चार पावसाळे अधिक- माझी माय, ‘भातसाई..!!’

आम्ही गाडीतून उतरलो.. कमानीवर लावलेल्या फलकांनी आमचं स्वागत केलंच होतं.. गेटमधून आत जाताना अनेक ओळखीचे चेहरे समोरून येऊ-जाऊ लागले.. आम्ही नावं नोंदवली तेव्हा एक गुलाब-पुष्प, प्रमाणपत्र आणि श्यामची आई हे पुस्तक देऊन आमचं स्वागत झालं.. आणि मग गतस्मृतींना उजाळा देऊन माणसं आठवून त्यांच्याशी बोलून आठवणींना उजाळा देणं सुरु झालं.. काहींचे चेहरे आठवत.. पण नावं आठवत नव्हती.. तरी सगळ्यांना माझी ओळख सांगत.. त्यांची ओळख पटवत भेटी घेत गेले..

गगन ठेंगणे- रोहन उपळेकर भाग २

रोहनजींना , “ सद्गुरु मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे संतसाहित्य अभ्यासक ” हा राज्यस्तरीय पुरस्कार पुणे येथील श्रीपाद सेवा मंडळातर्फे प्रदान करण्यात आला आहे. अध्यात्माची नाळ रंजल्या-गांजल्यांच्या सेवेशी जोडून आपण आणि आपल्या साधकबंधूंनी “श्रीहरिपाठ सेवा प्रतिष्ठान ” च्या माध्यमातून आषाढी वारीतील अक्षरशः लाखो वारकऱ्यांवर वैद्यकीय उपचार केले आहेत. वनस्पतिशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून, आता आपण श्रीपाद सेवा मंडळ या धर्मादाय न्यासाच्या सातारा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र दत्तधाम प्रकल्पावर राहून देवांची सेवा तसेच संत-साहित्याच्या अभ्यासाला वाहून घेतले आहे.

अभिनिवेष- अभिषेक देशमुख

लहाणपणापासूनच असणारी कलेची आवड… आई-वडीलांची भरभक्कम साथ… आणि झी-मराठी सारख्या ताकदीच्या बॅनरच्या मालिकेत प्रमुख भूमिका… या त्रिवेणी संगमासोबतच, “सुखी संसारासाठी फक्त पत्रिका नव्हे, तर मनंही जुळावी लागतात” हा विचार घेऊन… “पसंत आहे मुलगी” म्हणत घराघरात पोहचण्यास तयार असलेल्या ‘अभिषेक देशमुख’ ने शब्दीप्ताच्या टीमशी मारलेल्या दिलखुलास गप्पा..!!

कर्मयोगी- कर्मवीर भाऊराव पाटील

आपल्या पंखांखाली रानपाखरांना घेऊन त्यांच्यात आकाशाचे भव्यत्व आणि सूर्याचे तेजत्व पेरणारे.. उजाड माळरानाची रुपांतरे संपन्न ज्ञानमंदिरात करणारे.. आपल्या अलौकिक कर्तव्यातून महाराष्ट्राच्या मातीवर ‘रयत शिक्षण संस्थेच्या’ रूपाने ज्ञानाचे तीर्थ निर्माण करणारे.. कर्मवीर हेच एक ध्यासपर्व.. इतिहासाला लाभलेले स्फुर्तीस्थान.. आधुनिक सुधारणांचे जनक…

शब्दीप्ता of the issue- रत्नाकर मतकरी

रहस्यमयता आणि नाट्यमयता हे मतकरींच्या लेखन प्रतिभेचे पैलू आहेत.. मतकरींनी परीकथाही लिहिल्यात.. आणि भयकथाही.. दोन्हीमध्ये अकल्पित गोष्टी घडतात हे साम्य आहे.. परीकथांमधून त्या वर्णनाची गोड-गोड बाजू दिसते तर गूढकथांमधून अतिमानुष..