आपल्या तरल, भावस्पर्शी शैलीने शब्दांना दीप्त करून त्यांनी केलेलं वर्णन अनुभवताना आपण त्या ठिकाणी आहोत आणि आपल्यासमोर हे सगळं घडतंय असा भास झाल्याशिवाय राहत नाही.. आणि कदाचित त्यामुळेच जेव्हा या कादंबरीवर सिनेमा करण्यात आला तेव्हा तो तितकाच relatable वाटला.. त्यातली सगळी पात्रं.. प्रसंग.. ठिकाणं.. त्यांमागची backstory.. हे सगळं कादंबरी मध्ये वाचण्याची मजाच आहे और आहे.. बोकील म्हणतात कि.. लेखकाचं लेखन हे नेहमी व्यक्तीनिष्ठच असतं.. त्यामुळे कोणताही लेखक जेव्हा लेखनाची प्रक्रिया असं म्हणतो.. तेव्हा तो त्याच्या व्यक्तिगत लेखनाची प्रक्रिया आणि त्याला जोडून असणारा अनुभवच सांगत असतो..
मिलिंद बोकीलांचं लेखन साहित्य परिपूर्णतेने भरलेलं पाहायला मिळतं.. त्यांनी केलेलं समीक्षणात्मक लिखाण.. “साहित्य, भाषा आणि समाज” या पुस्तकाच्या माध्यमातून माझ्या सारख्या नव-लेखकांना नेहमीच स्फूर्ती देऊन जातं.. चांगलं साहित्य कशाला म्हणायचं..? साहित्याची समृद्धी कशात असते..? लेखक असणे म्हणजे काय..? मराठीच्या विकासाच्या दिशा कोणत्या..? या आणि यां सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी त्यांच्या या पुस्तकात दिली आहेत.. एखादी कल्पना सुचण्यापासून ते तिची पाळं-मूळं घट्ट रोवण्यापर्यंतचा प्रवास आणि शब्दांना सोबत घेऊन कला निर्मितीचा घडलेला अविष्कार.. हा संपूर्ण प्रवास त्यांनी मांडला आहे..
‘उदकाचिया आर्ती’ या १९९१ साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या कथेने त्यांच्या साहित्याकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन निर्माण झाला.. धरणाखाली गडप होऊ घातलेल्या गावाला वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न करण्यासाठी स्वतःचे आयुष्य झोकून देणाऱ्या रोहिणी या मनस्वी स्त्रीची हि कथा.. हि कथा ज्यावेळी सामान्य जनमानसात रुजत होती.. त्याच वेळी त्यांनी एक प्रतिथयश लेखक-साहित्यकार म्हणून आपलं स्थान निश्चित केलं..
मिलिंद बोकील यांच्या कथांना अनुभवांचे व्यापक क्षेत्र लाभलेले आहे.. ‘झेन गार्डन’ हा त्यांचा दुसरा कथासंग्रह.. ते स्वतः इंजिनीअर.. समाजशास्त्रातले पदवीधर.. त्यातला पदव्युत्तर अभ्यासही त्यांनी संशोधनाद्वारे पूर्ण केलेला आहे.. युसुफ मेहेरअली सेंटरतर्फे त्यांनी आदिवासींसाठी काम केलं आहे.. त्यांच्याकडे त्यांच्या महाराष्ट्रभर-भारतभर केलेल्या भ्रमंतीचा ठेवा आहे.. आणि जो की त्यांच्या लिखाणातून.. प्रतीत होत असतो..
आशा बगे, भारत सासणे, सानिया, मिलिंद बोकील.. या चार समीक्षक मित्रांनी एकत्र येऊन साहित्य क्षेत्रातल्या काही मुद्यांवर आपली प्रत्येकाची असणारी परखड मतं मांडली आणि साकार झालं एक वेगळंच पुस्तक.. या साहित्यनिर्मितीबद्दल ते म्हणतात.., “आम्ही चौघे ‘समकालीन सहप्रवासी’ आहोत असे आम्ही मानतो..
साहित्यनिर्मिती हि एक गंभीर, पवित्र व जबाबदारीने करण्याची गोष्ट आहे असे आम्हाला वाटते.. हे आमचे आकलन समग्र स्वरुपात आम्ही मांडतो आहोत.. ते या उद्देशाने की साहित्याच्या निर्मिती आणि स्वरूपासंबंधी.. साहित्यिकांच्या भूमिका आणि विचारांसंबंधी जे कुतूहल वाचकांच्या मनात असते, ते काही प्रमाणात शमावे आणि अभ्यासकांना व विद्यार्थ्यांना साहित्यिक आकलनासाठी काही एक बीजद्रव्य यातून मिळावे..”
आपल्याजवळ ही आपली स्तब्धता आहे.. शांतता आहे.. तल्लीनता आहे.. आणि आपण ती तशीच ठेवयला पाहिजे.. कारण आपलं म्हणून जे आहे ते फक्त तेच आहे.. दुसरं काही नाही.. बाकी प्रत्येक गोष्ट बाहेरची आहे.. पण आपल्या मनाची स्थिती मात्र आपली आहे.. म्हणून ती आपण अशी मस्त ठेवू या.. म्हणजे आपल्याला कसलीच फिकीर नाही.. चिंता नाही.. आपण सगळ्यापासून मुक्त.. आणि आतल्या आत सुखी..
-टीम शब्दीप्ता