तितक्यात कमी ऐकायला येणाऱ्या आमच्या घरातील सर्वात मोठ्या सदस्याने एक वक्तव्य दिलं.. आजोबा म्हणाले “या करूना चं काय.. काय करायचं आता.. करूना लयं आगाव दिसते.. म्हणे आजार रोग असलं काही तरी घेऊन येतेय.. देवा.. कसं होणार रे.. निसर्गाला होणाऱ्या माणसाच्या त्रासानेच त्याने मानवाला अद्दल घडवण्यासाठी सुचवलेलं दिसतंय..”
आजोबांच्या या वक्तव्यात फक्त नाव विचित्र होतं नाहीतर त्यांनी म्हटलेला शब्द अन् शब्द हा खराचं होता की..
झाले घड्याळात साडे आठ वाजले आणि मी घराबाहेर पडले..