सुगम आणि दादा..
दादा ज्याप्रमाणे शास्त्रीय संगीताचं शास्त्रशुध्द शिक्षण दिलं जातं.. त्याचप्रमाणे सुगमचेही classes घेतले जातात.. या दोनही गोष्टी एकमेकाला पूरक आहेत..?
हो.. काही प्रमाणात.. पण म्हणजे तुम्ही शास्त्रीय शिकलात कि तुम्हाला सुगम गाता येतंच असं नाहीये बरं का ते.. म्हणजे बघ.. जसं science म्हंटलं तरी त्यात physics – biology – chemistry असे वेगवेगळे विषय असतात.. तसंच संगीतामधले हे वेगवेगळे विषय आहेत.. आणि सुगम चं शिक्षण घेतलेल्याला एखाद्याला एखादी बंदिश खुलवताना.. त्यातली साहित्याची बाजू समजून घेतल्याने फायदाच होतो.. त्यातले भाव अगदी चपखल पणे पकडता येतात.. आणि जर कोणी मोठा व्यक्ती हे सुगमचं शिक्षण देत असेल, तर ते जरूर घ्यावं..
दादा आम्हाला, तुला सुगम संगीत गाताना ऐकायचंय.. तू तसा फक्त सुगम संगीताचा कार्यक्रम कधी करणारेस का..?
का नाही करणार.. आवडेल मलाही.. पण फक्त सुगम संगीताचाच कार्यक्रम करावा असा का हट्ट आहे.. मला जर स्फुरलं तर मी नक्की करीन.. मी माझ्या आयुष्यात मला जे माझ्या आतून वाटतं.. जे मला स्फुरतं त्याला मी respond करतो.. मी असं फार काही ठरवून वगैरे.. किंवा हा program चांगला चालेल या पद्धतीने काहीहि करत नाही.. आतून स्फुरेल तेव्हा करीन.. मला आवडतातच ना कारण हि गाणी.. मला लतादीदींची.. आशाताईंची.. सुधीर फडकेंची.. हृदयनाथ मंगेशकरांची.. माणिक वर्मांची.. या सगळ्यांची गाणी प्रचंड आवडतात.. मी सतत गुणगुणत असतोच.. निज माझ्या नंदलाला.. जिवलगा.. या चिमण्यांनो.. संथ वाहते कृष्णामाई.. त्यामुळे मला आवडेल नक्कीच.. फक्त काय आहे ना माझ्या तालमीमुळे.. माझे विचार आणि मेहनत हि शास्त्रीय – उपशास्त्रीय – नाट्यसंगीत आणि अभंग याच्यावरती जास्त झाली आहे.. पण मला आवडेल.. मला संधी मिळाली तर मला जरूर करायला आवडेल..
Online coaching.
दादा तू audio किंवा video blog कधी सुरु करणार आहेस..?
वेळ मिळाला कि.. मला आवडेल खरंतर करायला.. आणि काय होईल मी एकदा तो ब्लॉग तयार केला कि परत परत लोकांना ऐकता येईल.. कादंबरी किंवा सिनेमा सारखं आहे ते.. सारखं सारखं वाचता पाहता येतं.. पण शास्त्रीय संगीत हे क्रिकेट च्या मॅच सारखं असतं.. एकदा खेळली कि झाली.. परत खेळताना पुन्हा नव्याने पॅड बांधून मैदानात उतरावं लागतं.. तर मला आवडेल या माध्यमातून शिकवायला.. फक्त त्याचा audience कसा असेल.. मी ते कोणाला मध्यवर्ती ठेऊन करणार याची clarity आली कि मी नक्की सुरु करेन.. आणि याबाबतीत तुम्हाला जर का मला काही suggestions द्यायच्या असतील.. तर जरूर द्या.. आपण विचार करूयात त्यावर..!!
पथ्यपाणी आणि गाणं..
एका गायकाने अमुक एक गोष्ट खाऊ नये.. किंवा या गोष्टींचं पथ्य पाळावं असं काही सांगता येतं का..? आणि या गोष्टी कितपत महत्वाच्या ठरतात..?
