रोहनजींना , “ सद्गुरु मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे संतसाहित्य अभ्यासक ” हा राज्यस्तरीय पुरस्कार पुणे येथील श्रीपाद सेवा मंडळातर्फे प्रदान करण्यात आला आहे. अध्यात्माची नाळ रंजल्या-गांजल्यांच्या सेवेशी जोडून आपण आणि आपल्या साधकबंधूंनी “श्रीहरिपाठ सेवा प्रतिष्ठान ” च्या माध्यमातून आषाढी वारीतील अक्षरशः लाखो वारकऱ्यांवर वैद्यकीय उपचार केले आहेत. वनस्पतिशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून, आता आपण श्रीपाद सेवा मंडळ या धर्मादाय न्यासाच्या सातारा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र दत्तधाम प्रकल्पावर राहून देवांची सेवा तसेच संत-साहित्याच्या अभ्यासाला वाहून घेतले आहे..
Year: 2016
अभिनिवेष- अमृता देशमुख
पुढे career कला क्षेत्रातंच करायचं असं अगदी लहानपणापासून ठरवणारी.. अतिशय स्पर्धा असणाऱ्या क्षेत्रात; आपलं असं कुणीही नसताना पहिलाच प्रोजेक्ट श्रेयस तळपदेंच्या Affluence सारख्या आघाडीच्या production house बरोबर करायला मिळणं हे मी माझं भाग्य समजते असं आवर्जून सांगणारी.. आणि मराठी चित्रपटसृष्टीने मला तिच्यात लवकरात लवकर सामावून घ्यावं असं अगदी निरलसतेने म्हणणारी.. “तुमचं आमचं सेम असतं” म्हणत महाराष्ट्रातल्या घर-घरात पोहोचलेली एक गुणी अभिनेत्री ‘अमृता देशमुख’ व्यक्त होतीये खास शब्दीप्ता magazine च्या वाचकांसाठी..
कर्मयोगी- डॉ. बाबा आमटे
शिकार कशाची करायची हे निश्चित आहे.. निबिड जंगलात धावायचं आहे.. दिशा पण ठरलेली आहे.. शिकारीचं धैर्य आहे.. हातात गांडीव आहे.. पाठीवर भाता आहे.. इतकं सगळं असून भात्यात जर संवेदनशिलतेचे शर नसतील तर मग शिकार कशी करणार.. “संवेदनांचे शर हरवून बसलेल्या तरुणांनो, प्रत्यक्ष कृतीशिवाय तत्वांना.. विचारांना किंमत नसते.. आचरणाशिवाय वाणी पोकळ ठरते.. शरणागतीत कसलेही भविष्य नसते, भविष्याची आशा दडपलेली असते.. ती कृतीमध्ये..
शब्दीप्ता of the issue- कवी ग्रेस
डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांच्या महाश्वेता या कादंबरीवर आधारित असणाऱ्या मालिकेचं शीर्षक गीत लिहिणारे.. आपल्या “वाऱ्याने हलते पान” या पुस्तकासाठी २०११ सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलेले.. लेखक-कवी.. माणिकराव सीताराम गोडघाटे अर्थात “ग्रेस”..
Ingrid Bergman च्या “The Inn of the sixth happiness” या सिनेमातल्या तिच्या पात्रामुळे प्रेरित होवून त्यांनी स्वतःला ग्रेस म्हणवून घेत असल्याची कबुली एका मुलाखतीत दिली होती..
