शब्दीप्ता of the issue- सुधा मूर्ती

अत्यंत भावस्पर्शी लेखन.. वाचकाच्या मनाचा अलगत ठाव घेणारी लेखनशैली.. आणि भाषेच्या बंधनापल्याड डोकाऊ पाहणारी वर्णनं.. या मुळे लक्षात राहतात त्या लेखिका सुधा मूर्ती; ‘डॉलर बहू’.. ‘महाश्वेता’.. यांसारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून भारतीय समाजचित्रण करणारं एक मनस्वी व्यक्तिमत्व.. infosys foundationच्या माध्यमातून Philanthropy करणाऱ्या सुधाताईंनी तर भारतीय स्त्री मधील कर्तुत्वसंपन्नतेची साऱ्या जगाला ओळख करून दिली..

सुरेल वाटचाल- हर्षवर्धन वावरे

मराठी संगीत सृष्टीतील सुवर्णकाळाच्या पर्वात एक काळ होता की जेव्हा स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, या नावांशिवाय पर्याय नव्हता.. आणि तश्यातच क्लासमेट्स या सिनेमातल्या “तेरी मेरी यारीयाँ” या गाण्यातून आला एक नवा आवाज.. ज्याने आपल्या सहज गायकीने साऱ्या महाराष्ट्राला भुरळ घातली.. आणि काही दिवसांतच त्याचा असा स्वतःचा चाहता वर्ग तयार झाला.. आज ‘हाफ तिकीट’ या सिनेमातल्या चारही.. वेगवेगळ्या जॉनरच्या गाण्यांमुळे खास चर्चेत आलेला.. आणि “त्रीनीती ब्रदर्स” या बँड मुळे युवा वर्गात प्रसिद्ध असलेला.. महाराष्ट्राचा आघाडीचा गायक हर्षवर्धन सुभाष वावरे याची शब्दीप्ता च्या टीमने घेतलेली हि खास मुलाखत..

अभिनिवेष- आदिश वैद्य

स्टार प्रवाह वाहिनी वरच्या “तुमचं आमचं सेम असतं” या मालिकेतून Television क्षेत्रात खऱ्या अर्थाने पदार्पण करणारा.. एका अभिनेत्याच्या दृष्टीने अभिनयासोबतच गुड लुक्स आणि वेल फिजीक या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या ठरतात असं सांगणारा.. आणि आज “झी मराठी” सारख्या वाहिनी वर “रात्रीस खेळ चाले” या मालिकेत ‘आर्चिस’ ही भूमिका साकारणारा अभिनेता “आदिश वैद्य” याची शब्दीप्ताच्या टीमने घेतलेली हि खास मुलाखत..

कर्मयोगी- निळू फुले

अभिनयाची उपजत प्रगल्भता असणारे आणि अभिनयाच्या श्रेष्ठतम गुणवत्तेवर एक युग निर्माण करणारे ज्येष्ठ रंगकर्मी, बहुआयामी अभिजात अभिनयसम्राट, साधा.. सरळ.. निरपेक्ष, विलक्षण निर्मळ मनाचा, उदारमतवादी माणूस, निर्व्याज माणुसकीचा मूर्तिमंत आविष्कार, आभाळाएवढ्या उंचीचा जमिनीवरचा माणूस, सामाजिक कृतज्ञता प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा समाजसेवक.. प्रगल्भ समाजवादी आणि उत्तम राजकीय जाणकार, समतेच्या विचारांचा वसा आयुष्यभर जपणारा सच्चा सेवा दल सैनिक.. समतासंगराचा साथीदार, दुर्मिळ जाणीवेचा अस्सल बावनकशी माणूस.. कळवळ्याचा लोकसखा.. आयुष्याला थेट भिडणारा ‘खेळीया’..