पौर्णिमेचा चंद्र

“पौर्णिमा.. स्पष्ट बोलून मोकळी तरी हो नाहीतर सोडून तरी दे विषय.. असा स्वतःला त्रास करून घेत बसू नकोस” श्रुती म्हणाली.. तिला पौर्णिमाची मनस्थिती कळत होती.. पौर्णिमाला बोलताना तिच्या मनात असं काही नव्हतं.. पण तिला बोलतं करायला असं बोलणं भाग होतं तिला..

“सोडून द्यायचा असता विषय तर त्यात इतकं गुंतले असते का मी..? खिडकी मधून बाहेर बघत पौर्णिमा बोलत होती.. आणि हो चंद्राची हतबलता देखील समजू शकते मी.. आता ढगच दाटून आले असतील तर त्यात तो तरी काय करणार ना..?”

श्रुतीला तिच्या मनात काय चाललंय याची चांगलीच कल्पना होती.. पण तिला………..