अभिनिवेष- प्रथमेश परब

प्रथमेश सुरुवातीला आपण तुझ्या बालपणाबद्दल बोलूयात.. अगदी लहानपणापासून अभिनय क्षेत्राची आवड होती..? शाळेत असताना तू बालनाट्यांमध्ये वगैरे भाग घ्यायचास..? अगदीच शाळेत असताना अशी आवड नव्हती.. पण जेव्हा पासून कळायला लागलं.. मी TV मध्ये काही कॉमेडी shows वगैरे पाहायचो.. आणि ते…

अभिनिवेष- सिद्धार्थ चांदेकर

अवधूत गुप्तेंच्या झेंडा या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करणारा.. माझ्या सह-कलाकारांमुळे माझ्यातला भिरभिरेपणा कमी झाला असं सांगणारा.. आणि मलाही असुरक्षितता बऱ्याच वेळी जाणवते असं अगदी प्रांजळपणे कबुल करणारा.. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याची शब्दीप्ताच्या टीमने घेतलेली हि खास मुलाखत..

अभिनिवेष- आदिश वैद्य

स्टार प्रवाह वाहिनी वरच्या “तुमचं आमचं सेम असतं” या मालिकेतून Television क्षेत्रात खऱ्या अर्थाने पदार्पण करणारा.. एका अभिनेत्याच्या दृष्टीने अभिनयासोबतच गुड लुक्स आणि वेल फिजीक या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या ठरतात असं सांगणारा.. आणि आज “झी मराठी” सारख्या वाहिनी वर “रात्रीस खेळ चाले” या मालिकेत ‘आर्चिस’ ही भूमिका साकारणारा अभिनेता “आदिश वैद्य” याची शब्दीप्ताच्या टीमने घेतलेली हि खास मुलाखत..

अभिनिवेष- अभिषेक देशमुख

लहाणपणापासूनच असणारी कलेची आवड… आई-वडीलांची भरभक्कम साथ… आणि झी-मराठी सारख्या ताकदीच्या बॅनरच्या मालिकेत प्रमुख भूमिका… या त्रिवेणी संगमासोबतच, “सुखी संसारासाठी फक्त पत्रिका नव्हे, तर मनंही जुळावी लागतात” हा विचार घेऊन… “पसंत आहे मुलगी” म्हणत घराघरात पोहचण्यास तयार असलेल्या ‘अभिषेक देशमुख’ ने शब्दीप्ताच्या टीमशी मारलेल्या दिलखुलास गप्पा..!!

अभिनिवेष- अमृता देशमुख

पुढे career कला क्षेत्रातंच करायचं असं अगदी लहानपणापासून ठरवणारी.. अतिशय स्पर्धा असणाऱ्या क्षेत्रात; आपलं असं कुणीही नसताना पहिलाच प्रोजेक्ट श्रेयस तळपदेंच्या Affluence सारख्या आघाडीच्या production house बरोबर करायला मिळणं हे मी माझं भाग्य समजते असं आवर्जून सांगणारी.. आणि मराठी चित्रपटसृष्टीने मला तिच्यात लवकरात लवकर सामावून घ्यावं असं अगदी निरलसतेने म्हणणारी.. “तुमचं आमचं सेम असतं” म्हणत महाराष्ट्रातल्या घर-घरात पोहोचलेली एक गुणी अभिनेत्री ‘अमृता देशमुख’ व्यक्त होतीये खास शब्दीप्ता magazine च्या वाचकांसाठी..

अभिनिवेष- डॉ. निलेश साबळे

सासवड (पुणे) चा राहणारा एक मुलगा गडहिंग्लज कॉलेज मधे B.A.M.S. ला प्रवेश काय घेतो.. अभ्यासाबरोबरच स्वतःतील कलागुणांना खतपाणी काय घालतो.. झी मराठी वाहिनीवरील अभिनयाच्या स्पर्धेत भाग काय घेतो.. ती जिंकतो आणि हास्य जगतात विक्रम घडवून आणणाऱ्या फू-बाई-फू मालिकेचा निवेदक म्हणून सर्वांच्या मनात घर काय करतो.. त्यानंतर त्याला व्यक्त होण्यासाठी एक भक्कम असा कार्यक्रम मिळतो.. आणि मग स्पर्धेतल्या बाकी सगळ्यांना ‘चला हवा येऊ द्या’ म्हणत त्याची गाडी सुसाट सुटते..
वरवर जरी सगळं सहज-सोपं वाटंत असलं.. तरी त्यामागचे प्रयत्न.. अडथळ्यांवर केलेली मात.. आणि स्वप्नपूर्तीसाठीचं झगडणं.. याबद्दल आजचे आघाडीचे निवेदक डॉ. निलेश साबळे यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केलाय शब्दीप्ता Magazineच्या टिम ने..