आम्ही गाडीतून उतरलो.. कमानीवर लावलेल्या फलकांनी आमचं स्वागत केलंच होतं.. गेटमधून आत जाताना अनेक ओळखीचे चेहरे समोरून येऊ-जाऊ लागले.. आम्ही नावं नोंदवली तेव्हा एक गुलाब-पुष्प, प्रमाणपत्र आणि श्यामची आई हे पुस्तक देऊन आमचं स्वागत झालं.. आणि मग गतस्मृतींना उजाळा देऊन माणसं आठवून त्यांच्याशी बोलून आठवणींना उजाळा देणं सुरु झालं.. काहींचे चेहरे आठवत.. पण नावं आठवत नव्हती.. तरी सगळ्यांना माझी ओळख सांगत.. त्यांची ओळख पटवत भेटी घेत गेले..
Category: वर्ष २०१६
शब्दीप्ता of the issue- डॉ. सुमति क्षेत्रमाडे
स्वातंत्र्य पूर्वीच्या काळात ७ मार्च १९१३ या दिवशी सुमतिताईंचा जन्म झाला.. एका सर्वसामान्य कुटुंबात ज्या प्रमाणे एका मुलीला वाढवलं जातं त्याच प्रमाणे त्यांना वाढवलं गेलं.. त्यांच्या घरी कधीच मुलगा-मुलगी असा भेदभाव केला गेला नाही आणि त्यामुळेच कदाचित अतिशय चुणचुणीत अशी…
शब्दीप्ता of the issue- गुलजार साहेब
अतिशय प्रतिभासंपन्न लेखणी.. ‘पेना’ला असणारी ‘शीला’ची जोड.. आणि खर्जात लागणारा आवाज या स्वर्गानुभूतीच्या ईश्वरीय देणग्या लाभलेला एक कविमनाचा माणूस ज्याच्या अवकाशात.. रेहमान त्याच्या अवीट गोडीच्या चाली गुणगुणत असतो.. लता दीदी – आशा ताई एकमेकींना सवाल जबाब करत असतात.. कुठल्या तरी कर्मठ पीठाचे शंकराचार्य धर्माच्या गोष्टी करत असतात.. चर्चमधले फादर आणि मशिदीतले मौलाना एकत्र बसून बुद्धीबळ खेळत असतात.. आणि त्यांचा चिमुरडा नातू समय या सगळ्यांना बरोबर घेऊन नवा व्यापारचा डाव मांडून बसलेला असतो..
शब्दीप्ता of the issue- सुधा मूर्ती
अत्यंत भावस्पर्शी लेखन.. वाचकाच्या मनाचा अलगत ठाव घेणारी लेखनशैली.. आणि भाषेच्या बंधनापल्याड डोकाऊ पाहणारी वर्णनं.. या मुळे लक्षात राहतात त्या लेखिका सुधा मूर्ती; ‘डॉलर बहू’.. ‘महाश्वेता’.. यांसारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून भारतीय समाजचित्रण करणारं एक मनस्वी व्यक्तिमत्व.. infosys foundationच्या माध्यमातून Philanthropy करणाऱ्या सुधाताईंनी तर भारतीय स्त्री मधील कर्तुत्वसंपन्नतेची साऱ्या जगाला ओळख करून दिली..
शब्दीप्ता of the issue- मिलिंद बोकिल
अत्यंत भावस्पर्शी वर्णन.. लेखणीच्या सहाय्याने गुंतवून ठेवणारी शैली.. आणि तरल तरंगी लिखाण या मुळे लक्षात राहतात ते लेखक-कवि मिलिंद बोकील; गवत्या.. एकम्.. समुद्र.. शाळा.. यांसारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून मानवी मनाच्या गाभ्याला हात घालणारे एक प्रभावी व्यक्तिमत्व; शाळा या सिनेमाच्या प्रदर्शनातून तर त्यांचा साहित्यप्रवाह सर्वसामान्यांपर्यंत जाऊन पोहोचला.. आणि मिलिंद बोकील हे नाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले.. त्यांची शाळा ही कादंबरी वाचताना जाणवतं कि त्यांनी space realization च्या माध्यमातून ही कथा गुंफली आहे..
सुरेल वाटचाल- महेश काळे भाग २
सुगम आणि दादा.. दादा ज्याप्रमाणे शास्त्रीय संगीताचं शास्त्रशुध्द शिक्षण दिलं जातं.. त्याचप्रमाणे सुगमचेही classes घेतले जातात.. या दोनही गोष्टी एकमेकाला पूरक आहेत..? हो.. काही प्रमाणात.. पण म्हणजे तुम्ही शास्त्रीय शिकलात कि तुम्हाला सुगम गाता येतंच असं नाहीये बरं का ते..…
सुरेल वाटचाल- महेश काळे भाग १
महेश दादाचं बालपण.. दादा तुझ्या अगदी लहानपणीचा एक किस्सा आहे.. तू अगदी तीन एक वर्षांचा होतास बघ.. तेव्हा काहीतरी ४-५ हजारांच्या जमावासमोर गायला होतास ना.. ए दादा काय होता रे तो किस्सा.. सांग ना..!! अरे.. काय झालं होतं कि, गोंदवल्याला…
सुरेल वाटचाल- सावनी रवींद्र
सावनी सुरुवातीला आपण तुझ्या बालपणाबद्दल बोलूयात.. तशी तू मुळची कोकणातली.. काय सांगशील कसं गेलं बालपण..? गाणं लहाणपणापासुनच होतं का? हो.. माझा जन्म कोकणातलाच.. मी रत्नागिरीत जन्मलेय.. पण माझं संपूर्ण बालपण पुणे परिसरात गेलंय.. आम्ही पुण्याजवळच्या चिंचवड इथे राहायचो.. त्यामुळे शालेय…
अभिनिवेष- प्रथमेश परब
प्रथमेश सुरुवातीला आपण तुझ्या बालपणाबद्दल बोलूयात.. अगदी लहानपणापासून अभिनय क्षेत्राची आवड होती..? शाळेत असताना तू बालनाट्यांमध्ये वगैरे भाग घ्यायचास..? अगदीच शाळेत असताना अशी आवड नव्हती.. पण जेव्हा पासून कळायला लागलं.. मी TV मध्ये काही कॉमेडी shows वगैरे पाहायचो.. आणि ते…
कर्मयोगी- प्रा. के. एस. अय्यर
अतुल्य त्यागातून समाज उभारणीसाठी शिक्षित पिढी निर्माण करणारे आदर्श गुरु, अनामिक जीवन जगलेले शिक्षण क्षेत्रातील फकीर, विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे मातृहृदयी पालक, सुशिक्षित व सुसंस्कृत पिढी घडवणारे निरलस प्राध्यापक, एक प्रसिद्धीपराङमुख व्यक्तिमत्व, संस्कारदाता, मार्गदर्शक, आधारस्तंभ, स्फूर्तीदाता अशा विविध भूमिकांमधून प्रकट होणारे नि:स्पृह शिक्षक..