मला असं वाटतं कि.. प्रत्येकाच्या बाबतीत या गोष्टी वेगवेगळ्या असतात.. मला काय पथ्य पाळावं लागतं हे मला माहितीये.. असं काही नाहीये कि गार खाल्याने सगळ्यांचाच घसा बसतो.. त्यामुळे प्रत्येकाने आपली प्रकृती ओळखावी.. उगाच दुसरा काहीतरी म्हणतोय म्हणून ते पाळण्यात काय अर्थ आहे.. प्रत्येक व्यक्तीच्या कपड्यांच्या साईज देखील वेगवेगळ्या असतात.. माझा t-shirt कुणा ७ फुटी माणसाला बसेल का..? तसंच प्रत्येकाचा गळा वेगळा असतो.. आपल्या गळ्याची मशागत कशी करायची.. हे प्रत्येकाने स्वतः आत्मकेंद्री होऊन पडताळण्याची गरज आहे..
MKSM
महेश काळे स्कूल ऑफ म्युझिक (MKSM) ची स्थापना करण्यामागचा उद्देश काय होता..? आणि आज तो सफल होताना दिसतो का..? आणि san francisco येथे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे देणारा शिकवणी वर्ग सुरु करावा असं का वाटलं..?
माझी स्वप्न खूप मोठी आहेत.. त्यामुळे अजून तो सफल झालाय असं मला वाटत नाही.. पण काम नक्की सुरु झालंय.. या दहा वर्षात इकडे अमेरिकेत एक पाच-सात हजार लोक आत्तापर्यंत येऊन माझ्याकडून शिकून गेलीयेत.. आजही माझ्याकडे २५०-३५० active students आहेत.. मला असं वाटतं कि शिकवण्याची कला मला आता चांगली गवसली आहे.. आणि त्यातून जो आनंद मला मिळतोय.. तो इतरांबरोबर शेअर करावा.. इतका साधा उद्देश होता त्यामागे.. आणि दुसरं म्हणजे सामाजिक बांधिलकी म्हणून देखील.. म्हणजे बघ आपल्याकडे पिढीजात जे देव असतात.. ते पुढच्या पिढीकडे आपण देत राहतो.. तसंच आहे हे पण.. आपलं जे परंपरागत आणि अभिजात.. पिढीजात संगीत आहे ते.. पिढ्यान-पिढ्या हस्तांतरित व्हावं.. आणि त्यात माझा हातभार लाभावा.. हा देखील उद्देश होता त्यामागे.. स्वर आपलं गायकांचं दैवत आहे.. तर त्याची पूजा कशी करायची हे देखील आपणच शिकवायला हवंय मुलांना.. आणि ती माझी जबाबदारी आहे असं मला वाटतं.. आणि रमतात मुलं माझ्याकडे.. माझ्या concerts ला workshops ला लहान मुलंच जास्त असतात.. आणि त्यांना आनंद मिळतो यात.. नंतर देखील त्यावर बरंच काही बोलणं घडत असतं.. मुलं मला त्यांच्या शंका विचारतात.. whatsapp चे groups आहेत अनेक.. त्यावर नेहमी चर्चा घडत असतात.. याचं स्वरूप देखील आता हळू-हळू विस्तारत चाललंय.. मला काय वाटतं सांगू का ____.. ज्याप्रमाणे अरजित च्या concerts ला गर्दी होती तशीच ती आपल्या अभिजात संगीताच्या concerts ला देखील व्हावी.. असे काही प्रांजळ हेतू मनात घेऊन मी त्यासाठी काम करतोय..
राष्ट्रीय पुरस्कार आणि दादा..
तुला २०१५ चा ६३वा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.. त्यानंतर शास्त्रीय संगीताचा नवीन पिढीतला आवाज या जबाबदारीने तुझ्याकडे पाहिलं जातं.. तुला आज गाताना या गोष्टीचं दडपण येतं..?
