लहानपणापासून गाण्याच्याच वातावरणात वाढलेली.. वडिलांकडेच शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाचा श्रीगणेशा करणारी.. आणि non-filmy गाण्यांमुळे प्रयोगशीलता जिवंत राहते असं आवर्जून सांगणारी.. मराठी संगीतसृष्टीतली एक आघाडीची गायिका असणारी “आनंदी विजय जोशी..” आनंदी दाक्षिणात्य संगीतसृष्टीत काम करण्याची इच्छाही तितक्याच प्रांजळपणे व्यक्त करते.. पाश्चात्य संगीतातल्या काही गोष्टींचा अंगीकार करून जर नवनवीन प्रयोग झाले तर संगीतसृष्टीला नव्याने पालवी फुटेल असं सांगत आपल्या नोबल असण्याची ग्वाही देते.. आनंदीची झेप गरुडालाही लाजवेल अशी आहे.. तिच्या साठी सारं आभाळंच खुलं आहे..
वाचा शब्दीप्ता च्या टीम ने घेतलेली तिची ही खास मुलाखत..
