आनंदी तुझं बालपण कसं गेलं..?
मी लहानपणापासून मुंबईत वाढले.. आई-बाबा दोघेही नोकरदार असल्याने मी पाळणाघरात वाढले.. तिथे सगळ्याच गोष्टी कश्या अगदी वेळच्या-वेळी व्हायच्या.. आणि त्यामुळेच मला नेहमी scheduled राहायची सवय लागली.. बोरिवलीच्या Chogle highschool या शाळेची मी विद्यार्थिनी.. अवधूत गुप्ते, अमोल बावडेकर, ही मंडळी देखील आमच्याच शाळेतली..
आमच्या शाळेने आम्हा कलाकार होवू इच्छिणाऱ्या मुलांना नेहमीच प्रोत्साहन दिलंय.. आणि त्याचंच फळ म्हणून आज आम्ही सगळेच आमच्या-आमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करतोय.. मला लहानपणी घरूनही पूर्ण पाठींबा होता.. मी खेळात होते.. डान्स, नाटकं, गाण्याच्या वेगवेगळ्या स्पर्धांमधे भाग घ्यायचे.. मी कधीही अभ्यास एके अभ्यास असं कधीच केलं नाही.. Basically मी लहानपणापासून माझ्या बाबांकडे गाणं शिकायला सुरुवात केली होती.. आणि ते आजतागायत अखंड चालू आहे..
आनंदी तू Youth fest ची राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती गायिका आहेस.. काय सांगशील..?
मी दहावीला ८२% मिळवून रुहीया college मधे प्रवेश घेतला होता.. तिथे मला खूप चांगली मित्र-मैत्रिणी भेटली.. स्पृहा जोशी, अवधूत.. तिथला तेव्हाचा प्रत्येकजण आज एक यशस्वी कलाकार आहे.. आपल्याला घडण्यासाठी.. आपले विचार प्रगल्भ होण्यासाठी.. शिक्षणाबरोबरच संगतही महत्वाची असते.. आणि ती मला खूप उत्तम मिळाली.. Youth fest ला आम्ही सांघिक मधे सुवर्णपदक मिळवलंय.. तेव्हाचा तर अनुभव खूप विलक्षण होता, आपण कोणातरी खूप मोठ्या समुदायाला represent करतोय.. ही भावनाच खूप काही देऊन गेली.. तेव्हा एक pressure असायचं.. आणि त्याखाली काम करायची मजा पण यायची.. आज industry मधे काम करताना.. त्या team work चा खूप फायदा होतो..
एका गायकाच्या दृष्टीने त्याचा आवाज ही खूप महत्वाची गोष्ट असते.. perticulerly हे खावं.. हे खाऊ नये.. असं सांगितलं जातं.. तुला काय वाटतं या बद्दल..?
एका गायकाने त्याच्या आवाजाची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे.. ज्याप्रमाणे एखाद्या तबलजीचं कला सादर करण्याचं साधन त्याचे हात असतात त्याप्रमाणेच एका गायकाला त्याचा आवाज असतो.. त्यामुळे आवाजाची काळजी घेणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे.. आणि basically अमुक एखादी गोष्ट खाण्याने किंवा न खाण्याने.. आवाज चांगला होतो किंवा बिघडतो.. असं ठोकळमानाने सांगता येत नसतं..
प्रत्येकाच्या बाबतीत या गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात.. त्याचबरोबर वेळच्या-वेळी डॉक्टरांकडे जाऊन check up करून घेणंही तितकंच गरजेचं आहे.. गळ्याला विश्रांती देणं.. Lifestyle maintain करणं.. मुळात म्हणजे.. healthy आणि fit राहणं हे एका कलाकाराच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं..
शास्त्रीय संगीत हा सगळ्याचा पाया आहे.. नेहमी चित्रपटसंगीत गाणाऱ्या एखाद्या गायकाला देखील शास्त्रीय चा Base असणं गरजेचं आहे.. तुझं काय म्हणणं आहे या बद्दल..?
नक्कीच.. कारण classical music मुळे तुमचा base पक्का होतो.. श्वासाचं गणित.. आवाजातील चढ-उतार.. या गोष्टी अगदी सहज जमू लागतात.. even माझं सुद्धा विशारद झालंय.. आणि आता अलंकार करायची खूप मनापासून इच्छा आहे.. माझे गाण्यातले पहिले गुरु म्हणजे माझे वडील.. विजय गंगाधर जोशी हे यशवंतबुवा जोशी यांच्याकडे ३२ वर्ष ग्वाल्हेयार घराण्याची गायकी शिकले आहेत.. तसंच मी भावदीप जयपूरवाले यांच्याकडेही शिकतीये..
माझ्या बाबांकडेच शिकल्यामुळे नेहमीच गुरुंच्या सानिध्यात राहता आलं.. ख्याल गायकी सोबतच इतर जे उपशास्त्रीयचे प्रकार आहेत ते सुद्धा मला खूप आवडतात.. ठुमरी.. टप्पा.. झुला.. गझल.. गझल हा माझा सगळ्यात आवडता गीतप्रकार.. उपशास्त्रीय असो वा चित्रपटसंगीत या सगळ्याच साठी शास्त्रीय संगीत शिकणं खूप गरजेचं असतं.. असं मला तरी वाटतं..
