मित्रांनो गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचं लाडकं दैवत.. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असा हा बाप्पा.. याच ६४ कलांपैकी एक कला वरदान म्हणून लाभली आणि वयाच्या ६ व्या वर्षांपासून त्याचा प्रवास सुरु झाला.. गेली १५ वर्षं कुंचल्यांतून एक-एक कलाकृती साकारत ‘आशिष विलास तांबे’ हा चित्रकार नव-नवीन माध्यमातली चित्र काढत त्यात पारंगत होण्याच्या दिशेने पावलं टाकतोय..