सुरेल वाटचाल- डॉ. नेहा राजपाल
वैद्यकीय व्यावसायिक शिक्षण घेऊनही इतर क्षेत्रात पूर्णवेळ काम करणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत.. डॉ. नेहा राजपाल ह्या त्यांपैकीच एक.. वैद्यकीय शाखेचं (M.B.B.S.) शास्त्रशुध्द शिक्षण घेतलेल्या डॉ. नेहा सध्या संगीत क्षेत्रात पूर्णवेळ कार्यरत आहेत.. त्यांनी आत्तापर्यंत हिंदी-मराठी मधे बरीच गाणी गायली आहेत.. २००४ साली झालेल्या हिंदी सारेगामा स्पर्धेच्या विजेतेपदापासून सुरु झालेल्या त्यांच्या सांगीतिक प्रवासाची भरारी आज “नेहा राजपाल प्रॉडक्शनस्” पर्यंत उंचावलेली पहायला मिळते.. डॉ. नेहा ते गायिका नेहा राजपाल या दरम्यानच्या प्रवासाबद्दल शब्दीप्ता Magazineच्या टिम ने त्यांच्याशी केलेली खास बातचीत..
अभिनिवेष- डॉ. निलेश साबळे
सासवड (पुणे) चा राहणारा एक मुलगा गडहिंग्लज कॉलेज मधे B.A.M.S. ला प्रवेश काय घेतो.. अभ्यासाबरोबरच स्वतःतील कलागुणांना खतपाणी काय घालतो.. झी मराठी वाहिनीवरील अभिनयाच्या स्पर्धेत भाग काय घेतो.. ती जिंकतो आणि हास्य जगतात विक्रम घडवून आणणाऱ्या फू-बाई-फू मालिकेचा निवेदक म्हणून सर्वांच्या मनात घर काय करतो.. त्यानंतर त्याला व्यक्त होण्यासाठी एक भक्कम असा कार्यक्रम मिळतो.. आणि मग स्पर्धेतल्या बाकी सगळ्यांना ‘चला हवा येऊ द्या’ म्हणत त्याची गाडी सुसाट सुटते..
वरवर जरी सगळं सहज-सोपं वाटंत असलं.. तरी त्यामागचे प्रयत्न.. अडथळ्यांवर केलेली मात.. आणि स्वप्नपूर्तीसाठीचं झगडणं.. याबद्दल आजचे आघाडीचे निवेदक डॉ. निलेश साबळे यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केलाय शब्दीप्ता Magazineच्या टिम ने..
कर्मयोगी- डॉ. नितू मांडके
सामान्य माणसाला देव आणि डॉक्टर्स फक्त अडचणीच्या वेळीच आठवतात.. परंतु काही डॉक्टर्स समाजात असं काही उत्तुंग करून जातात की लोक नेहमी त्यांना देवस्वरूप मानून.. नेहमीसाठी ‘हृदयस्थ’ करतात.. या देवदूतांना ईश्वराने कुठल्यातरी शापाच्या उःशापा-खातर पृथ्वीवर पाठवलेलं असतं.. त्यांचं कार्य झालं की ते विधात्याने त्यांच्यासाठी पाठवलेल्या पुष्पकामधे विराजमान होतात.. आणि जनमानसात नेहमीसाठीच एक पोकळी सोडून जातात.. त्यांपैकीच एक “सुहृदयी सर्जनशील व्यक्तिमत्व” म्हणजे जगद्विख्यात हृदयशल्यविशारद कै. डॉ. नित्यानंद ऊर्फ नितू मांडके..
शब्दीप्ता of the issue- श्री. प्रवीण दवणे
कितीही खस्ता खाल्या तरी त्यातून उभारी घेण्याचं बळ पंखांमध्ये फुंकून सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला गगन भरारी घेण्याचं स्वप्न पहायला लावणारे.. सामान्याहून सामान्य होत प्रसंगी घरातल्या कर्त्या पुरुषाची जागा घेत अस्तित्वाची लढाई लढण्याचं बळ देणारे.. प्रवीण दवणे.. आपल्या सहज, सोप्या अन् ओघवत्या शैलीतल्या लिखाणामुळे विशेष ठरतात..
ज्याच्या अंगातले त्राणच संपले आहेत अश्या व्यक्तीलाही मदतीचा हात देऊन.. कोणत्याही परिस्थितीतून बाहेर काढण्याचा मानस ठेवत.. ‘सावर रे..’ म्हणत.. श्री. दवणे आपल्यासमोर येतात..