तू भेटशी नव्याने- चांदणे तुझ्या स्मरणाचे

नाना, आकाशातुन समुद्रात पडणाऱ्या थेंबांना किंमत नसते, किंमत फक्त शिंपल्यात पडणाऱ्या थेंबांना असते, कारण त्यांचा मोती होतो.. नाना तुम्ही मला किंमत दिलीए.. आणि मी वनवासातली सीता कधीच नव्हते कारण सीतेच्या पतीने तिला अग्नीपरीक्षा द्यायला लावली होती.. नाना तुम्ही माझ्यावर कधी साधं ओरडलाही नाहीत कधी.. मला सोन्यासारखी पोरं दिलीत.. समाजात मला किंमत मिळवून दिलीत.. तुमच्या कर्तुत्वामुळे समाजात नेहमी मी नानांची पत्नी म्हणून मिरवलं..

तू भेटशी नव्याने- Buns n coffee

बॅगमधून तिने आणलेलं Ravinder Singh चं ‘will you still love me ?’ काढलं, bookmark  बाजूला ठेवून ती वाचू लागली..

“Rajveer rang the bell & lavanya opened the door”

तेवढयात तिची ऑर्डर आली, तिने ती घेतली आणि पुन्हा वाचु लागली,

“Lavanya was very shocked, she didn’t expect rajveer will surprise her in this way”

एवढ्यात तिला पुस्तकामागुन “Hiii” असा आवाज आला.

तिने पुस्तक थोडंसं बाजुला केलं आणि पाहिलं, साधारण 22-23 वर्षाचा मुलगा sky blue t- shirt, black jeans, sports shoes घालुन तिच्या समोर बसला होता. त्याच्या उजव्या पायातली सुटलेली shoelace पाहून तिने मान मुरडली आणि पुन्हा वाचू लागली..