पौर्णिमेचा चंद्र

“पौर्णिमा.. स्पष्ट बोलून मोकळी तरी हो नाहीतर सोडून तरी दे विषय.. असा स्वतःला त्रास करून घेत बसू नकोस” श्रुती म्हणाली.. तिला पौर्णिमाची मनस्थिती कळत होती.. पौर्णिमाला बोलताना तिच्या मनात असं काही नव्हतं.. पण तिला बोलतं करायला असं बोलणं भाग होतं तिला..

“सोडून द्यायचा असता विषय तर त्यात इतकं गुंतले असते का मी..? खिडकी मधून बाहेर बघत पौर्णिमा बोलत होती.. आणि हो चंद्राची हतबलता देखील समजू शकते मी.. आता ढगच दाटून आले असतील तर त्यात तो तरी काय करणार ना..?”

श्रुतीला तिच्या मनात काय चाललंय याची चांगलीच कल्पना होती.. पण तिला………..

अत्तरबीज..!!

ज्यांनी आपलं आयुष्य पणाला लावून कविता लिहिल्या, कविता जगल्या, आपल्या आयुष्याला प्रेरित केलं, आपल्याला व्यक्त व्हायला शिकवलं त्या थोर कवींची सुरुवात नेमकी कशी झाली? त्यांच्या कवितेला नक्की कोणता सुगंध आहे? आज इतक्या वर्षानंतरही तो सुगंध तसाच दरवळत आहे का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आणि कविता बहरण्या पासून ते आपल्या मस्तिष्का पर्यंत पोहोचणाऱ्या सुगंधाच्या शोधाचा प्रवास म्हणजे,
“अत्तरबीज!”

ही “अत्तरबीजं” वाचूया, वेचुया आणि भविष्यासाठी पेरूया!!!
आज पासून सुरु होतंय एक नवीन पाक्षिक सदर..
नक्की वाचा..
दर महिन्याच्या २ आणि १७ तारखेला..

साधना विवेकाची- आषाढी एकादशी

आज आषाढी एकादशी दिवशी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विट्ठल रुक्मिणी यांना भावभरीत नमन करून, साहित्यनिर्मितीतुन समाजोपयोगी जागर करण्याचा मानस ठेवून, शब्दीप्ता eMagazine चा नव्याने शुभारंभ करीत आहोत. आपणा सर्वांनी या सत्कार्यात सहभागी व्हावे, ही मनापासून विनंती.

आज राष्ट्रीय डॉक्टर्स डे च्या निमित्ताने, सर्वांच्या आरोग्यासाठी सेवेचे योगदान देणाऱ्या डॉक्टरांना शब्दीप्ता चा  मनापासून प्रणाम व शुभेच्छा!!
स्वतः अहोरात्र कष्ट करून साऱ्यांची भूक भागवणाऱ्या
अन्नदात्या शेतकऱ्यांना न्यायाचे व सुखाचे दिवस येवोत, हीच शब्दीप्ता ची राज्यकृषी दिनी प्रार्थना..

डॉक्टरांची समाजाभिमुखता

प्रसिध्द फिजिशियन व प. बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केला जाणारा आजचा हा दिवस.. डॉक्टर्स डे..!! रॉय यांच्या जीवनातील वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल हा दिवस साजरा केला जाऊ लागला.. त्यांच्याबाबतची विशेष बाब अशी कि १ जुलै १८८२ हा त्यांचा जन्मदिवस तर.. १९६२ चा जुलै १ हा त्यांचा मृत्यू दिवस….

सध्या कोविड १९ च्या साथीमध्ये स्वतः च्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर्स योद्धा होऊन लढत आहेत. यांमध्ये काही डॉक्टरांना मृत्यूदेखील आला, त्यांच्या कार्याला सलाम व भावपूर्ण आदरांजली. रुग्णांना आजारातून बरे करण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या सर्व डॉक्टरांच्या या आरोग्यसेवेचा आदरपूर्वक सन्मान करूया. डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा !!