अत्यंत भावस्पर्शी वर्णन.. लेखणीच्या सहाय्याने गुंतवून ठेवणारी शैली.. आणि तरल तरंगी लिखाण या मुळे लक्षात राहतात ते लेखक-कवि मिलिंद बोकील; गवत्या.. एकम्.. समुद्र.. शाळा.. यांसारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून मानवी मनाच्या गाभ्याला हात घालणारे एक प्रभावी व्यक्तिमत्व; शाळा या सिनेमाच्या प्रदर्शनातून तर त्यांचा साहित्यप्रवाह सर्वसामान्यांपर्यंत जाऊन पोहोचला.. आणि मिलिंद बोकील हे नाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले.. त्यांची शाळा ही कादंबरी वाचताना जाणवतं कि त्यांनी space realization च्या माध्यमातून ही कथा गुंफली आहे..
