प्रपा म्हणजे पाणपोई. श्रीगुरु हे निरंतर प्रवाहित होणा-या भगवत् चैतन्याची पाणपोईच असतात. कोणीही यावे व त्या सिद्ध ज्ञानमय चैतन्याचे पान करून सुखी व्हावे, तिथे कसलाही धरबंध नाही, कोणतीही अडवणूक नाही. फक्त अनन्यता व शरणागती मात्र हवी, तरच ह्या चैतन्याचे अमृतपान भरभरून करता येते.
शिष्याच्या विषयी असलेला श्रीगुरूंचा निखळ प्रेमभाव सांगताना अभंगाच्या तिस-या चरणात पू. श्री. दादा म्हणतात,
गुरु प्राणांचाही प्राण ।
शिष्यालागी आत्मदान ॥३॥
आपल्या शरीरात दहा प्राण असतात. प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे पाच मुख्य प्राण तर……
आज पासून सुरु होतंय
श्री. रोहनजी उपळेकर यांच्या अखंड सद्गुरू निष्ठेतून आणि संतसाहित्याच्या प्रगाढ अभ्यासातून लेखणीबद्ध झालेलं एक नवीन पाक्षिक सदर..
ब्रम्हानंद
नक्की वाचा..
दर महिन्याच्या ५ आणि २० तारखेला..
