“अरे देशपांडे मास्तरांनी काल लेक्चर घेतलं राव”, गण्या म्हणाला.. आमच्या gang च्या एका सदस्याने आपलं मत मांडायला चालू केलं.. “हो! ना इतका वेळ कोणी कसं बोलू शकतं..?”, सगळ्यात जास्त बडबड करणाऱ्या निशा मॅडम बोलल्या.. तितक्यात कॅंटीनच्या छोटूने मधेच बोलत विचारलं,…
Category: लघुकथा
आपल्या आयुष्यात न घडणाऱ्या काही गोष्टी आपल्याला अश्या कथांमधून वाचायला फार आवडतात.. त्याचीच अनुभूती इथे येईल..
तू भेटशी नव्याने- चांदणे तुझ्या स्मरणाचे
नाना, आकाशातुन समुद्रात पडणाऱ्या थेंबांना किंमत नसते, किंमत फक्त शिंपल्यात पडणाऱ्या थेंबांना असते, कारण त्यांचा मोती होतो.. नाना तुम्ही मला किंमत दिलीए.. आणि मी वनवासातली सीता कधीच नव्हते कारण सीतेच्या पतीने तिला अग्नीपरीक्षा द्यायला लावली होती.. नाना तुम्ही माझ्यावर कधी साधं ओरडलाही नाहीत कधी.. मला सोन्यासारखी पोरं दिलीत.. समाजात मला किंमत मिळवून दिलीत.. तुमच्या कर्तुत्वामुळे समाजात नेहमी मी नानांची पत्नी म्हणून मिरवलं..
Protected: तू भेटशी नव्याने- प्रेम हे (भाग१)
There is no excerpt because this is a protected post.
Lockdown Diaries- 1
तितक्यात कमी ऐकायला येणाऱ्या आमच्या घरातील सर्वात मोठ्या सदस्याने एक वक्तव्य दिलं.. आजोबा म्हणाले “या करूना चं काय.. काय करायचं आता.. करूना लयं आगाव दिसते.. म्हणे आजार रोग असलं काही तरी घेऊन येतेय.. देवा.. कसं होणार रे.. निसर्गाला होणाऱ्या माणसाच्या त्रासानेच त्याने मानवाला अद्दल घडवण्यासाठी सुचवलेलं दिसतंय..”
आजोबांच्या या वक्तव्यात फक्त नाव विचित्र होतं नाहीतर त्यांनी म्हटलेला शब्द अन् शब्द हा खराचं होता की..
झाले घड्याळात साडे आठ वाजले आणि मी घराबाहेर पडले..
गीत माझ्या मनातले- येणार साजण माझा
आज तो परत येणार होता..! ती खिडकीत बसली होती.. सगळा घटनाक्रम आठवून झाला होता. तिचे डोळे त्याच्या वाटेकडे लागलेले. या डोळ्यांमध्ये याआधी इतकी आतुरता कधीही आणि कोणासाठीही नव्हती. मागे रेडिओवरचं गाणं तिच्या मनातली अवस्था अगदी यथोचित शब्दात मांडत होतं..
वाट पाहते मी ग.. येणार साजण माझा..!!
तू भेटशी नव्याने- Buns n coffee
बॅगमधून तिने आणलेलं Ravinder Singh चं ‘will you still love me ?’ काढलं, bookmark बाजूला ठेवून ती वाचू लागली..
“Rajveer rang the bell & lavanya opened the door”
तेवढयात तिची ऑर्डर आली, तिने ती घेतली आणि पुन्हा वाचु लागली,
“Lavanya was very shocked, she didn’t expect rajveer will surprise her in this way”
एवढ्यात तिला पुस्तकामागुन “Hiii” असा आवाज आला.
तिने पुस्तक थोडंसं बाजुला केलं आणि पाहिलं, साधारण 22-23 वर्षाचा मुलगा sky blue t- shirt, black jeans, sports shoes घालुन तिच्या समोर बसला होता. त्याच्या उजव्या पायातली सुटलेली shoelace पाहून तिने मान मुरडली आणि पुन्हा वाचू लागली..
पौर्णिमेचा चंद्र
“पौर्णिमा.. स्पष्ट बोलून मोकळी तरी हो नाहीतर सोडून तरी दे विषय.. असा स्वतःला त्रास करून घेत बसू नकोस” श्रुती म्हणाली.. तिला पौर्णिमाची मनस्थिती कळत होती.. पौर्णिमाला बोलताना तिच्या मनात असं काही नव्हतं.. पण तिला बोलतं करायला असं बोलणं भाग होतं तिला..
“सोडून द्यायचा असता विषय तर त्यात इतकं गुंतले असते का मी..? खिडकी मधून बाहेर बघत पौर्णिमा बोलत होती.. आणि हो चंद्राची हतबलता देखील समजू शकते मी.. आता ढगच दाटून आले असतील तर त्यात तो तरी काय करणार ना..?”
श्रुतीला तिच्या मनात काय चाललंय याची चांगलीच कल्पना होती.. पण तिला………..