गुरुकुल शिक्षण पद्धतीत शास्त्रीयचं उत्तम शिक्षण घेता येतं.. आज-काल काळाच्या ओघात ही पद्धत कुठेतरी लोप पावत चाललीये.. काय सांगशील..?
गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये गुरूंकडून शिकण्याचा अनुभव खूप वेगळाच असतो.. आपण नेहमीच त्या वातावरणात असल्याने.. आपल्या रियाजाच्या वेळीही गुरूंची करडी नजर आपल्यावर असते.. इतरांना शिकवतानाही आपल्या कानावर काही नवीन गोष्टी पडतात.. आपल्याला शिकवलेल्या गोष्टी अजून पक्क्या होतात.. आपण खूप intensely शिकू शकतो.. एकूणच गुरुकुल शिक्षण पद्धतीत परिपूर्ण शिक्षण घेता येतं..
महाराष्ट्रातली एक आघाडीची गायिका असणारी आनंदी जोशी.. मनात काही खंत ठेऊन आहे..?
Not as such.. पण एक गोष्ट mention करावीशी वाटते.. आजकाल non-filmy संगीत जास्त येताना दिसत नाही.. आज मराठी माधर जर ९०% filmy music येत असेल तर non-filmy फक्त १०%.. हा आकडा खरोखरंच विचार करायला भाग पडतो.. non-filmy मुळे प्रयोगशीलता जिवंत राहते.. नवनवीन प्रयोग आधी non-filmy गाण्यांच्या बाबतीत होतात.. आणि non-filmy गाण्यांमुळे गायक, संगीतकार, गीतकार संयोजक यांना काही नवीन प्रयोग करण्यासाठीची संधी मिळते.. आजकाल लोकांना घरबसल्या सगळं मिळण्याची सवय झालीये.. पायरेटेड movies.. इंटरनेट वरून download केलेली गाणी.. and all.. जे फुकट मिळतं त्याची quality तितकीशी चांगली नसते.. जर दर्जेदार ऐकायची इच्छा असेल तर लोकांनी non-filmy गाण्यांचे.. filmy गाण्यांचे albums विकत घेऊन ते ऐकायला हवेत.. आज लोकं albums विकत घेत नाहीत.. music बद्दल responsively विचार करत नाहीत.. ही माझ्या मनातली खंत आहे..
एक versatile गायिका असणारी आनंदी जोशी येत्या काही वर्षात स्वतःला कुठे पाहते..
मुळात मराठी music industry मधे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग होतात आणि त्याचाच परिपाक म्हणून आम्हाला हर प्रकारची गाणी गाण्याची संधी मिळते.. मला सगळ्या पद्धतीची गाणी गायला आवडतात.. त्यामुळेच असेल कदाचित.. मला दाक्षिणात्य संगीतही भयंकर आवडतं.. मला दक्षिणेत जाऊन तिथल्या music industry मधे एकदा काम करायची मनापासून इच्छा आहे.. मला पाश्चात्य संगीतही आवडतं.. Jazz, Pop, Rock,.. संगीताला कोणत्याही भाषेच्या बंधनात अडकवायला गेलं तर मग त्यातली मजा हरवून जाते.. मला भाषेच्या पलीकडलं संगीत आवडतं.. मी हर तऱ्हेचं गाणं गायला हवं असं मला वाटतं.. आणि त्यासाठीच मी स्वतःला अजून प्रगल्भ.. अन् समृद्ध करण्याकडे लक्ष देतीये..
चिटर/Cheater या आगामी सिनेमातल्या तुझ्या गाण्याबद्दल काय सांगशील..?
संगीतकार अभिजीत नार्वेकर यांनी संगीत दिलेलं.. आणि अखिल जोशी यांनी लिहिलेलं एक उत्तम गीत.. माझ्या वाट्याला आलं हे मी माझं भाग्य समजते.. पूजा सावंत या माझ्या मैत्रिणीवर चित्रित होणारं हे गीत माझ्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचं होतं.. तसेच सोनू निगमजींनी सुद्धा या सिनेमात दोन गाणी गायली आहेत.. एकूणच काय तर.. चिटर/Cheater या सिनेमासाठी गाण्याचा माझा एक वेगळाच अनुभव होता..
धन्यवाद आनंदी..
ही होती.. लहानपणापासून गाण्याच्याच वातावरणात वाढलेली.. वडिलांकडेच शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाचा श्रीगणेशा करणारी.. आणि non-filmy गाण्यांमुळे प्रयोगशीलता जिवंत राहते असं आवर्जून सांगणारी.. मराठी संगीतसृष्टीतली एक आघाडीची गायिका असणारी “आनंदी विजय जोशी..” आनंदी दाक्षिणात्य संगीतसृष्टीत काम करण्याची इच्छाही तितक्याच प्रांजळपणे व्यक्त करते.. पाश्चात्य संगीतातल्या काही गोष्टींचा अंगीकार करून जर नवनवीन प्रयोग झाले तर संगीतसृष्टीला नव्याने पालवी फुटेल असं सांगत आपल्या नोबल असण्याची ग्वाही देते.. आनंदीची झेप गरुडालाही लाजवेल अशी आहे.. तिच्या साठी सारं आभाळंच खुलं आहे.. तिच्या इथून पुढच्या वाटचाली साठी शब्दीप्ता Magazineच्या संपूर्ण टिम कडून खूप साऱ्या शुभेच्छा..!!
-तुषार पवार