नाना, आकाशातुन समुद्रात पडणाऱ्या थेंबांना किंमत नसते, किंमत फक्त शिंपल्यात पडणाऱ्या थेंबांना असते, कारण त्यांचा मोती होतो.. नाना तुम्ही मला किंमत दिलीए.. आणि मी वनवासातली सीता कधीच नव्हते कारण सीतेच्या पतीने तिला अग्नीपरीक्षा द्यायला लावली होती.. नाना तुम्ही माझ्यावर कधी साधं ओरडलाही नाहीत कधी.. मला सोन्यासारखी पोरं दिलीत.. समाजात मला किंमत मिळवून दिलीत.. तुमच्या कर्तुत्वामुळे समाजात नेहमी मी नानांची पत्नी म्हणून मिरवलं..
