शब्दीप्ता of the issue- मिलिंद बोकिल

अत्यंत भावस्पर्शी वर्णन.. लेखणीच्या सहाय्याने गुंतवून ठेवणारी शैली.. आणि तरल तरंगी लिखाण या मुळे लक्षात राहतात ते लेखक-कवि मिलिंद बोकील; गवत्या.. एकम्.. समुद्र.. शाळा.. यांसारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून मानवी मनाच्या गाभ्याला हात घालणारे एक प्रभावी व्यक्तिमत्व; शाळा या सिनेमाच्या प्रदर्शनातून तर त्यांचा साहित्यप्रवाह सर्वसामान्यांपर्यंत जाऊन पोहोचला.. आणि मिलिंद बोकील हे नाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले.. त्यांची शाळा ही कादंबरी वाचताना जाणवतं कि त्यांनी space realization च्या माध्यमातून ही कथा गुंफली आहे..

सुरेल वाटचाल- मंगेश बोरगावकर

मी वयाच्या १६व्या वर्षी झी मराठी च्या सा रे ग म प या गाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता.. आणि उपमहागायका पर्यंत मजल मारली होती.. मला रसिक प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं.. मी stage shows करत गेलो.. त्यानंतर काही albums केले.. चित्रपटांसाठी गाणी गायलो.. मला वाटलंही नव्हतं की इतक्या अल्पावधीमध्ये मला सगळं………….
सांगतोय मंगेश बोरगावकर.. संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी क्लिक करा..

गगण ठेंगणे- आशिष तांबे

मित्रांनो गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचं लाडकं दैवत.. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असा हा बाप्पा.. याच ६४ कलांपैकी एक कला वरदान म्हणून लाभली आणि वयाच्या ६ व्या वर्षांपासून त्याचा प्रवास सुरु झाला.. गेली १५ वर्षं कुंचल्यांतून एक-एक कलाकृती साकारत ‘आशिष विलास तांबे’ हा चित्रकार नव-नवीन माध्यमातली चित्र काढत त्यात पारंगत होण्याच्या दिशेने पावलं टाकतोय..

कर्मयोगी- साने गुरुजी

मातृहृदयी, मातृधर्मी, सानथोरांची माउली, बालकांवर सुसंस्कार करता-करता ईश्वराशी नाते जोडणारे पालक, विद्यार्थ्यांना भूतकाळाची कल्पना देऊन भविष्याच्या दरवाज्यापर्यंत पोहोचवणारे विश्वदर्शी, ‘स्व-तंत्र’ शिक्षक, बलसागर भारताचे स्वप्न पाहणारे, स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक, ज्यांच्या वाणीतून अन् लेखणीतून अवतरणारे प्रत्येक अक्षर पवित्या आणि मांगल्याने भारावलेले आहे असे साहित्यिक.. भारतीय संस्कृतीचे उत्तुंग आणि भव्य असे अद्वैत दर्शन घडवणारे मार्गदर्शक, लोकसाहित्याचे अनुवादक, संग्राहक, संपादक, किसान-कामगारांचे गोरगरिबांचे कैवारी, समाजसुखासाठी युगधर्म रुजविणारे, प्रेमधर्माची पताका आयुष्यभर फडकविणारे, श्रद्धाशील समर्पण वृत्तीचे नम्र उपासक.. साने गुरुजी..!!!