शब्दीप्ता of the issue- गुलजार साहेब

अतिशय प्रतिभासंपन्न लेखणी.. ‘पेना’ला असणारी ‘शीला’ची जोड.. आणि खर्जात लागणारा आवाज या स्वर्गानुभूतीच्या ईश्वरीय देणग्या लाभलेला एक कविमनाचा माणूस ज्याच्या अवकाशात.. रेहमान त्याच्या अवीट गोडीच्या चाली गुणगुणत असतो.. लता दीदी – आशा ताई एकमेकींना सवाल जबाब करत असतात.. कुठल्या तरी कर्मठ पीठाचे शंकराचार्य धर्माच्या गोष्टी करत असतात.. चर्चमधले फादर आणि मशिदीतले मौलाना एकत्र बसून बुद्धीबळ खेळत असतात.. आणि त्यांचा चिमुरडा नातू समय या सगळ्यांना बरोबर घेऊन नवा व्यापारचा डाव मांडून बसलेला असतो..

सुरेल वाटचाल- रोहित राऊत

त्याने हिंदी सारेगमप सुद्धा केलं पण (मराठी जनांमध्ये) खरी प्रसिद्धी त्याला मराठीतल्या लिटील चॅम्प्स नेच दिली.. आणि आज त्याच गोष्टीतून उतराई होण्यासाठी त्याने मराठी संगीत सृष्टीची कास धरली आहे.. तो हिंदीमध्ये जरी गेला तरी तो नेहमीच मराठी जनांचा राहणार आहे.. यात तिळमात्रही शंका नाही.. तुम्हाला जी गोष्ट करायची आहे ती तुमच्या साठी खूप महत्वाची आहे आणि त्या शिवाय तुमचं आयुष्यच ते काही नाहीये.. अश्या भावनेने जर प्रत्येकजण काम करता राहिला तर कामाच्या बाबतीत कुणीच मागासलेलं नसेल असं सांगणारा.. आणि आज मी जो काही आहे त्याचं श्रेय मी तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांना देय इच्छितो असं अगदी प्रांजळपणे कबूल करणारा.. एक सुमधुर आवाजाचा गायक संगीतकार..

अभिनिवेष- सिद्धार्थ चांदेकर

अवधूत गुप्तेंच्या झेंडा या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करणारा.. माझ्या सह-कलाकारांमुळे माझ्यातला भिरभिरेपणा कमी झाला असं सांगणारा.. आणि मलाही असुरक्षितता बऱ्याच वेळी जाणवते असं अगदी प्रांजळपणे कबुल करणारा.. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याची शब्दीप्ताच्या टीमने घेतलेली हि खास मुलाखत..

कर्मयोगी- डॉ. नरेंद्र दाभोळकर

एकविसाव्या शतकाच्या काळावर काही जगावेगळ्या माणसांच्या पाऊलखुणा उमटल्या आहेत.. या पाऊलखुणा भविष्यकाळाच्या कॅनव्हास वरून कधीच पुसल्या जाणार नाहीत.. असाच एक जगावेगळा माणूस म्हणजेच.. कोट्यावधी जनतेच्या मनातली वर्षानुवर्षे चिकटलेली अंधश्रद्धेची वटवाघुळं दूर करत ज्ञान, विज्ञान, आणि विवेकाचा उजेड पसरवून विवेकी जाणिवा समृद्ध करणारा विज्ञाननिष्ठ विवेकवादी.. पुरोगामित्वाचे समर्पित नेतृत्व.. समाजाच्या समता, मानवतेसाठी अंधश्रद्धेविरुद्ध उभा ठाकलेला संयमी लढवय्या.. उत्कृष्ट संघटक.. उत्तम व्यवस्थापक-समन्वयक.. हाडाचा कार्यकर्ता.. परिणामकारक आर्जवतेचा प्रभावी वक्ता.. ‘साधने’चा कल्पक संपादक.. विवेकाचा जागर करणारा विज्ञानवादी समाजसेवक.. पृथ्वीमोलाचा जिंदादिल माणूस..