाऊल असतं त्या नव्या दिशेने, जिथे कुठल्या दिशेला जायचं हे माहिती नसतं पण……
आज पासून सुरु होतंय एक नवीन पाक्षिक सदर..
शाश्वत-अटळ
नक्की वाचा..
दर महिन्याच्या ६ आणि २१ तारखेला..

क्षणामृत

विधात्याच्या हरएक कला कृती प्रसंगाकडे जनमानसापेक्षा भिन्न नजरेने बघता आले तर.. विपरीतेतही समरसता आली नाही, तरी अलिप्तपणे न्याहाळायला तरी नक्कीच शिकता येईल.. स्वतःतील बलस्थानं अव्वल ठरण्यासाठी पुरेशी असतात.. केवळ प्रत्येकाने ती जगायला हवीत..

हीच आहे जीवन संजीवनी..

आज पासून सुरु होतंय एक नवीन पाक्षिक सदर..
क्षणामृत
नक्की वाचा..
दर महिन्याच्या ४ आणि १९ तारखेला..