कर्मयोगी- प्रा. के. एस. अय्यर

अतुल्य त्यागातून समाज उभारणीसाठी शिक्षित पिढी निर्माण करणारे आदर्श गुरु, अनामिक जीवन जगलेले शिक्षण क्षेत्रातील फकीर, विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे मातृहृदयी पालक, सुशिक्षित व सुसंस्कृत पिढी घडवणारे निरलस प्राध्यापक, एक प्रसिद्धीपराङमुख व्यक्तिमत्व, संस्कारदाता, मार्गदर्शक, आधारस्तंभ, स्फूर्तीदाता अशा विविध भूमिकांमधून प्रकट होणारे नि:स्पृह शिक्षक..

कर्मयोगी- डॉ. नरेंद्र दाभोळकर

एकविसाव्या शतकाच्या काळावर काही जगावेगळ्या माणसांच्या पाऊलखुणा उमटल्या आहेत.. या पाऊलखुणा भविष्यकाळाच्या कॅनव्हास वरून कधीच पुसल्या जाणार नाहीत.. असाच एक जगावेगळा माणूस म्हणजेच.. कोट्यावधी जनतेच्या मनातली वर्षानुवर्षे चिकटलेली अंधश्रद्धेची वटवाघुळं दूर करत ज्ञान, विज्ञान, आणि विवेकाचा उजेड पसरवून विवेकी जाणिवा समृद्ध करणारा विज्ञाननिष्ठ विवेकवादी.. पुरोगामित्वाचे समर्पित नेतृत्व.. समाजाच्या समता, मानवतेसाठी अंधश्रद्धेविरुद्ध उभा ठाकलेला संयमी लढवय्या.. उत्कृष्ट संघटक.. उत्तम व्यवस्थापक-समन्वयक.. हाडाचा कार्यकर्ता.. परिणामकारक आर्जवतेचा प्रभावी वक्ता.. ‘साधने’चा कल्पक संपादक.. विवेकाचा जागर करणारा विज्ञानवादी समाजसेवक.. पृथ्वीमोलाचा जिंदादिल माणूस..

कर्मयोगी- निळू फुले

अभिनयाची उपजत प्रगल्भता असणारे आणि अभिनयाच्या श्रेष्ठतम गुणवत्तेवर एक युग निर्माण करणारे ज्येष्ठ रंगकर्मी, बहुआयामी अभिजात अभिनयसम्राट, साधा.. सरळ.. निरपेक्ष, विलक्षण निर्मळ मनाचा, उदारमतवादी माणूस, निर्व्याज माणुसकीचा मूर्तिमंत आविष्कार, आभाळाएवढ्या उंचीचा जमिनीवरचा माणूस, सामाजिक कृतज्ञता प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा समाजसेवक.. प्रगल्भ समाजवादी आणि उत्तम राजकीय जाणकार, समतेच्या विचारांचा वसा आयुष्यभर जपणारा सच्चा सेवा दल सैनिक.. समतासंगराचा साथीदार, दुर्मिळ जाणीवेचा अस्सल बावनकशी माणूस.. कळवळ्याचा लोकसखा.. आयुष्याला थेट भिडणारा ‘खेळीया’..

कर्मयोगी- साने गुरुजी

मातृहृदयी, मातृधर्मी, सानथोरांची माउली, बालकांवर सुसंस्कार करता-करता ईश्वराशी नाते जोडणारे पालक, विद्यार्थ्यांना भूतकाळाची कल्पना देऊन भविष्याच्या दरवाज्यापर्यंत पोहोचवणारे विश्वदर्शी, ‘स्व-तंत्र’ शिक्षक, बलसागर भारताचे स्वप्न पाहणारे, स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक, ज्यांच्या वाणीतून अन् लेखणीतून अवतरणारे प्रत्येक अक्षर पवित्या आणि मांगल्याने भारावलेले आहे असे साहित्यिक.. भारतीय संस्कृतीचे उत्तुंग आणि भव्य असे अद्वैत दर्शन घडवणारे मार्गदर्शक, लोकसाहित्याचे अनुवादक, संग्राहक, संपादक, किसान-कामगारांचे गोरगरिबांचे कैवारी, समाजसुखासाठी युगधर्म रुजविणारे, प्रेमधर्माची पताका आयुष्यभर फडकविणारे, श्रद्धाशील समर्पण वृत्तीचे नम्र उपासक.. साने गुरुजी..!!!

कर्मयोगी- कर्मवीर भाऊराव पाटील

आपल्या पंखांखाली रानपाखरांना घेऊन त्यांच्यात आकाशाचे भव्यत्व आणि सूर्याचे तेजत्व पेरणारे.. उजाड माळरानाची रुपांतरे संपन्न ज्ञानमंदिरात करणारे.. आपल्या अलौकिक कर्तव्यातून महाराष्ट्राच्या मातीवर ‘रयत शिक्षण संस्थेच्या’ रूपाने ज्ञानाचे तीर्थ निर्माण करणारे.. कर्मवीर हेच एक ध्यासपर्व.. इतिहासाला लाभलेले स्फुर्तीस्थान.. आधुनिक सुधारणांचे जनक…

कर्मयोगी- डॉ. बाबा आमटे

शिकार कशाची करायची हे निश्चित आहे.. निबिड जंगलात धावायचं आहे.. दिशा पण ठरलेली आहे.. शिकारीचं धैर्य आहे.. हातात गांडीव आहे.. पाठीवर भाता आहे.. इतकं सगळं असून भात्यात जर संवेदनशिलतेचे शर नसतील तर मग शिकार कशी करणार.. “संवेदनांचे शर हरवून बसलेल्या तरुणांनो, प्रत्यक्ष कृतीशिवाय तत्वांना.. विचारांना किंमत नसते.. आचरणाशिवाय वाणी पोकळ ठरते.. शरणागतीत कसलेही भविष्य नसते, भविष्याची आशा दडपलेली असते.. ती कृतीमध्ये..

कर्मयोगी- डॉ. नितू मांडके

सामान्य माणसाला देव आणि डॉक्टर्स फक्त अडचणीच्या वेळीच आठवतात.. परंतु काही डॉक्टर्स समाजात असं काही उत्तुंग करून जातात की लोक नेहमी त्यांना देवस्वरूप मानून.. नेहमीसाठी ‘हृदयस्थ’ करतात.. या देवदूतांना ईश्वराने कुठल्यातरी शापाच्या उःशापा-खातर पृथ्वीवर पाठवलेलं असतं.. त्यांचं कार्य झालं की ते विधात्याने त्यांच्यासाठी पाठवलेल्या पुष्पकामधे विराजमान होतात.. आणि जनमानसात नेहमीसाठीच एक पोकळी सोडून जातात.. त्यांपैकीच एक “सुहृदयी सर्जनशील व्यक्तिमत्व” म्हणजे जगद्विख्यात हृदयशल्यविशारद कै. डॉ. नित्यानंद ऊर्फ नितू मांडके..