ब्रह्मानंद- मीराँ गिरधर प्रेम दिवाँणी

अनुत्तरभट्टारिका, व्रजनंदिनी महारासेश्वरी श्रीकृष्णप्रिया श्री श्री मीराबाईंच्या श्रीचरणीं जयंतीनिमित्त सर्वांच्या वतीने सादर साष्टांग दंडवत !
अभंग आस्वाद – भाग नववा मधील पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी रचलेल्या अतिशय गोड काव्यमय  अर्पणपत्रिकेच्या रूपाने आपणही महाभगवती श्री मीराबाईंच्या चरणीं प्रेमपसायाची सादर प्रार्थना करू या.

ब्रह्मानंद- गुरु नाही नाशिवंत(उत्तरार्ध)

प्रपा म्हणजे पाणपोई. श्रीगुरु हे निरंतर प्रवाहित होणा-या भगवत् चैतन्याची पाणपोईच असतात. कोणीही यावे व त्या सिद्ध ज्ञानमय चैतन्याचे पान करून सुखी व्हावे, तिथे कसलाही धरबंध नाही, कोणतीही अडवणूक नाही. फक्त अनन्यता व शरणागती मात्र हवी, तरच ह्या चैतन्याचे अमृतपान भरभरून करता येते.
शिष्याच्या विषयी असलेला श्रीगुरूंचा निखळ प्रेमभाव सांगताना अभंगाच्या तिस-या चरणात पू. श्री. दादा म्हणतात,
गुरु प्राणांचाही प्राण ।
शिष्यालागी आत्मदान ॥३॥
आपल्या शरीरात दहा प्राण असतात. प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे पाच मुख्य प्राण तर……
आज पासून सुरु होतंय
श्री. रोहनजी उपळेकर यांच्या अखंड सद्गुरू निष्ठेतून आणि संतसाहित्याच्या प्रगाढ अभ्यासातून लेखणीबद्ध झालेलं एक नवीन पाक्षिक सदर..
ब्रम्हानंद
नक्की वाचा..
दर महिन्याच्या ५ आणि २० तारखेला..

ब्रह्मानंद- गुरु नाही नाशिवंत(पूर्वार्ध)

श्रीगुरुपौर्णिमा !
तुम्हां-आम्हां सद्गुरुभक्तांचा सर्वोच्च सण, अत्यंत आनंदाचा दिवस.
प्रत्येक गुरुभक्त आजच्या दिवसाची वर्षभर वाट पाहत असतो, असे म्हटले तर वावगे ठरू नये. खरोखरीच, श्रीगुरुपैर्णिमेचा दिवस अत्यंत आनंदाचा व समाधानाचाच असतो.
आजचा परमपावन दिवस आपण आपल्या श्रीसद्गुरूंच्या स्मरणात, त्यांच्या अनुसंधानातच व्यतीत करायचा असतो व आपण तसेच करतोही. तोच खरा आनंदाचा ठेवा असतो.
श्रीसद्गुरु हे तत्त्व आहे. श्रीभगवंतांची परमकरुणामयी अनुग्रहशक्ती म्हणजेच श्रीसद्गुरु. ज्या देहाच्या आश्रयाने हे सनातन तत्त्व आपल्यावर कृपाप्रसाद करते तो पुण्यदेहही आपल्यासाठी नित्यवंदनीय, नित्यपूजनीयच असतो….

आज पासून सुरु होतंय
श्री. रोहनजी उपळेकर यांच्या अखंड सद्गुरू निष्ठेतून आणि संतसाहित्याच्या प्रगाढ अभ्यासातून लेखणीबद्ध झालेलं एक नवीन पाक्षिक सदर..
ब्रम्हानंद
नक्की वाचा..
दर महिन्याच्या ५ आणि २० तारखेला..