आजीबात नाही.. दडपण कशाला. आनंद आहे.. हे बघ मी राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याच्या आदल्या दिवशी जसा गात होतो तसाच त्यानंतर हि गातोय.. आणि जसा गात होतो त्यावरच तर मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ना.. आता हेच बघ.. ऑगस्ट मध्ये माझा नेस गरवारेला कार्यक्रम होता.. तिथे प्रचंड गर्दी झाली होती.. तेव्हा मी सांगितलं कि तरुण मंडळींनी उभं राहावं.. आणि प्रौढांना बसायला जागा द्यावी.. आणि काही वेळाने तर त्या मुलांना मी stage वरच बसायला बोलावलं.. भारतीय बैठकीत.. ८ ते १५ वयोगटातली हि सगळी मुलं होती.. मी तेव्हाही एक तासाभराचा ख्याल गायला.. आणि मी त्या मुलांना विचारत होतो आधे-मध्ये.. बोर तर नाही होत ना.. तर ती रमली होतीत मस्त.. आणि अगदी छान डोलत होती.. माझं गाणं ऐकून ती छान डोलतायत.. मला आनंद आहे.. आणि हे बघ जबाबदारीची मला जाण आहे.. मला कळतंय माझ्याकडे जबाबदारी आहे.. पण त्याचं दडपण नाहीये.. चांगलं काम करायचं कसलं आलंय दडपण.. म्हणजे जो एक adrenaline rush असतो.. perform करायच्या आधीची जी एक anxiety असते.. ती आहे मला.. पण त्याचं दडपण म्हणजे ओझं नाहीये मला.. हां.. pressure आहे.. म्हणजे खालच्या बाजूने pressure लावलं कि तुम्ही उडता वरती आणि स्वार होता.. तसं आहे ते.. खाली दाबणारं pressure नाहीये ते.. आणि ते गाण्याच्या बाबतीत कधीच येणार नाही मला.. आपण जसं म्हणतो knowledge liberates.. तसंच मला असं वाटतं कि.. music also liberates.. तुम्हाला एकदम हवा झाल्यासारखं वाटतं.. तुम्ही तरंगायला लागता..
Dada Asking for More..
महेश दादा “Feel the content but ask for more” ही आमची Tagline.. ज्याप्रमाणे ‘शब्दीप्ता Magazine’ नेहमीच जास्तिची अपेक्षा करतं.. त्याप्रमाणे कट्यार चा राष्ट्रीय पुरस्कार विजेता गायक महेश काळे स्वत:कडून अश्या कोणत्या जास्तिची अपेक्षा करतो..?
मला ना जसं कट्यार नाटकासाठी.. चित्रपटासाठी.. जसे दर्जेदार partners मिळाले तसेच ते या पुढेही मिळत राहावोत.. अशी खूप लोकं आहेत.. ज्यांच्याबरोबर मला काम करायला आवडेल.. आणि ज्या लोकांना आपण दैवतं मानतो त्यांच्या समोर कला मांडायला मला खूप आवडेल.. मला लता दिदींसमोर गायला प्रचंड आवडेल.. मला माहित नाही त्यांनी माझं गाणं ऐकलंय कि नाही पण मला त्यांच्या कडून मार्गदर्शन घ्यायला आवडेल.. at the same time.. मला A. R. Rehman अजय-अतूल यांच्या सोबत काम करायला आवडेल.. कारण त्यांचं संगीत मला खूप आवडतं.. आणि हि अपेक्षा नाहीये.. हि इच्छा आहे.. कारण आता मला पुरस्कार मिळालाय.. म्हणजे मला काही शिंगं वगैरे फुटलीयेत असं नाही ना.. फक्त आता उपलब्धी बऱ्यापैकी असेल.. म्हणजे.. आता कोण महेश काळे हे सांगणं जरा सोपं होईल.. आणि मला असं वाटतं कि हा एक launch board असू शकतो.. लांब उडी मारण्यासाठी.. उंच झेप घेण्यासाठी.. गगनभरारी घेऊन मला ती प्रतिभेची उंची गाठायचीये.. मी composions हि करतो.. त्यामध्ये मला ती creativity ची उंची गाठायचीये.. आणि तो एक फार वेगळा अनुभव आहे.. कारण कसं होतं.. दुसऱ्याची चाल ऐकून तिचं आकलन होऊन आपण एखादं गाणं गात असतो.. पण एखादी चाल निर्माण करून ती मनाच्या आत जायला लागते ना.. तो फार वेगळा अनुभव आहे.. तो अनुभव घ्यायला मला आवडेल.. मला लहान मुलांना.. किंवा young, professional तसंच प्रौढांनाही शिकवायला आवडेल.. संगीताचे धडे द्यायला आवडतील.. ते काम तर फार मोठं काम आहे.. आणि ते मला अविरतपणे करायला आवडेल..!!
-तुषार पवार
One thought on “सुरेल वाटचाल- महेश काळे भाग २”