राधा आज फार समाधानाच्या हावभावांनी निजली होती.. अजिंक्यला उगाच आपण कुठेतरी चुकतोय असे वाटुन गेले.. सोळा वर्षांचा हा सुखी संसार रेटतांना राधेच्या या गुणांकडे मी का बघीतले नाही.. तीला मी मॅच्युअर्ड म्हणून गृहीत धरले अन् ती त्यात खरी उतरत गेली. आता त्याला आठवु लागलं. गेली कित्येक वर्षं आम्ही दोघांनी करिअर.. बँकबॅलन्स..
