सुरेल वाटचाल- महेश काळे भाग २

सुगम आणि दादा.. दादा ज्याप्रमाणे शास्त्रीय संगीताचं शास्त्रशुध्द शिक्षण दिलं जातं.. त्याचप्रमाणे सुगमचेही classes घेतले जातात.. या दोनही गोष्टी एकमेकाला पूरक आहेत..? हो.. काही प्रमाणात.. पण म्हणजे तुम्ही शास्त्रीय शिकलात कि तुम्हाला सुगम गाता येतंच असं नाहीये बरं का ते..…

सुरेल वाटचाल- महेश काळे भाग १

महेश दादाचं बालपण.. दादा तुझ्या अगदी लहानपणीचा एक किस्सा आहे.. तू अगदी तीन एक वर्षांचा होतास बघ.. तेव्हा काहीतरी ४-५ हजारांच्या जमावासमोर गायला होतास ना.. ए दादा काय होता रे तो किस्सा.. सांग ना..!! अरे.. काय झालं होतं कि, गोंदवल्याला…

सुरेल वाटचाल- सावनी रवींद्र

सावनी सुरुवातीला आपण तुझ्या बालपणाबद्दल बोलूयात.. तशी तू मुळची कोकणातली.. काय सांगशील कसं गेलं बालपण..? गाणं लहाणपणापासुनच होतं का? हो.. माझा जन्म कोकणातलाच.. मी रत्नागिरीत जन्मलेय.. पण माझं संपूर्ण बालपण पुणे परिसरात गेलंय.. आम्ही पुण्याजवळच्या चिंचवड इथे राहायचो.. त्यामुळे शालेय…

सुरेल वाटचाल- रोहित राऊत

त्याने हिंदी सारेगमप सुद्धा केलं पण (मराठी जनांमध्ये) खरी प्रसिद्धी त्याला मराठीतल्या लिटील चॅम्प्स नेच दिली.. आणि आज त्याच गोष्टीतून उतराई होण्यासाठी त्याने मराठी संगीत सृष्टीची कास धरली आहे.. तो हिंदीमध्ये जरी गेला तरी तो नेहमीच मराठी जनांचा राहणार आहे.. यात तिळमात्रही शंका नाही.. तुम्हाला जी गोष्ट करायची आहे ती तुमच्या साठी खूप महत्वाची आहे आणि त्या शिवाय तुमचं आयुष्यच ते काही नाहीये.. अश्या भावनेने जर प्रत्येकजण काम करता राहिला तर कामाच्या बाबतीत कुणीच मागासलेलं नसेल असं सांगणारा.. आणि आज मी जो काही आहे त्याचं श्रेय मी तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांना देय इच्छितो असं अगदी प्रांजळपणे कबूल करणारा.. एक सुमधुर आवाजाचा गायक संगीतकार..

सुरेल वाटचाल- हर्षवर्धन वावरे

मराठी संगीत सृष्टीतील सुवर्णकाळाच्या पर्वात एक काळ होता की जेव्हा स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, या नावांशिवाय पर्याय नव्हता.. आणि तश्यातच क्लासमेट्स या सिनेमातल्या “तेरी मेरी यारीयाँ” या गाण्यातून आला एक नवा आवाज.. ज्याने आपल्या सहज गायकीने साऱ्या महाराष्ट्राला भुरळ घातली.. आणि काही दिवसांतच त्याचा असा स्वतःचा चाहता वर्ग तयार झाला.. आज ‘हाफ तिकीट’ या सिनेमातल्या चारही.. वेगवेगळ्या जॉनरच्या गाण्यांमुळे खास चर्चेत आलेला.. आणि “त्रीनीती ब्रदर्स” या बँड मुळे युवा वर्गात प्रसिद्ध असलेला.. महाराष्ट्राचा आघाडीचा गायक हर्षवर्धन सुभाष वावरे याची शब्दीप्ता च्या टीमने घेतलेली हि खास मुलाखत..

सुरेल वाटचाल- मंगेश बोरगावकर

मी वयाच्या १६व्या वर्षी झी मराठी च्या सा रे ग म प या गाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता.. आणि उपमहागायका पर्यंत मजल मारली होती.. मला रसिक प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं.. मी stage shows करत गेलो.. त्यानंतर काही albums केले.. चित्रपटांसाठी गाणी गायलो.. मला वाटलंही नव्हतं की इतक्या अल्पावधीमध्ये मला सगळं………….
सांगतोय मंगेश बोरगावकर.. संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी क्लिक करा..

सुरेल वाटचाल- धवल चांदवडकर

धवल तुझ्या घरातच गाणं होतं.. तुझे आई-बाबा दोघेही संगीत क्षेत्रात काम करत असल्याने तुला अगदी लहानपणापासूनच गाण्याची बाळकडू देण्यात आलं होतं.. लहानपणापासूनच गायक व्हायचं असं ठरवलं होतंस..? काय सांगशील बालपणाबद्दल..? नाही खरंतर.. मी लहानपणापासून sports मध्ये जास्त होतो.. कॉलेज मध्ये…

 सुरेल वाटचाल- आनंदी जोशी

लहानपणापासून गाण्याच्याच वातावरणात वाढलेली.. वडिलांकडेच शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाचा श्रीगणेशा करणारी.. आणि non-filmy गाण्यांमुळे प्रयोगशीलता जिवंत राहते असं आवर्जून सांगणारी.. मराठी संगीतसृष्टीतली एक आघाडीची गायिका असणारी “आनंदी विजय जोशी..” आनंदी दाक्षिणात्य  संगीतसृष्टीत काम करण्याची इच्छाही तितक्याच प्रांजळपणे व्यक्त करते.. पाश्चात्य संगीतातल्या काही गोष्टींचा अंगीकार करून जर नवनवीन प्रयोग झाले तर संगीतसृष्टीला नव्याने पालवी फुटेल असं सांगत आपल्या नोबल असण्याची ग्वाही देते.. आनंदीची झेप गरुडालाही लाजवेल अशी आहे.. तिच्या साठी सारं आभाळंच खुलं आहे..
वाचा शब्दीप्ता च्या टीम ने घेतलेली तिची ही खास मुलाखत..

सुरेल वाटचाल- डॉ. नेहा राजपाल

वैद्यकीय व्यावसायिक शिक्षण घेऊनही इतर क्षेत्रात पूर्णवेळ काम करणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत.. डॉ. नेहा राजपाल ह्या त्यांपैकीच एक.. वैद्यकीय शाखेचं (M.B.B.S.) शास्त्रशुध्द शिक्षण घेतलेल्या डॉ. नेहा सध्या संगीत क्षेत्रात पूर्णवेळ कार्यरत आहेत.. त्यांनी आत्तापर्यंत हिंदी-मराठी मधे बरीच गाणी गायली आहेत.. २००४ साली झालेल्या हिंदी सारेगामा स्पर्धेच्या विजेतेपदापासून सुरु झालेल्या त्यांच्या सांगीतिक प्रवासाची भरारी आज “नेहा राजपाल प्रॉडक्शनस्” पर्यंत उंचावलेली पहायला मिळते.. डॉ. नेहा ते गायिका नेहा राजपाल या दरम्यानच्या प्रवासाबद्दल शब्दीप्ता Magazineच्या टिम ने त्यांच्याशी केलेली खास बातचीत..